Breaking News

Editor

शिवसेनेच्या तीन तर भाजपच्या एका जागेच्या विजयाची औपचारीकता बाकी विलास पोतनीस, कपिल पाटलांच्या विजय जवळपास निश्चित

मुंबई : प्रतिनिधी विधान परिषदेच्या मुंबई शिक्षक मतदारसंघ, मुंबई पदवीधर मतदार संघात, कोकण शिक्षक मतदारसंघासाठी झालेल्या निवडणूकीत शिवसेनेला तीन जागांवर विजय मिळल्याचे सांगण्यात येत आहे. तर काँग्रेस-राष्ट्रवादी पुरस्कृत कपिल पाटील आणि कोकण पदवीधर मतदारसंघातून भाजपचे उमेदवार निरंजन डावखरे हे आघाडीवर असल्याची माहिती संध्याकाळ पर्यंत हाती आली असून या जागांच्या विजयाची …

Read More »

सार्वजनिक वाहतुकीसाठी पर्यावरणपूरक इंधन वापरणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील सार्वजनिक वाहतुकीसाठी पर्यावरणपूरक इंधन (क्लीन फ्युएल)  वापरणार असून यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण रोखता येणार आहे. विकासासह पर्यावरण संवर्धन शक्य होणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले. पेट्रोलियम अँड नॅचरल गॅस रेग्युलेटरी बोर्डाच्या ९ व्या सिटी गॅस डिस्ट्रीब्युशन (CGD)बिडींग राऊण्ड निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. …

Read More »

संभाजी निलंगेकरांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करा चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती नेमण्याची नवाब मलिक यांची मागणी

मुंबई : प्रतिनिधी मुख्यमंत्र्यांनी राज्याचे कामगारमंत्री संभाजी निलंगेकरांचा राजीनामा घ्यावा आणि मंत्री म्हणून राजीनामा घेता येत नसेल तर त्यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करावी आणि त्यांच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती नेमून त्यांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली. लातुरमध्ये शैक्षणिक क्लासेस चालवणाऱ्या अविनाश …

Read More »

घाटकोपरमध्ये विमान कोसळून ५ ठार मुंबईत पहिल्यांदाच नागरी भागात विमान कोसळण्याची घटना

मुंबई : प्रतिनिधी आज दुपारी १.१८ मिनिटांनी घाटकोपर परिसरातील सर्वोदय नगर भागात चार्टर्ड विमान कोसळून झालेल्या विमान अपघातात पायलटसह ५ जण ठार झाल्याची घटना घडली. जुहू हेलिपँडवरून हे विमान चाचणीच्या उद्देशाने निघाले होते. तेव्हा विमानात बिघाड झाल्याने जीवदया लेन इथल्या इमारतीचे बाधकाम सुरु असलेल्या परिसरात हे विमान कोसळले. या अपघातात …

Read More »

पर्यावरणमंत्री रामदास कदमांना राग का येतो ? प्लास्टीक बंदीप्रश्नी काही दिवसातली ही तिसरी घटना

मुंबई : प्रतिनिधी आपल्या फटकळ आणि बिनधास्त बोलण्याने नेहमी चर्चेत असलेले राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या या शैलीचा फटका आता मंत्रालयातील कर्मचारी, पत्रकार यांच्याबरोबरच शिवसेनेचेच सहकारी मंत्री दिवाकर रावते यांनाही बसला आहे. विशेष म्हणजे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतही कदम यांना आवरणे अवघड असल्याची जाणीव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह शिवसेनेच्या दुसऱ्या …

Read More »

विशेष शिक्षक आणि परिचर यांचे न्यायालयाच्या निर्णयानुसार समायोजन करावे शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांचे निर्देश

मुंबई : प्रतिनिधी केंद्र पुरस्कृत अपंग समावेशित शिक्षण (माध्यमिक स्तर) योजनेअंतर्गत नियुक्त केलेल्या विशेष शिक्षक व परिचर यांना समायोजीत करण्याचा निर्णय उच्च न्यायालयाने दिला आहे. या निर्णयानुसार संबंधित १ हजार १८५ विशेष शिक्षक आणि ७२ परिचर यांना सेवेत समायोजीत करण्यात यावेत, असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी …

Read More »

पीक कर्ज वाटप करताना बँकांनी संवेदनशीलता दाखवावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बँकांना आवाहन

मुंबई : प्रतिनिधी शेतकऱ्यांना पीक कर्ज देणे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे याचे भान ठेऊन बँकांनी काम करावे. कर्ज वाटप करताना संवेदनशीलता दाखवावी, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले. मंत्रालयातील मंत्रिमंडळ सभागृहात विविध बँकांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील हायब्रीड ॲन्युईटी रस्त्यांच्या कामाबाबत …

Read More »

मुख्यमंत्री तुम्हाला गृह खातं सांभाळता येत नसेल तर चालते व्हा औरंगाबादच्या घटनेनंतर महिलांच्या सुरक्षितेचाही प्रश्न ऐरणीवर नवाब मलिक यांची मागणी

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र पोलिस दलातील महिला कर्मचारी सुरक्षित नाहीत. त्यांच्या कुटुंबातील मुली, लोकं सुरक्षित नाहीत. मग राज्यातील महिलांच काय होणार असा सवाल करत मुख्यमंत्री तुम्ही करताय काय ? तुम्हाला खातं सांभाळता येत नसेल तर चालते व्हा असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिला. औरंगाबादमधील महिला …

Read More »

नाणार प्रकल्प करारप्रश्नी शिवसेनेचा मंत्रिमंडळ बैठकीत निषेध गुरूवारी मुख्यमंत्री आणि शिवसेनेच्या मंत्र्यामध्ये होणार चर्चा

मुंबई : प्रतिनिधी कोकणातील नाणार प्रकल्पाला होत असलेल्या विरोधामुळे शिवसेनेचे उद्योग मंत्री सुभाष देसाई आणि शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी जमिन अधिग्रहणाची अधिसूचना रद्द करण्याची घोषणा केली. तसेच यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनही सादर केले. तरी राज्य सरकारने नाणार प्रकल्पासाठी आखाती देशातील तीन कंपन्यांशी करार केला. यापार्श्वभूमीवर शिवसेनेचे …

Read More »

शिवसेनेसाठी फंड गोळा करण्यासाठीच प्लास्टीक बंदी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आरोप

मुंबई : प्रतिनिधी शिवसेनेने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याने आगामी निवडणुकांसाठी प्लास्टिक उत्पादक व्यापाऱ्यांकडून निवडणूक फंड गोळा करण्यासाठी प्लॅस्टिक बंदीचा निर्णय घेतल्याचे अशी बोचरी टिका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्यावर केली. प्लॅस्टिकबंदीचा निर्णय हा सरकारचा आहे की एका खात्याचा आहे हे स्पष्ट होत नाही. मुख्यमंत्री …

Read More »