Breaking News

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारकाचा आराखडा दोन महिन्यात येणार सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी

लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या चिरागनगर येथील आंतरराष्ट्रीय स्मारकाचा आराखडा येत्या दोन महिन्यात प्राप्त होईल त्यांनंतर त्यासाठी लागणारा खर्च आणि पुढील कार्यवाही घोषित केली जाईल अशी माहिती सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी मंत्रालयात  दिली.

अण्णाभाऊ साठे यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक व्हावे ही खूप वर्षांपासूनची मागणी आहे.  या सरकारच्या काळात दिलीप कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली या आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या संदर्भात एक समिती गठीत करण्यात आली आहे. या कमिटीची बैठक बुधवारी राज्यमंत्री कांबळे यांच्या दालनात झाली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत माहीती दिली.

आमदार रमेश कदम जेलमध्ये राहुनही कट कारस्थान करू शकतात

लोकशाहीर साठे महामंडळ घोटाळाप्रकरणात राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी एक नवा संशय व्यक्त करत या प्रकरणातील आरोपी रमेश कदम आणि त्यांचे भाऊ उमेश कदम यांना वेगवेगळ्या ठिकाणी ठेवण्याचे निर्देश तुरुंग अधीक्षकांना दिले आहेत. यासंदर्भात माहिती देताना कांबळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, सीआयडीने या महामंडळ घोटाळ्याशी संबंधित सर्व आधीच कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. ती पूर्ण इमारत ताब्यात घेतली होती. सील केली होती. मात्र  तरीही कदम यांचे बंधू उमेश यांच्यासह कहाणी लोकांनी पूर्ण नासधूस केली आणि साहित्य पळवले. या लोकांनी  जेलमध्ये जाण्यासाठी हे कृत्य केलेय, असा संशय. ठरवून प्लॅन करून यांना आत बोलावले असावे, असा संशय कांबळे यांनी व्यक्त केला आहे.

कांबळे यांनी सांगितले कि, आरोपी कदम यांच्या भावासह अन्य ४-५ लोकांवर पोलिसांनी दरोडा, शासकीय कार्यालय तोडफोड असा गुन्हा दखल केला. उमेश कदम आणि साथीदाराला अटक केली. आज ते न्यायालयीन कोठडीत आहेत.  जर सीआयडीने कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत तर असा प्रयत्न केले. रमेश कदमांनी जेल मध्ये बोलावून घेऊन कटकारस्थान करण्याचा संशय येत आहे.

म्हणून तुरुंग प्रशांसाला निर्देश दिले की यांना एकत्रित ठेवू नये. जेल प्रशासनाने काळजी घ्यावी अशा सूचना केल्या आहेत, अशी माहिती कांबळे यांनी दिली.

Check Also

शिक्षण पद्धतीत अमुलाग्र बदलासाठी “स्टार्स” प्रकल्पाची अंमलबजावणी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील शिक्षण पद्धतीचे अध्यापन, अध्ययन व परिणाम याचे बळकटीकरण ( Strengthening Teaching-learning and Results …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *