Breaking News

काँग्रेसकडून लोकसभा उमेदवारांच्या तीन नावांची ५वी यादी जाहिर

लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आपली पाचवी यादी जाहिर केली आहे. या यादीत चंद्रपूरच्या जागेसाठी एक आणि राजस्थानातील दोन अशा एकूण तीन उमेदवारांची नावे काँग्रेसने जाहिर केली.

२०१९ ला मोदी लाटतेही काँग्रेसचे उमेदवार बाळू धानोरकर यांनी माजी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर यांना पराभत करत काँग्रेसची जागा परत मिळवून दाखविली. तसेच त्यांच्या आमदारकीच्या जागेवर बाळू धानोरकर यांनी त्यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांना निवडूण आणले. मात्र काही महिन्यांपूर्वी बाळू धानोरकर यांचे आकस्मिक निधन झाले. त्यामुळे विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी त्यांच्या मुलीसाठी बाळू धानोरकर यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी दावा केला होता.

परंतु काँग्रेस श्रेष्ठींनी बाळू धानोरकर यांच्या पत्नी तथा विद्यमान आमदार प्रतिभा धानोरकर यांना २०२४ च्या लोकसभेसाठी उमेदवारी जाहिर केली आहे. त्यामुळे विजय वडेट्टीवार यांच्या कन्येला लोकसभा नाही किमान विधानसभेत प्रवेश करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

तर राजस्थानमधील जयपूरमधील काँग्रेसचे उमेदवार सुनिल शर्मा यांना नुकतीच उमेदवारी जाहिर करण्यात आली होती. मात्र त्यांच्याबाबतचे जूने प्रकरण बाहेर आल्याने त्यांची उमेदवारी रद्द करत त्यांच्या ऐवजी सुनिल खचिरावास यांना उमेदवारी जाहिर करण्यात आली आहे. तर दौसा येथून मुरारी लाल मीना यांना उमेदवारी जाहिर करण्यात आली आहे.

Check Also

वर्षा गायकवाड यांचा आरोप, …बहुजन समाजातील मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न

शिक्षण हा प्रत्येक मुलाचा मूलभूत अधिकार असून ६ ते १४ वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *