Breaking News

Editor

टीझरने उलगडला ‘रेडू’चा अर्थ मे महिन्यात मिळणार बघायला

मुंबई : प्रतिनिधी काही सिनेमे अनोख्या शीर्षकांमुळे चर्चेत राहतात आणि उत्सुकताही वाढवतात. शीर्षकाचाच नेमका अर्थ न समजल्याने सिनेमात काय दडलंय याचाही अंदाज येत नाही, पण असे सिनेमे कुतूहल जागविण्यात यशस्वी ठरतात. ‘रेडू’ या आगामी मराठी सिनेमाच्या बाबतीतही असंच काहीसं घडलं आहे. शीर्षकावरून हा सिनेमा कसा असावा याचा अंदाज लावणं तर …

Read More »

एसटी महामंडळात नव्याने रूजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांना मिळणार पूर्ण पगार परिवहन मंत्री दिवाकर रावते यांची घोषणा

मुंबई  : प्रतिनिधी एसटी महामंडळामध्ये भरती झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना सध्या १ वर्षापर्यंत कनिष्ठ वेतन श्रेणीवर काम करावे लागते. ही कनिष्ठ वेतनश्रेणीची पध्दत रद्द करण्यात आल्याची घोषणा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केली आहे. या निर्णयाचा लाभ नव्याने भरती होणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना होईल असेही त्यांनी सांगितले. मंत्री रावते म्हणाले, एसटी महामंडळात भरती होणाऱ्या …

Read More »

रोहितची म्युझिक अकादमी सुरू लातूरात सुरु केली मर्म म्युजिक अकादमी

मुंबई : प्रतिनिधी रोहित राऊत हे नाव पहिल्यांदा झी मराठी वाहिनीवरील लिटील चॅम्प्स सारेगमपाच्या मंचावर गाजलं. चिमुरड्या गायकांच्या यादीत आपला वेगळा ठसा उमटवत तेव्हापासूनच रोहितने स्वत:चं वेगळं अस्तित्व सिद्ध केलं होतं. पार्श्वगायनाकडे वळल्यानंतर रोहितने बऱ्याच मराठी गाण्यांना सूर दिला आहे. याच रोहितने आता म्युझिक अकादमी सुरू केली आहे. रोहित्याच्या या …

Read More »

अनेक जिल्हे दुष्काळात असताना फक्त ८ तालुक्यातच दुष्काळ कसा ? विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे सवाल

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील अनेक जिल्हे भीषण दुष्काळाने होरपळून निघत आहेत. मात्र सरकार केवळ ८ तालुक्यातच दुष्काळ कसा जाहीर करते, असा प्रश्न उपस्थित करून हा प्रकार अत्यंत असंवेदनशील व शेतकऱ्यांप्रती अनास्था दाखविणारा असल्याची टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. त्यांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले असून, इतर दुष्काळी तालुक्यांमध्येही …

Read More »

क्रांतीसुर्य आणि क्रांतीज्योतीचे स्मारक पुणे विद्यापीठात उभारणार अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा

मुंबई : प्रतिनिधी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून उभारण्याच्या दृष्टीने प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पुणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांना दिल्या. या स्मारकाच्या उभारणीसाठी जुलै २०१८ च्या पुरवणी अर्थसंकल्पात निधी उपलब्ध करण्याची ग्वाही …

Read More »

उद्दीष्ट एकच, २०१९ ला भाजप आणि मित्र पक्षाला सत्तेवरून घालविणे साहित्यिक, विचारवंत, सामाजिक कार्यकर्त्यांच्या मित्र लोकशाहीचे फोरमची घोषणा

मुंबई : प्रतिनिधी मित्र लोकशाहीचे (Friends of Democracy) हा फोरम कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाही.  तरीही त्याचे प्रमुख उद्दिष्ट मात्र राजकीय आहे. म्हणजेच आज केंद्रात सत्तेत असणाऱ्या मनुवादी व लोकशाही विरोधी भाजपा व त्याच्या मित्र पक्षास २०१९ मधील निवडणुकीमध्ये सत्तेतून पायउतार करणे, हेच ह्या फोरमचे  प्रमुख उद्दिष्ट असणार आहे. त्यासाठी …

Read More »

वादाची लागण ‘हिंदू कोड बील’ ला नाटक सादरीकरणाच्या हक्कावरून वाद

मुंबई : प्रतिनिधी राज्याच्या राजकिय, सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहासात वादांना फार महत्व आहे. मात्र एखाद्या वादामुळे चांगली नाट्यकृतीच बंद होण्याची वेळ आली तर ते सामाजिकदृष्ट्या अतिशय घातक आहे. सध्या मराठी अनुवादीत हिंदू कोड बील या नाटकाच्या सादरीकरणाच्या हक्कावरून असाच वाद निर्माण झाला असून या वादाचा परिणाम या नाट्यकृतीवर होण्याची शक्यता …

Read More »

‘लगी तो छगी’साठी पुन्हा एकत्र आले शिवदर्शन-अभिजीत साबळेंचा नातू शिवदर्शन आणि शिवाजी साटमांचा मुलगा अभिजीत पुन्हा एकत्र

मुंबई  : प्रतिनिधी रियल लाईफमध्ये असो वा, रील लाईफमध्ये एखाद्याचे एखाद्याशी सूर जुळले की त्यांची चांगलीच गट्टी जमते. चंदेरी दुनियेतही असे काही दिग्दर्शक कलाकार आहेत त्यांचे सूर इतक्या चांगल्या प्रकारे जुळले आहेत की ते वारंवार एकत्र दिसतात. मराठी सिनेसृष्टीतही अशी बरीच उदाहरणं पाहायला मिळतात. शिवदर्शन साबळे आणि अभिजीत साटम हे …

Read More »

एकनाथ खडसेंना अडकविण्याची सुपारी भाजपच्याच ज्येष्ठ मंत्र्यांची सामाजिक कार्यकर्त्या कल्पना इनामदार यांचा खळबळजनक आरोप

मुंबई : प्रतिनिधी जमिन घोटाळा आणि कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊदशी संबध असल्याच्या आरोपावरून मंत्री पदावरून पाय उतार झालेले माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी अडकवण्यासाठी भाजपाच्याच एक ज्येष्ठ मंत्र्यांनी सुपारी दिली होती, असा खळबळजनक आरोप अण्णा हजारे यांच्या कार्यकर्त्या कल्पना इनामदार यांनी केला. एकनाथ खडसे यांना खोट्या केसेसमध्ये अडकाविण्यासाठी झालेल्या …

Read More »

शेतकरी कर्जमाफी योजनेत आता २००१ ते २००९ मधील थकित शेतकऱ्यांचा समावेश राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

मुंबई : प्रतिनिधी मंत्रिमंडळाच्या आजच्या निर्णयानुसार १ एप्रिल २००१ ते ३१ मार्च २००९ पर्यंत उचल केलेल्या पीक किंवा मध्यम मुदत कर्जाची ३० जून २०१६ रोजी थकित झालेल्या रकमेतून परतफेड केलेली रक्कम वगळून ३१ जुलै २०१७ पर्यंतच्या मुद्दल व व्याजासह एकूण दीड लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्यात येणार आहे. तसेच इमूपालन, शेडनेट, पॉलीहाऊस यासाठी मध्यम मुदत कर्ज घेतलेल्या थकित शेतकऱ्यांनाही छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतून दिलासा देण्याचा महत्त्वाचा …

Read More »