Breaking News

Editor

कॅप्टन अमोल यादव यांच्या विमान प्रकल्पास राज्य सरकार देणार जमिन उद्योग मंत्री सुभाष देसाई यांची ग्वाही

मुंबई : प्रतिनिधी कॅप्टन अमोल यादव यांनी भारतीय बनावटीचे विमान तयार केले आहे. त्यांच्या पुढील प्रकल्पासाठी महाराष्ट्र शासनाच्यावतीने सर्व प्रकारचे सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज येथे दिली. कॅप्टन अमोल यादव यांनी मोठ्या कष्टाने भारतीय बनावटीचे विमान तयार केले आहे. त्यांचे प्रात्यक्षिकदेखील यशस्वी झाले आहे. यापुढे …

Read More »

मृत कोरोनाबाधितांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या सामाजिक संस्था, संघटनांना आता विमा संरक्षण ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यु पावलेल्या व्यक्तींचा अंत्यसंस्कार विधी करणारे ग्रामीण भागातील शासकीय सेवेत नसलेल्या सामाजिक संस्था, संघटनेचे कर्मचारी यांना २५ लाख रुपयांचे विमा कवच देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. यासंदर्भातील शासन परिपत्रक आज निर्गमित करण्यात आले असून सर्व जिल्हा परिषदांना यासंदर्भात सूचना …

Read More »

मुख्यमंत्री ठाकरे यांनी मंत्री अशोक चव्हाणांवर सोपविली ही जबाबदारी मराठा समाजाच्या इतर मागण्यांबाबत तोडगा चव्हाण काढणार

मुंबई: प्रतिनिधी मराठा समाजाच्या विविध मागण्यांच्या पाठपुराव्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीकडे सोपवण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. मुख्यमंत्र्यांच्या निर्णयानुसार मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात संबंधित विभागाचे मंत्री व सचिवांची बैठक घेऊन शासनाला प्रस्ताव सादर करण्याची जबाबदारी अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील उपसमितीकडेच सोपवण्यात …

Read More »

मंदिरे उघडा, वारकरी सांप्रदयाच्या आंदोलनात प्रकाश आंबेडकर सहभागी पंढरपुरातील आंदोलनात सहभागी होणार

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील सर्व मंदिरे उघडावीत, भजन कीर्तन करायला परवानगी दिली जावी या मागणीसाठी विश्व वारकरी सेनेने पुकारलेल्या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पाठिंबा दिला असून, ते स्वतः ३१ ऑगस्ट रोजी पंढरपुरात आयोजित आंदोलनाला पाठिंबा म्हणून सहभागी होणार आहेत. वारकरी संप्रदयातील साधु-संत त्याचप्रमाणे मठातील महाराज हे …

Read More »

आढावा बैठकीत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांनी दिल्या या सूचना कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही याची दक्षता घेत साधेपणाने गणेशोत्सव साजरा करावा

मुंबई : प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येणारा गणेशोत्सव हा सामाजिक भान राखत शांततेने साजरा करावा. याकाळात गर्दी होणार नाही, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही याची दक्षता घ्यावी असे आवाहन करतानाच कोरोना युद्धाच्या मध्यावर आपण काही ठिकाणी शिखराकडे गेलो तर काही ठिकाणी जात आहोत, त्यामुळे गाफील न राहाता आतापर्यंत ज्या उपाययोजना सुरू आहेत …

Read More »

पावसाळी अधिवेशन १४ दिवस चालणार विधिमंडळाकडून तात्पुरती कामकाज पत्रिका तयार

मुंबई : प्रतिनिधी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मागील दोन महिन्यापासून सतत पावसाळी अधिवेशनाची तारीख पुढे ढकलण्यात येत होती. मात्र विधिमंडळ प्रशासनाने सध्या निश्चित करण्यात आलेल्या पावसाळी अधिवेशनाच्या ७ सप्टेंबर २०२० पासूनच्या तात्पुरती कामकाजाची पत्रिका तयार केली असून व अधिवेशनाचे कामकाज प्रत्यक्ष १० दिवसाचे चालणार आहे. तर एकूण १४ दिवस कामकाजाचा कालावधी …

Read More »

पार्थ, सध्या जे काम करतोयस तेच कर राजकारणातल्या संधीच बघू पवार कुटुंबियाकडून पार्थची समजूत

बारामती-मुंबई : विशेष प्रतिनिधी बॉलीवूड अभिनेता स्व.सुशांतसिंग राजपूत यांच्या आत्महत्येची चौकशी सीबीआय मार्फत करावी अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी केल्यानंतर यासंदर्भात त्यांचे आजोबा शरद पवार यांनी पार्थला जाहीररित्या फटकारले. त्यामुळे पवार कुटुंबियामध्ये तणाव निर्माण झाल्याची चर्चेला उधाण आले. त्यावर अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार …

Read More »

न्यूज वाल्यांचा कोयंडा… सर्जनशील लेखक सुदेश जाधव यांची प्रसारमाध्यमांची समाजावर पडलेल्या कोयंडारूपाची कथा

गावांत  कोरोनाची  बातमी  अचानक  गायब  झाली. कुणी तरी आत्महत्या केल्याची बातमी सतत टीव्हीला येऊ लागली. लोकांना खूप काहीतरी तूटल्या सारखं वाटू लागलं. एखाद्या गोष्टीची सवय लागली आणि ती सवय अचानक थांबली की मेंदू सैरभैर होतो, तसं गाववाल्यांच झालं. अचानक कोरोनाची बातमी गेल्यापासून लोकांच्या घशाखाली घास उतरे ना. कोरोना अचानक नाहीसा  झाल्यापासून. लोक बिंधास्त तालुक्याला जाऊ लागली. एकमेकांशी बोलू लागली. एकमेकांच्या घरात चहापाणी करू लागले. एकंदरीत सगळं काही चंगासी होऊन गेलं. गावांत चावडीवर बसून आता एकच चर्चा सुशांत सिंग राजपुत. अनिल हा गावाचा खबरी माणूस चुली पासून दिल्ली पर्यंतच्या सगळ्या खाजगी बातम्या त्याला दिवसभरात कोण कुठून पोहोचवायचा हे तोच …

Read More »

शिक्षकांना दिलासा: कोविड कामातून मुक्त तर सरप्लस शिक्षकांना शाळेत बोलविणार शालेय शिक्षण विभागांचे शिक्षण अधिकाऱ्यांना आदेश

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोविड प्रसार रोखण्यासाठीच्या कामासाठी नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षकांना स्थानिक प्रशासनाशी चर्चा करून त्या कामातून मुक्त करण्यासाठी राज्य सरकारने शिक्षण अधिकाऱ्यांना आदेश देत सरप्लस अर्थात अतिरिक्त शिक्षकाना त्यांच्या जवळच्या किंवा मूळ शाळांमध्ये बोलावून ऑनलाईन शिक्षणासाठी त्यांचा उपयोग करण्याचे आदेश शालेय शिक्षण विभागाने आज राज्यातील सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना दिल्याची माहिती …

Read More »

कोरोना : बाधितांपेक्षा घरी जाणाऱ्यांची संख्या जास्त मात्र एकूण संख्या ६ लाखांवर ८४९३ नवे बाधित रूग्ण, ११ हजार ३९१ बरे झाले तर २२८ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या ६ लाख ४ हजार ३५८ वर पोहोचली असून देशातील इतर राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक आहे. आज ८४९३ नव्या बाधित रूग्णांचे निदान झाल्याने १ लाख ५५ हजार २६८ इतक्यावर पोहोचली असून ११ हजार ३९१ हजार बरे होवून घरी गेल्याने एकूण घरी जाणाऱ्यांची ४ लाख ३८ हजार …

Read More »