Breaking News

Editor

आता व्यापाऱ्यांना एकाच राज्यात अनेक दाखले काढता येणार महाराष्ट्र वस्तू व सेवा कर अधिनियमामध्ये सुधारणांना मंजुरी

मुंबईः प्रतिनिधी सद्यस्थितीत व्यापार-धंद्यांसाठी एका राज्यात एकच नोंदणी दाखला घेता येत असे. मात्र जीएसटी नोंदणी दाखल्याच्या तरतूदीत सुधारणा करत व्यापाऱ्यांना आता एकाच राज्यात वेगवेगळ्या व्यापार-धंद्यांसाठी वेगवेगळे नोंदणी दाखले घेता येणे शक्य होणार असून या अदिनियमातील सुधारणेस राज्याच्या मंत्रीमंडळ बैठकीत मंजूरी देण्यात आली. याबरोबरच मूळ स्त्रोतातून कर गोळा करण्यास (टीडीएस) पात्र …

Read More »

राष्ट्रवादी पक्ष नंबर एकवर आणणार प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा निर्धार

पालघरः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तळागाळातील लोकांपर्यंत कार्यकर्त्यांनी समर्थपणे पाय रोवून कसा ठेवला आहे ते पाहण्यासाठी महाराष्ट्रभर फिरुन त्यांच्याशी संवाद साधत आहे. त्यामुळे या बळावर पक्ष एक नंबरवर आणण्यासाठी तुम्ही-आम्ही मिळून काम करुया असे आवाहन प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी पालघरमध्ये जिल्हा कार्यकारिणी मेळाव्यामध्ये केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार …

Read More »

आता डॉ. आंबेडकर स्मारकाच्या उंचीवरून वादंगाचे राजकारण आठवले यांच्या नंतर आनंद आंबेडकर यांनाही आक्षेप

मुंबई: प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या उंचीचा वाद ताजा असतानाच आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या उंचीवरून देखील राजकिय वादंग निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे. केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी या स्मारकाच्या उंचीवर सर्वप्रथम आक्षेप घेतल्यानंतर आता रिपब्लिकन सेनेचे नेते आनंदराज आंबेडकर यांनी ही या नियोजित स्मारकाच्या …

Read More »

कँनल पुरग्रस्तांच्या मदतीसाठी सरकारची ३ कोटींची मदत पालक मंत्री गिरीष बापट यांची माहिती

मुंबईः प्रतिनिधी पुणे येथील दांडेकर पूलाजवळील कँनल फुटून आलेल्या पुरामुळे या भागातील नागरीकांना पुर परिस्थितीचा सामना करावा लागला. तसेच अनेक घरांचे नुकसान झाले. त्यामुळे या पुरग्रस्तांना मदत करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून त्यासाठी ३ कोटी रूपयांचा मदत निधी देण्यात येणार असल्याची माहिती पुणे जिल्ह्याचे पालक मंत्री गिरीष बापट यांनी …

Read More »

महात्मा गांधीची खादी १५० देशांपर्यंत पोहचविणार केंद्रीय राज्यमंत्री गिरीराज सिंह यांचा विश्वास

मुंबईः प्रतिनिधी केंद्रातील विद्यमान मोदी सरकारने महात्मा गांधी यांच्या ‘राष्ट्रनिर्मितीसाठी खादी’ या मंत्राला ‘राष्ट्र परिवर्तनासाठी खादी’ असा मंत्र देऊन खादीला जगातील ६० देशांपर्यंत पोहचविली असून लवकरच खादी १५० देशांपर्यंत पोहचविणार असा विश्वास केंद्रीय सूक्ष्म, लघू, मध्यम उद्योग राज्यमंत्री गिरिराज सिंह यांनी मुबईत मंगळवारी केले. महात्मा गांधी यांच्या १५०व्या जयंतीचे औचित्य …

Read More »

भाजपामधील एकाधिकारशाहीच्या विरोधात आमदार डॉ. देशमुखांचा राजीनामा पक्षांतर्गत असलेली धुसफूसीमुळे अनेकजण बाहेर पडण्याच्या तयारीत

मुंबई : प्रतिनिधी आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणूका नजरेसमोर ठेवत आपले राजकिय भवितव्य सुरक्षित करण्यासाठी भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी अनेक आयाराम रांगेत आहेत. मात्र भाजपमधील पक्षांतर्गत एकाधिकारशाहीला कंटाळून भाजपमधून बाहेर पडणाऱ्यांची सुरुवात झाली असून भाजपचे नागपूर जिल्ह्यातील कटोलचे आमदार डॉ.आशिष देशमुख यांनी आपल्या आमदाराकीचा आणि पक्षसदस्यत्वाचा राजीनामा पत्राद्वारे आज दिला. लवकरच …

Read More »

सरकारला दूर करण्याचे पहिले पाऊल शेतकरी वर्गातूनच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा विश्वास

मुंबई : प्रतिनिधी या देशातील शेतकरी वर्ग नरेंद्र मोदी सरकारच्याविरोधात गेला आहे आणि त्याचंच प्रत्यंतर दिसायला लागल्यामुळे चिडून दिल्लीमध्ये पोलिसांनी अतिरेकी कारवाई केली आणि शेतकऱ्यांना नामोहरण करण्याचा प्रयत्न झाला परंतु देशातील शेतकरी नरेंद्र मोदींच्या दडपशाहीला घाबरणार नाही आणि समर्थपणे एकत्र येवून हे सरकार दूर करण्याचे पहिले पाऊल टाकेल असा विश्वास …

Read More »

सरकारच्या असत्य, हिंसा आणि अशांती तत्वांविरोधात राष्ट्रवादीचे मौनव्रत्त राज्यभर राष्ट्रवादीने धरणे आणि मौनव्रतातून साधला सरकारवर निशाणा

मुंबई : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने आज मंत्रालयाजवळ असणाऱ्या महात्मा गांधीजींच्या पुतळयासमोर तोंडाला काळी फित बांधून मौनव्रत घेत धरणे आंदोलन करण्यात आले. महात्मा गांधीजींची तत्वे आणि सत्ताधारी भाजप सरकारची आत्ताची तत्वे या फलकासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने राबवण्यात आलेल्या जवाब दो मोहिमेतील प्रश्नांचे फलकही याठिकाणी लक्ष वेधून घेत होते. सुरुवातीला महात्मा …

Read More »

म.गांधींच्या जयंती दिनीच मंत्रालयात स्वच्छतेचे तीन तेरा लाडावलेल्या आमदाराच्या कंपनीला काम देवूनही स्त्री-पुरूष स्वच्छतागृहांची दुरावस्था

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील प्रत्येक घराघरात स्वच्छतेचे महत्व पटावे म्हणून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती दिन स्वच्छता दिवस म्हणून पाळण्याचे राज्य सरकारने जाहीर केले. परंतु मंत्रालयातील स्त्री-पुरूष स्वच्छतागृहांची स्वच्छता राखण्यासाठी भाजपच्या लाडावलेल्या आमदाराच्या कंपनीला काम देवूनही स्वच्छतेचीच दुरावस्था झाल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. संपूर्ण राज्याचा कारभार मंत्रालयातून चालविला जातो. …

Read More »

संभाजी भिडेंना थेट भारतरत्न किंवा महाराष्ट्र भूषणच द्या ! विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांची सरकारवर उपरोधिक टीका

मुंबई : प्रतिनिधी संभाजी भिडेंवर सरकारचा विशेष स्नेह वारंवार दिसून आला आहे. त्यामुळे त्यांच्यावरील फक्त गुन्हे मागे घेण्याऐवजी त्यांना थेट महाराष्ट्र भूषण किंवा भारतरत्नच जाहीर करा, अशी उपरोधिक टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. संभाजी भिडे यांच्यावरील गुन्हे मागे घेण्याच्या सरकारच्या निर्णयाबाबत प्रतिक्रिया देताना विखे पाटील …

Read More »