Breaking News

Editor

पद्मावतला टक्कर देत ‘पॅडमँन’ने बसविला जम पहिल्या तीन दिवसात ३९.५० कोटींचा गल्ला

मुंबई: प्रतिनिधी संजय लीला भन्साळींच्या वादग्रस्त ‘पद्मावत’ या चित्रपटानंतर प्रदार्शित झालेला ‘पॅडमँन’ हा आणखी एक महत्त्वपूर्ण आणि मोठा चित्रपट मानला गेला. अक्षय कुमारसारख्या दिग्गज अभिनेत्याची मुख्य भूमिका आणि आर. बाल्कींसारख्या मातब्बर दिग्दर्शकाच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या चित्रपटाचे मागील बऱ्याच दिवसांपासून जोरदार प्रमोशन सुरू होतं. त्यामुळे हा चित्रपट बॅाक्स ऑफिसवर कशा …

Read More »

तीन वर्षापासून रखडलेले क्रिडा पुरस्कार जाहीर क्रिडामंत्री विनोद तावडे यांच्याकडून यादी प्रसिध्द

मुंबई : प्रतिनिधी गेल्या तीन वर्षापासून एकही क्रिडा पुरस्कार राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आला नव्हता. त्यामुळे क्रिडा क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर नाराजी पसरली होती. अखेर या नाराजीची दखल घेत मागील तिन्ही वर्षाचे पुरस्कार राज्याचे क्रिडामंत्री विनोद तावडे यांनी आज बॉम्बे जिमखाना येथे जाहीर केले. पुरस्काराचे नाव  2014-15  2015-16 2016-17 एकूण शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरवपुरस्कार 25 …

Read More »

अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे सव्वा लाख हेक्टर क्षेत्र बाधित कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी राज्यात गेल्या दोन दिवसात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे पिकांच्या झालेल्या नुकसानाचा प्राथमिक अहवाल प्राप्त झाला आहे. ११ जिल्ह्यातील सुमारे ५० तालुक्यांमधील १०८६ गावांमधील १ लाख २४ हजार २९४ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहेत. यामध्ये प्रामुख्याने गहु, हरभरा, ज्वारी, कांदा व रब्बी हंगामामधील फळ पिकांचा समावेश आहे. …

Read More »

पुढील ४८ तासात विदर्भ, मराठवाड्यात आणखी वादळीवाऱ्यासह गारपिटीचा अंदाज शेतकऱ्यांनी शेतमालाच्या बचावासाठी उपाय योजण्याचे आवाहन

मुंबई : प्रतिनिधी भारतीय हवामान खात्याच्या नागपूर व मुंबई केंद्राकडून मिळालेल्या सूचनेनुसार, येत्या ४८ तासांमध्ये विदर्भामध्ये (विशेषत: अमरावती आणि नागपूर विभाग) वादळीवारा, वीज व प्रामुख्याने गारपीट होण्याची तसेच  मराठवाड्याच्या बहुतांश भागात वादळीवारा होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर या भागातील शेतकऱ्यांनी दक्षता घेण्याचे आवाहन मंत्रालयातील आपत्ती निवारण कक्षाने केले. वादळी वारा व गारपीटीच्या पार्श्वभूमीवर यामध्ये शेतमाल …

Read More »

न्यायालयाने आदेश देवूनही रंगशारदा प्रतिष्ठानवर सरकारची मेहरनजर १३ वर्षे झाली तरी सरकारकडून चौकशी नाहीच

मुंबई: प्रतिनिधी नाटयमंदिर बांधण्यासा म्हाडाने दिलेल्या भूखंडावर हॉटेल आणि अन्य व्यवसायिक वापर करणाऱ्या रंगशारदा प्रतिष्ठानाच्या अनियमितताबाबत चौकशीचा प्रस्ताव शासनाने लटकविला असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस म्हाडाने दिलेल्या कागदपत्रावरुन स्पष्ट होत आहे. विशेष म्हणजे यासंदर्भात १३ वर्षांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने म्हाडाने भाडेपट्टा करारनामा रद्द करणेबाबत आदेश देत उपाध्यक्ष किंवा मुख्य …

Read More »

पंतप्रधान नोकरी द्या…. पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष निरूपम यांचे आंदोलन

मुंबई: प्रतिनिधी संसदेत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी बेरोजगारांनी पकोडे तळून रोजगार उपलब्ध करावा असे वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी पकोडे तयार करण्याचे आंदोलन केले. त्यानंतर बेरोजगारांना नोकरी मिळावी यासाठी थेट पंतप्रधानांनाच नोकरी मागण्यासाठी पंतप्रधान नोकरी द्या ची मागणी करत काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरूपम …

Read More »

केंद्रीय मंत्री गडकरींपाठोपाठ आता सरसंघचालक भागवतांकडून सैन्यदलाचा अवमान सैन्यदलाची माफी मागावी: खा. अशोक चव्हाण यांची मागणी

नांदेड : प्रतिनिधी भारतीय लष्कराला तयार व्हायला सहा-सात महिने लागतात. पण संघ स्वयंसेवक तीन दिवसात सज्ज होतात असे वक्तव्य करून सरसंघचालक मोहन भागवत यांनी भारतीय लष्कराच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा.अशोक चव्हाण यांनी करत सैन्य दलाचा अवमान केल्याबद्दल सरसंघचालक मोहन भागवत यांनी माफी मागावी अशी मागणीही त्यांनी …

Read More »

हर्षल रावतेच्या आत्महत्या प्रकरणानंतर सरकारला आली जाग अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी मंत्रालयात बसवली जाळी

मुंबई : प्रतिनिधी गेली महिनाभर मंत्रालयात येवून आत्महत्या करण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे मंत्रालयातील आवारात उडी मारून आत्महत्या करू नये म्हणून जाळी बसविण्याचा निर्णय घेत त्याची प्रशासनाने अंमलबजावणीही केली. धुळ्याचे शेतकरी धर्मा पाटील यांनी मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर अहमदनगरचा अविनाश शेटे यांनी मंत्रालयाच्या प्रवेशद्वारासमोर स्वत:वर रॉकेल ओतून आत्महत्या करण्याचा …

Read More »

राज्याच्या शिक्षण विभागाकडून मोदीभक्तीच्या रसाची उधळण शालेय विद्यार्थ्यांसाठी फुले, शाहू, आंबेडकरांच्या पुस्तकांपेक्षा जास्त मोदींच्या पुस्तकाची खरेदी

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील शालेय विद्यार्थ्यांना राष्ट्रीयस्तरावरील नेत्यांच्या कार्याची आणि विचारांची ओळख व्हावी या उद्देशाने महात्मा फुले, महात्मा गांधी, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची पुस्तके खरेदी करून त्याचे विद्यार्थ्यांमध्ये वाटप केले जाते. मात्र यावर्षी या राष्ट्रीय महापुरूषांपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याप्रती मोदी भक्ती निर्माण व्हावी यासाठी ६० लाख रूपये खर्च करून गुजराती, …

Read More »

मराठवाड्यात दिवसभर गारपीट सुरूच वीज पडून एक व्यक्ती तर दोन जनावरे दगावली

औरंगाबाद: प्रतिनिधी मराठवाड्यात औरंगाबाद आणि उस्मानाबाद वगळता सर्व जिल्ह्यात दिवसभर गारपीट सुरुच असून वीज पडून एकाचा मृत्यू झाला तर दोन जनावरे दगावली आहेत. या संदर्भात गारपीटग्रस्त भागात वेगाने पंचनामे करण्यासाठी स्थळपाहणी सुरु असल्याची माहिती विभागीय आयुक्तालयातील वरिष्ठ सुत्रांनी दिली. जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर या जिल्ह्यातील ९० गावांत गारपीट …

Read More »