Breaking News

Editor

आशा स्वयंसेविकांना वाढीव मोबदला १ जुलैपासून मिळणार आरोग्य विभागाचा शासन निर्णय जाहीर

मुंबई : प्रतिनिधी ग्रामीण भागातील आरोग्य विभागाचा कणा ओळखल्या जाणाऱ्या आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात वाढ करण्याचा महत्वपूर्ण निर्णय काही दिवसांपूर्वी घेण्यात आला होता. त्यासंदर्भात आज आरोग्य विभागाने शासन निर्णय जाहीर केला आहे. हा वाढीव मोबदला दि. १ जुलैपासून मिळणार असल्याचे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे. आशा स्वयंसेविकांच्या मानधनात …

Read More »

मनिषा म्हैसकर यांच्याकडे पर्यावरण विभागाचा पदभार राज्य सरकारकडून तीन सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई: प्रतिनिधी काही महिन्यांपूर्वी नगरविकास विभागातून राजशिष्टाचार विभागाच्या प्रधान सचिव पदी नियुक्ती करण्यात आलेल्या सनदी अधिकारी मनिषा म्हैसकर यांच्याकडे आता पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव पदी नियुक्ती करण्यात आली. त्यासह अन्य दोन सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. मुंबई महापालिकेच्या सह आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आलेले आशुतोष सलिल यांची पर्यटन विभागाच्या …

Read More »

कोविड-19 औषधांचा काळाबाजार करणाऱ्यांची तक्रार या नंबरवर: ही पर्यायी औषधे वापरा अन्न व औषध प्रशासनमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे आवाहन

मुंबई: प्रतिनिधी कोविड-19 या कोरोना विषाणूच्या आजाराच्या उपचारासाठी लागणारी औषधे मुबलक प्रमाणात उपलब्ध व्हावी त्यांचा तुटवडा भासू नये या साठी अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे हे विशेष लक्ष ठेऊन आहेत. सातत्याने अधिकाऱ्याच्या, पुरवठादारांच्या बैठका घेऊन ते आढावा घेत आहेत. तर रुग्णालय, फार्मसी या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन …

Read More »

भानुशाली दुर्घटनेतील मृतकांच्या वारसांना ५ लाख: कंत्राटदाराची जबाबदारी तर जखमींना ५० हजाराची म्हाडाकडून जाहीर

मुंबई: प्रतिनिधी शहराच्या ऐन मोक्याच्या ठिकाणी असलेल्या फोर्टमधील भानुशाली इमारतीचा भाग कोसळून ६ जणांचा मृत्यू तर ३ जण गंभीररित्या जखमी झाले असून १८ रहिवाशांना सुखरूपरित्या बाहेर काढण्यात यश आले. यापैकी मृतकांच्या वारसांना ५ लाखाची मदत तर गंभीर जखमी झालेल्यांना ५० हजार आणि किरकोळरित्या जखमी झालेल्यांना २५ हजार रूपयांची तातडीने मदत …

Read More »

सोलापूर जिल्ह्यातील या ३१ गावात संचारबंदी लागू जिल्हाधिकारी शंभरकर यांचे आदेश जारी

सोलापूर : प्रतिनिधी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, संसर्ग कमी करण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील पाच तालुक्यातील ३१ गावात गुरूवार, १६ जुलैच्या रात्री २३.५९ वाजलेपासून २६ जुलैच्या रात्री २४.०० पर्यंत दहा दिवस संचारबंदी लागू करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. उत्तर सोलापूर तालुक्यातील मार्डी, तिऱ्हे, पाकणी, कोंडी, बाणेगाव, …

Read More »

हवं तर रस्त्याचा मार्ग बदला, पण वटवृक्ष वाचवा आदित्य ठाकरेची नितीन गडकरींना विनंती

मुंबई: प्रतिनिधी मौजे भोसे (जि. सांगली) येथील राष्ट्रीय महामार्गाच्या कामामध्ये येणारा चारशे वर्ष पुरातन असलेला वटवृक्ष वाचविण्याबाबत राज्याचे पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना पत्र लिहून विनंती केली आहे. त्याचबरोबर मंत्री ठाकरे यांनी सांगली जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करुन हा वटवृक्ष वाचविण्याबाबत कार्यवाही …

Read More »

कोरोना: मृत्यू दरात घट, पण दुसऱ्यांदा ६ दिवसात १ हजाराने मृत्यू वाढले २४ तासात ५५०० घरी तर ८६०० नवे रूग्ण

मुंबई : प्रतिनिधी राज्यात मृतकांच्या टक्केवारीत घट झाल्याचे दिसत असले तरी मागील १५ दिवसात दर ६ दिवसाला १००० मृतकांची नोंद होत आहे. १० जुलै रोजी ९ हजार ८९३ इतकी मृतकांची संख्या होती. तर आज १६ जुलै अखेर ही संख्या ११ हजार १९४ वर पोहोचली आहे. तर ४ जुलै ते ९ …

Read More »

राऊत हे सेनेचे खासदार मात्र दिल्लीत पवारांचा माणूस म्हणून ओळख भाजपा खासदार नारायण राणे यांची टीका

मुंबई: प्रतिनिधी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यावर सातत्याने टीका करण्यात आली. मात्र आता त्याच सामनातून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असलेल्या शरद पवारांचा उदोउदो करण्यात येत असून संजय राऊत हे जरी शिवसेनेचे खासदार असले तरी दिल्लीत मात्र ते पवारांचा माणूस म्हणून ओळख असल्याची टीका भाजपा खासदार …

Read More »

राज्यातील वृद्ध कलावंतांना सरकारकडून मिळणार थकीत मानधन सांस्कृतिक राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील वृद्ध कलावंतांचे थकित असलेले मानधन देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली. शासनातर्फे राज्यातील वृद्ध कलावंतांना मासिक मानधन देण्याची योजना राबविली जाते. स्वतःच्या कलेने लोकांचे मनोरंजन करणाऱ्या कलावंतांना वृद्धापकाळात कलेचे सादरीकरण शक्य होत नाही. मात्र कला हीच …

Read More »

दिलासादायक : मातामृत्यू कमी असलेल्या राज्यांच्या यादीत महाराष्ट्र २ ऱ्या स्थानी युनोच्या शाश्वत विकास ध्येयाची (एसडीजी) महाराष्ट्राने केली पूर्तता

मुंबई : प्रतिनिधी कोरोनाचा प्रादुर्भाव जाणवत असताना राज्यासाठी सुखावणारी वार्ता सॅम्पल रजिस्ट्रेशन सर्वेच्या (एसआरएस) आज प्रकाशित झालेल्या अहवालातून समोर आली असून मातामृत्यू दर कमी असणाऱ्या राज्यांच्या यादीत यावेळेसही महाराष्ट्राने दुसरा क्रमांक मिळवित सातत्य राखले आहे. राज्यात आरोग्य विभागामार्फत मातामृत्यू रोखण्यासाठी सुरू असलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे महाराष्ट्राने हे यश मिळविले आहे. केंद्रीय …

Read More »