Breaking News

लिटरला २७ रूपये द्या अन्यथा भाजपच्या आमदार, खासदारांना फुकट दुध देणार गरज पडल्यास शहरांचा दुध पुरवठा रोखण्याचा संघर्ष समितीचा इशारा

मुंबई : प्रतिनिधी

दुधाला सरकारने जाहीर केल्या प्रमाणे प्रतिलिटर किमान २७ रुपये भाव द्या या प्रमुख मागणीसाठी राज्यभर आंदोलनाला आजपासून  सुरुवात करण्यात आली आहे. जर राज्य सरकारने २७ रूपये लिटरला दुधाचा भाव न दिल्यास हेच दूध भाजपच्या आमदार आणि खासदारांना फुकट वाटप करणार असल्याचा इशारा  दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीचे डॉ. अजित नवले यांनी दिला.  शेतकऱ्यांना लुटता कशाला फुकटच न्या असे म्हणत दुध उत्पादकांनी फुकट दुध वाटप आंदोलन सुरू करण्यात आले. हे आंदोलन मराठवाड्यातील औरंगाबाद, परभणी, पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यात दुध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने हे आंदोलन करण्यात येत आहे.

लुटणे थांबवा, शरम नसेल तर ‘फुकटच’ न्या असे ग्रामसभांमध्ये ठराव करत सरकारला मोफत दुध पुरविण्याचा पवित्रा दुध उत्पादकांनी घेतला आहे. दिनांक ३ ते ९ मे या काळात राज्यभर चौका चौकात मोफत दुध वाटप सप्ताह आयोजित करण्यात येणार आहे.

आंदोलनाच्या तयारीसाठी अहमदनगर, औरंगाबाद, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, परभणी व बीड जिल्ह्यात दुध उत्पादकांचे जिल्हाव्यापी मेळावे घेण्यात आले आहेत. या जिल्ह्यामध्ये मेळावे घेऊन फूकट दूध वाटप आंदोलनाचे निय़ोजन करण्यात आले आहे.

सर्व पक्ष, संघटनांचे  कार्यकर्ते, नेते या आंदोलनात सहभागी होत आहेत. सात दिवस या आंदोलनाच्या समर्थनार्थ ठिकठीकाणी रास्तारोको, धरणे, मोर्चे व घेराव घालून आंदोलन तीव्र करण्यात येणार असल्याचे दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीचे डॉ.अजित नवले यांनी सांगितले आहे.

 

Check Also

बाळासाहेब थोरात यांचा आरोप तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बैठकीचे आश्वासन

दुधाचे भाव २५ रुपयांपर्यंत खाली आले आहेत, राज्यभर आंदोलने आणि मोर्चे सुरू आहेत. सरकार मात्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *