Breaking News

विजय वडेट्टीवार विधानसभेतील नवे विरोधी पक्षनेते ? राज्यातील चवथ्या टप्प्यातील मतदानानंतर नाव जाहीर होण्याची शक्यता

मुंबईः प्रतिनिधी
विधानसभेतील राधाकृष्ण विखे-पाटील यांचा विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी स्विकारल्यानंतर विरोधी पक्षनेते पदी नव्या व्यक्तीची निवड करण्याच्या हालचालींना काँग्रेसमध्ये वेग आला आहे. विरोधी पक्षनेते पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार यावरून अनेकांमध्ये उत्सुकता असली तरी या पदाची माळ विदर्भातील काँग्रेसचे आमदार आणि सभागृहातील उपगटनेते विजय वडेट्टीवार यांच्या गळ्यात पडणार असल्याची माहिती काँग्रेसमधील विश्वसनीय सूत्रांनी दिली.
विदर्भ हा कधीकाळी काँग्रेसचा बालकिल्ला होता. परंतु मागील काही वर्षात हा विभाग भाजपच्या ताब्यात गेला. सध्या होत असलेल्या लोकसभा निवडणूकीत विदर्भातील १० मतदारसंघापैकी किमान ५ ते ७ सात ठिकाणी विजय मिळण्याची आशा काँग्रेसला आहे. तसेच तीन-चार महिन्यानंतर लगेच राज्यातील विधानसभेच्या निवडणूका होत असल्याने विधानसभेतील विरोधी पक्षनेते पदी विदर्भातीलच व्यक्तीला नियुक्त करण्याची रणनीती पक्षाकडून आखण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
विदर्भात ओबीसी समाजाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर आहे. विजय वडेट्टीवार हे ही ओबीसी समाजाचे आहेत. तसेच विधानसभेत नेहमी आक्रमक भूमिका मांडत असल्याने विखे-पाटील यांच्यापेक्षा वक्तृत्वातही उजवे आहेत. याशिवाय प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याशी त्यांचे सलोख्याचे संबध आहेत. तसेच ते सभागृहातील उपगटनेते पदी म्हणून काम पहात आहेत. त्यामुळे त्यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात असून लोकसभेची रणधुमाळी संपली की त्यांचे नाव जाहीर करण्यात येणार असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.

Check Also

तिसऱ्या टप्प्यात ११ लोकसभा मतदारसंघात ५ वाजेपर्यंत ५३ टक्के मतदान

लोकसभा निवडणूकीत महाराष्ट्रासह देशभरात ९४ लोकसभा मतदारसंघात आज मतदान पार पाडले. महाराष्ट्रातील ११ मतदारसंघातील मतदानाची …

One comment

  1. विजय भाऊ ?️?️?️

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *