Breaking News

Editor

पावसाळ्यात मुंबईची तुंबई होवू नये यासाठी आपतकालीन यंत्रणा सज्ज अधिक समन्वय ठेवून अडचणींवर मात करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

मुंबई : प्रतिनिधी गतवर्षी पावसाळ्यामध्ये आलेल्या आपत्ती व अडचणींना तोंड देत यावर्षी त्यावर मात करण्यासाठी सर्वच यंत्रणांनी परिपूर्ण तयारी केली आहे. शासनाच्या विविध यंत्रणांनी या काळात अधिक समन्वय ठेवून अडचणींवर मात करावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. सह्याद्री अतिथीगृह येथे राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण व  मॉन्सूनपुर्व तयारी बाबत …

Read More »

चाचा चौधरी पुस्तकातून पंतप्रधान मोदी, चाचा नेहरुंची जागा घेवू शकत नाही राष्ट्रवादी प्रवक्ते नवाब मलिक यांची टीका

मुंबई : प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा बनवण्यासाठी जाहिरातीवर सुमारे चार हजार शंभर कोटी रुपये खर्च करण्यात आले परंतु त्यातून मोदींची प्रतिमा बनली ना लोकप्रियता वाढली त्यामुळे आता त्यांनी चाचा चौधरी पुस्तकाच्या माध्यमातून लहान मुलांमध्ये आपली लोकप्रियता वाढवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते …

Read More »

भूमिहीन शेतकऱ्यांना जमिन घेण्यासाठी सरकार दुप्पट रक्कम आणि अनुदान देणार अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा-राजकुमार बडोले

मुंबई : प्रतिनिधी अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी त्यांना शेत जमिन खरेदी करण्यासाठी आता चार एकर कोरडवाहूसाठी वीस लाख तर दोन एकर बागायती शेतीसाठी १६ लाख रूपये देण्याचा तसेच या रकमेवर तब्बल १०० टक्के अनुदान देण्याचा महत्वपूर्ण निर्णय आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला असून कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण …

Read More »

वारकऱ्यांसाठी पंढरपूरच्या बाहेर चारी बाजूला मोठ्या व्यवस्था उपलब्ध करणार सार्वजनिक आरोग्यमंत्री विजय देशमुख यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी आषाढी वारी आणि कार्तिक वारीच्या निमित्ताने पंढरपूरात विठ्ठलाच्या दर्शनासाठी राज्य भरातून मोठ्या प्रमाणावर वारकरी येतात. या वारकऱ्यांना आवश्यक असणाऱ्या सोयी-सुविधा पुरविण्याचा प्रयत्न असतो. मात्र तरीही वारकऱ्यांमुळे शहरातील पायाभूत सुविधांवर मोठ्या प्रमाणावर ताण पडतो. त्यामुळे वारकऱ्यांना मुबलक प्रमाणात सोयी-सुविधा मिळाव्यात आणि त्यांची तात्पुरती निवाऱ्याची सोय व्हावी यासाठी पंढरपूर …

Read More »

‘गंध फुलांचा गेला सांगून’ उलगडणार उमा व प्रकाश भेंडे यांचा जीवनप्रवास निर्माता-दिग्दर्शक-अभिनेता प्रकाश भेंडे लिखित पुस्तक आणि ऑडिओ सीडीचे प्रकाशन

मुंबई : प्रतिनिधी कृष्णधवल चित्रपटाला रंगीत छटा प्राप्त होण्याचा काळ आपल्या सोज्वळ अभिनयाने गाजवणाऱ्या मराठमोळ्या अभिनेत्री म्हणजे उमा भेंडे. गत वर्षी जुलै महिन्यात त्या काळाच्या पडद्याआड गेल्या. त्यांचे पती प्रख्यात चित्रकार, सिनेनिर्माते-दिग्दर्शक-अभिनेता प्रकाश भेंडे यांनी त्यांच्या अनेक आठवणी, त्यांचे ४३ वर्षांचे सहजीवन आणि चित्रपटविश्वातील कटु-गोड अनुभव पुस्तक रूपात बंदिस्त केले …

Read More »

‘लगी तो छगी’मधून सुरेंद्र पाल मराठीत ८ जूनला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार

मुंबई : प्रतिनिधी मराठीचा झेंडा आज जगभरात डौलाने फडकतोय. केवळ जगभरातील प्रेक्षकांनाच नव्हे, तर अन्य भाषिक कलाकारांनाही मराठी सिनेसृष्टीचं आकर्षण निर्माण झालं आहे. यामुळेच भारतीय सिनेसृष्टीतील काही बडे कलाकार थेट मराठी सिनेमात अभिनय करून आपली हौस भागवत आहेत, तर काही निर्मितीच्या माध्यमातून मराठी रसिकांची सेवा करण्यात दंग आहेत. अशातच हिंदी …

Read More »

ईव्हीएम मशिन्स बंद पडल्या तरी पालघर-भंडाऱ्यात फेरमतदान नाहीच निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण

मुंबई: प्रतिनिधी पालघर आणि भंडारा गोंदिया मध्ये अनेक ठिकाणी मतदान यंत्रे (ईव्हीएम्स) आणि व्हीव्हीपीटीएस यंत्रे काही तांत्रिकी कारणामुळे नादुरूस्त झाली असल्याने विविध राजकीय पक्षांनी त्या ठिकाणी फेरमतदान घेण्याची मागणी केली. मात्र आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या असून कुठेही फेरमतदान घेण्यात येणार  नसल्याचे निवडणूक आयोगाने प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकाच्या माध्यमातून स्पष्ट केले. काही ठिकाणी …

Read More »

काय चाललंय या सरकारचं पालघर,भंडारा-गोंदीया निवडणूकीतील मतदान प्रक्रियेप्रकरणी प्रवक्ते मलिक यांचा संतप्त सवाल

मुंबई: प्रतिनिधी पालघर,भंडारा-गोंदियामध्ये मशीनचा गैरवापर करत सरकार निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करत आहे. देशातील लोकसभा निवडणूकीमध्ये याप्रकारच्या तक्रारी येत आहेत त्यावेळी उत्तरप्रदेशच्या गैरानामध्येसुध्दा ३०० मतदान केंद्रावर मतदान होवू शकले नाही. २५ टक्के भंडाराच्या मतदान केंद्रावर मतदान करता आले नाही. पालघरमध्येसुध्दा तीच परिस्थिती आहे. काय चाललंय या सरकारचं…असा संतप्त सवाल राष्ट्रवादी काँग्रेस …

Read More »

ईव्हीएम मशीन मध्ये बिघाड झालेल्या मतदान केंद्रावर फेरमतदान घ्या मतमोजणीवेळी व्हीव्हीपँटच्या स्लीपचीही मोजणी करा

मुंबई : प्रतिनिधी पालघर व भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीच्या मतदानावेळी या दोन्ही मतदारसंघात मोठ्या प्रमाणात मतदान यंत्रामध्ये बिघाड झाल्याने मतदान प्रक्रिया खोळंबली. भंडारा-गोंदिया मतदारसंघात तर जवळपास २५ टक्के ईव्हीएम आणि व्हीव्हीपँट यंत्रामध्ये बिघाड झाल्याने तासन् तास रांगेत उभे राहूनही मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता आला नाही. ज्या मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाला त्या सर्व …

Read More »

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी करण्यासाठीही साम ,दाम ,दंड भेदाची भूमिका घ्या शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचा मुख्यमंत्र्यांना टोला

मुंबई : प्रतिनिधी पालघरच्या लोकसभा पोटनिवडणुकीत साम , दाम, दंड  आणि भेदाची भूमिका मांडणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दररोज वाढणाऱ्या पेट्रोल-डिझेलच्या किंमतींना कमी करण्यासाठीही हीच भूमिका घ्याल का? असा उपरोधिक सवाल करत शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला. एकीकडे पालघर लोकसभेच्या पोट निवडणुकीचे मतदान सुरु असतानाच आदित्य ठाकरे यांनी पेट्रोल …

Read More »