Breaking News

क्रांतीसुर्य आणि क्रांतीज्योतीचे स्मारक पुणे विद्यापीठात उभारणार अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा

मुंबई : प्रतिनिधी

क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून उभारण्याच्या दृष्टीने प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पुणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांना दिल्या. या स्मारकाच्या उभारणीसाठी जुलै २०१८ च्या पुरवणी अर्थसंकल्पात निधी उपलब्ध करण्याची ग्वाही अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

काल मंगळवारी सहयाद्री अतिथीगृह, मुंबई येथे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या वंशज सौ. निता होले आणि स्मारक समितीच्या सदस्यांच्या एका शिष्टमंडळाने अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेतली. क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारक उभारण्याबाबत शिष्टमंडळाने मागणी केली. या मागणीला त्वरीत प्रतिसाद देत अर्थमंत्र्यांनी पुणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांना दुरध्वनीद्वारे सुचना देत प्रस्ताव सादर करण्यास सांगितले. या स्मारकासाठी निधीची कमतरता भासणार नाही असे आश्वासन त्यांनी यावेळी शिष्टमंडळाला दिले.

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेच्या माध्यमातून संसदीय संघर्षाच्या फलस्वरुप पुणे विद्यापीठाला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे नाव देण्यात आले आहे. नागपूर विद्यापीठाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे नाव, अमरावती विद्यापीठाला वैराग्यमुर्ती गाडगेबाबा यांचे नाव देण्याबाबत सुध्दा सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेच्या माध्यमातून यशस्वी संघर्ष केला आहे. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या वारसांच्या मागण्याच्या पुर्ततेबाबत सुध्दा त्यांनी विधानसभेच्या माध्यमातून यशस्वी लढा दिला आहे. संत तुकाराम महाराजांचे पट्टशिष्य संताजी जगनाडे महाराज, 1858 च्या स्वातंत्र्य लढयात ब्रिटीशांशी झुंज देत शहीद झालेले वीर बाबुराव शेडमाके, आनंदवनाच्या माध्यमातून कुष्ठरोग्यांच्या जीवनात आनंद फुलविणारे थोर समाजसेवक बाबा आमटे यांच्या स्मृत्यर्थ टपाल तिकीटांचे प्रकाशन करण्यासाठी सुध्दा त्यांनी केंद्र सरकारशी सतत पत्रव्यवहार व पाठपुरावा करुन त्यात यश मिळविले.

क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारक यांचे भव्य स्मारक अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने पुणे विद्यापीठ परिसरात उभे राहणार असून महापुरुषांना अनोख्या पध्दतीने आदरांजली देण्याच्या त्यांच्या विविध निर्णयांच्या मालिकेत या स्मारकाच्या माध्यमातून नव्या कार्याची नोंद होणार आहे.

 

Check Also

चंद्रकांत पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडत अजित पवार म्हणाले, शरद पवार यांचा मुलगा…

लोकसभा निवडणूकीच्या काही महिने आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नाव घेत ७० हजार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *