Breaking News

सुषमा अंधारे यांचा राज ठाकरेंवर टीकास्त्र, आमच्याकडे एक असा पठ्ठ्या..

ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मागील काही दिवसांपासून प्रबोधन यात्रेच्या निमित्ताने बंडखोर शिंदे गटावर सातत्याने टीकेची झोड उठविली. त्यानंतर सुषमा अंधारे यांनी आता मनसेकडे आपला निशाना वळवित थेट मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले.
यावेळी बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या की, आमच्याकडे तर एक असा पठ्ठ्या आहे त्याचा ‘उठ दुपारी आणि घे सुपारी’ असाच कार्यक्रम असतो, अशी खोचक टीका राज ठाकरे यांच्यावर केली. त्या गुरुवारी १ नोव्हेंबर रोजी मुलुंडमधील महाप्रबोधन सभेत बोलत होत्या.

आमच्याकडे तर एक असा पठ्ठ्या आहे त्याचा ‘उठ दुपारी आणि घे सुपारी’ असाच कार्यक्रम असतो. ‘उठ दुपारी, घे सुपारी’ असं करताना ते अचानक गुहेतून बाहेर येतात, अचानक सभा घेतात आणि परत गायब होतात. परत ते पुढच्या निवडणुकीलाच येतात असा उपरोधिक टोलाही त्यांनी लगावला.

दोनच मुद्दे मांडा, पण व्यवस्थित मांडा ना. मी यालाही थोडं बोलेन, त्यालाही थोडं बोलेन, मी मध्येच विचारवंत होईन, मध्येच मिमिक्री आर्टिस्ट होईन, मी मध्येच पेंटर होईन, मध्येच आणखी काही होईन आणि मी काहीतरी बोलेन आणि लोक काहीतरी समजतील, असं यांचं सुरू असतं, असेही त्या म्हणाल्या.

सुषमा अंधारे पुढे म्हणाल्या, खरंतर मला त्या माणसावर बोलावंसं वाटत नाही. आमचे देवेंद्र भाऊ किती छान बोलतात. मला आमचे देवेंद्र भाऊ आवडतात. कारण त्यांना माझ्यापेक्षा चांगलं सुचतं. ते म्हणाले की, मतदार नसलेली सेना. मतदार नसलेली सेनाचा शॉर्टफॉर्म करा आणि काय होतं पाहा. मतदारमधील ‘म’, नसलेलीमधील ‘न’ आणि सेनेमधील ‘से’ काढला की काय होतं? मी काहीच म्हणत नाही. मी अतिशय गरीब लेकरू आहे, त्यात अजिबात पडत नाही, असा उपरोधिक टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

आता मतदार नसलेल्या सेनेचा उमेदवार नसलेली सेना इथपर्यंत प्रवास झाला आहे. अशी परिस्थिती होऊनही त्यांना बोलावंसं वाटतं, असा उपरोधिक टोलाही त्यांनी राज ठाकरे यांना लगावला.

Check Also

भाजपाचे शरद पवार यांना प्रत्युत्तर,… संविधान बदलाच्या अफवा

पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या गॅरंटीपुढे निभाव लागत नाही, त्यामुळे आता भारताचे संविधान बदलणार अशा अफवा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *