Breaking News

उद्योगपती आणि काँग्रेस खासदार नवीन जिंदाल यांचा भाजपात प्रवेश

उद्योगपती आणि काँग्रेसचे माजी खासदार नवीन जिंदाल यांनी रविवारी पक्षाचा राजीनामा देऊन लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला. जिंदाल स्टील अँड पॉवरच्या अध्यक्षांनी सोशल मीडियावर आपल्या ट्विटद्वारे  काँग्रेस नेतृत्व आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे आभार मानले आहेत.

प्रसिध्द उद्योगपती आणि कुरुक्षेत्रचे खासदार नवीन जिंदाल यानी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत भाजपामध्ये प्रवेश केला. भाजपाचे सरचिटणीस विनोद तावडे यांच्या उपस्थित भाजपाच्या मुख्यालयात प्रवेश केला.

यासंदर्भात नवीन जिंदाल यांनी एक्स या मायक्रो ब्लाॉगिंग सायईवर यासंदर्भात एक पोस्ट केली असून त्यात ते म्हणाले की, मी १० वर्षे कुरुक्षेत्रातून खासदार म्हणून संसदेत काँग्रेस पक्षाचे प्रतिनिधित्व केले. मी काँग्रेस नेतृत्व आणि तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे आभार मानतो. आज मी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे, असे सांगितले. तसेच ही पोस्ट काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना टॅग केले.

भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर नविन जिंदाल म्हणाले की, आजचा दिवस माझ्या आयुष्यातील अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. मला अभिमान आहे की मी आज भाजपामध्ये प्रवेश केला आणि पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली मी देशाची सेवा करू शकेन. मला पंतप्रधान मोदींच्या ‘विकसितत भारत’ स्वप्नात योगदान द्यायचे आहे असेही सांगितले.

प्रख्यात उद्योगपतीची नुकतीच २१ मार्च रोजी इंडियन स्टील असोसिएशन (ISA) च्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. ISA ची प्रशासकीय संस्था असलेल्या सर्वोच्च समितीने दिलीप ओमन यांच्यानंतर अध्यक्ष म्हणून त्यांची एकमताने निवड करण्यात आली.

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी माजी हवाई दल प्रमुख राकेश कुमार सिंह भदौरिया यांनी रविवारी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर काही तासांनी जिंदाल यांचे भाजपाशी अधिकृत संबंध आले.

Check Also

एनआयएकडून रामेश्वरन कॅफे स्फोटप्रकरणातील आरोपींना अटक

राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) बेंगळुरू येथील रामेश्वरम कॅफेमध्ये झालेल्या स्फोटामागील मुख्य आरोपीला पश्चिम बंगालमधून अटक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *