Breaking News

Editor

ऑनस्क्रीन व्हॅलेंटाइन कपल पण प्रेक्षकांना भेटणार १६ मार्चला

मुंबई : प्रतिनिधी ‘कॅाफी आणि बरंच काही’ आणि ‘मि. अँड मिसेस सदाचारी’ या चित्रपटातील प्रार्थना बेहरे आणि वैभव तत्त्ववादी ही जोडी रसिकांची फेव्हरेट आहे. दोघांची ऑनस्क्रीन केमेस्ट्री प्रेक्षकांना चांगलीच भावल्याने ही जोडी पुन्हा कधी एकत्र येते याची जणू उत्सुकताच प्रेक्षकांना लागलेली असते. व्हॅलेंटाइन डे जवळ आला असून सध्या सगळीकडे याच …

Read More »

प्रथमच एकत्र दिसणार आमिर आणि रणवीर चित्रपट कि जाहिरातीत ?

मुंबई : प्रतिनिधी मि. परफेक्शनिस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेता आमिर खानचं नाव आज सगळीकडे गाजतंय. कोणत्याही व्यक्तिरेखेला अचूक न्याय देण्यात तरबेज असणाऱ्या आमिरच्याच पावलावर पाऊल टाकत अभिनेता रणवीर सिंहही वेगवेगळ्या रूपात प्रेक्षकांचं मनोरंजन करतोय. संजय लीला भन्साळींच्या वादग्रस्त ‘पद्मावत’ या चित्रपटामध्ये सर्वांनाच त्याचा प्रत्यय आला आहे. नकारात्मक भूमिकेतही रणवीरच जास्त …

Read More »

राज्य सरकारचे आदेश असतानाही तूर नाकारण्याच्या घटना शेतकऱ्यांनी तूर जाळून केला निषेध

औरंगाबाद : प्रतिनिधी शेतकऱ्यांच्या तूर खरेदीचा घोळ गेल्या वर्षी प्रमाणे यंदा देखील मोठ्या प्रमाणावर राज्यात सुरु आहे. खरेदीची मर्यादा आणि दरामधील तफावत यामुळे शेतकऱ्यांचे खरेदी केंद्रावर खडके उडत आहेत. शुक्रवारी  औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तूर खरेदी केंद्रावर दहा शेतकऱ्यांनी आणलेली तूर चाळण न करता रिजेक्‍ट करण्यात आली. त्यामुळे संतप्त …

Read More »

उच्च न्यायालयाच्या रट्ट्यानंतर शिक्षण खात्याला जाग अखेर मुंबईतील शिक्षकांचे पगार स्टेट बँकेतून देण्याची शिक्षण मंत्र्यांची घोषणा

मुंबई: प्रतिनिधी भाजपमय झालेल्या प्रविण दरेकरांच्या मुंबै सहकारी बँकेला वाचविण्यासाठी मुंबईतील शिक्षक, शिक्षकेतरांचे वेतन मुंबै बँकेतून देण्याचा निर्णय राज्याच्या शिक्षण विभागाने घेतला. या निर्णयावरून मुंबई उच्च न्यायालयाने चांगलेच फटकारल्यानंतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार मुंबै बँकेऐवजी राष्ट्रीयकृत बँकेतून देण्याची अखेर भूमिका शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी घेतली. तसेच या …

Read More »

राज्यातील २ कोटी ८० लाख मुलांना जंतनाशक गोळी देणार राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त सरकारकडून मोहीम आरोग्यमंत्री डॉ. सावंत यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी कृमीदोष हा लहान वयात सहज होणारा व गंभीर आजार आहे. याचा थेट दुष्परिणाम बालकांच्या शारीरिक व वैयक्तिक विकासावर होतो. याचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोग्य विभागाकडून उद्यापासून १० ते १५ फेब्रुवारी दरम्यान राष्ट्रीय जंतांनाशक दिन साजरा करण्यात येणार आहे.  या उपक्रमात राज्यातील वय वर्ष १ ते १९ वयोगटातील सुमारे …

Read More »

अखेर उच्च न्यायालयाचा शालेय शिक्षण विभागाला तडाखा मुंबै बँकेतून शिक्षकांचे पगार देण्यास न्यायालयाची मनाई

मुंबई: प्रतिनिधी मुंबईतील शिक्षकांचे पगार भाजपचे विद्यमान आमदार प्रविण दरेकर यांच्या मुंबै बँकेतून करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने मनाई करण्याचे आदेश आज दिले. यासंदर्भात शिक्षक भारती संघटनेच्यावतीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर निकाल देताना उच्च न्यायालयाने वरील आदेश दिले. मुंबै जिल्हा सहकारी बँकेतून मुंबईसह राज्यातील शिक्षकांचे पगार देण्याबाबत …

Read More »

आणि राज्य सरकारची वेबसाईट क्रँश झाली लाखो नागरीकांची झाली निराशा

मुंबई : प्रतिनिधी डिजीटल महाराष्ट्राचे स्वप्न पाहणाऱ्या राज्यात महाराष्ट्र सरकारच्या संपूर्ण निर्णयाची माहिती पोचविणारे राज्य सरकारच्या मालकीचे महाराष्ट्र हे संकेतस्थळ क्रँश झाले. त्यामुळे राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती घेण्यासाठी संकेतस्थळावर धाव घेणाऱ्या लाखो नागरीकांची मोठी निराशा झाल्याने नागरींकामध्ये नाराजी निर्माण झाली. राज्य सरकारच्या जवळपास ३६ विभागांसह नव्याने निर्माण झालेल्या आणखी …

Read More »

दत्तांच्या ‘पलटन’मध्ये मोनिकाची एंट्री हर्षवर्धन राणे सोबत जमणार जोडी

मुंबई : प्रतिनिधी देशभक्ती चित्रपटासाठी प्रसिध्द असलेल्या निर्माता दिग्दर्शक जे.पी.दत्ता यांच्या आगामी पलटन चित्रपटात मोनिका गिल या अभिनेत्रीची एन्ट्री झाली आहे. ही तीच मोनिका गिल आहे जी मागच्या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘फिरंगी’ चित्रपटामध्ये कपिल शर्मासोबत चमकली होती. दुसऱ्याच चित्रपटात मोनिकाला जे. पी. दत्तांसारख्या दिग्गज दिग्दर्शकांसोबत काम करण्याची संधी लाभली असून …

Read More »

रिचा विरुद्ध रिचा बॅाक्स ऑफिसवर रंगणार अनोखा सामना

मुंबई : प्रतिनिधी एकाच अभिनेत्याचे दोन सिनेमे एकाच शुक्रवारी प्रदर्शित होतात. तर कधी दोन अभिनेत्यांचे दोन चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होत असल्याने ते कलाकार आमनेसामने उभे ठाकल्याचं चित्र पाहायला मिळतं. पण अभिनेत्रींच्या बाबतीत फार कमी प्रमाणात असं घडताना दिसतं. परंतु पहिल्यांदाच ग्लॅमरसोबतच नॅान ग्लॅमरस भूमिकाही अतिशय खुबीने वठवत लक्ष वेधूने …

Read More »

अखेर दोन दलित सनदी अधिकाऱ्यांनी केला राजकारणात प्रवेश सनदी अधिकारी उत्तम खोब्रागडे, किशोर गजभियेंचा यांचे काँग्रेसमध्ये स्वागत

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील काँग्रेसच्या राजवटीला कंटाळून आणि कार्पोरेट क्षेत्रातील भल्यामोठ्या पगारींच्या आकड्यांना भुलत सनदी अधिकारी पदाचा राजीनामा देत कार्पोरेट क्षेत्रात उडी मारणाऱ्या सनदी अधिकारी किशोर गजभिये आणि निवृत्त अधिकारी उत्तम खोब्रागडे यांनी आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला. नवी दिल्ली येथे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा …

Read More »