Breaking News

भाजपाच्या ५व्या यादीत महाराष्ट्रातील तीन जणासह १११ जणांची उमेदवारी जाहिर

भाजपाने आज लोकसभा उमेदवारांची पाचवी यादी जाहिर केली असून या यादीत महाराष्ट्रातील तीन जागांचा समावेश आहे. सोलापूरातून अखेर माळशिरसचे आमदार राम सातपुते यांना लोकसभेसाठी उमेदवारी जाहिर करण्यात आली आहे. त्यामुळे इतर नवख्या उमेदवारांचा पत्ता कट झाला आहे. तर भंडारा-गोंदियातून सुनिल बाबूराव मेंढे यांना तर गडचिरोली-चिमूर मतदारसंघातून अशोक नेते यांना उमेदवारी जाहिर करण्यात आली आहे.

याशिवाय उत्तर प्रदेशमधून मनेका गांधी यांचे सुपुत्र वरूण गांधी यांना पिलभीतमधून उमेदवारी नाकारण्यात आली आहे. त्यांच्या जागेवर जितेंन प्रसाद यांना उमेदवारी जाहिर करण्यात आली आहे. सुलातनपुरमधून मनेका गांधी यांना उमेदवारी जाहिर करण्यात आली आहे. याशिवाय पश्चिम बंगाल उच्च न्यायालयाचे वादग्रस्त न्यायाधीश अभिजित गंगोपाध्याय यांना तामलुक येथून उमेदवारी देण्यात आली आहे. याशिवाय बी आर चोप्रा यांच्या रामायम मालिकेतील रामाची भूमिका करणारे अरूण गोहिल यांना मेरठ येथून उमेदवारी जाहिर करण्यात आली आहे. तर कुरुक्षेत्रमधून काँग्रेसचे खासदार नवीन जिंदाल यांना उमेदवारी जाहिर करण्यात आली आहे.

तसेच भाजपाने आज जाहिर केलेल्या १११ उमेदवारांच्या यादीत सिक्किम, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, तेलंगणा, महाराष्ट्र, झारखंड, बिहार आदी राज्यातील उमेदवारांची नावे जाहिर केली आहेत.

 

Check Also

वंचितच्या शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवाराच्या वाहनावर हल्ला

वंचित बहुजन आघाडीच्या शिर्डी लोकसभा मतदारसंघातील उमेदवार उत्कर्षा रुपवते यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *