Breaking News

विशेष शिक्षक आणि परिचर यांचे न्यायालयाच्या निर्णयानुसार समायोजन करावे शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांचे निर्देश

मुंबई : प्रतिनिधी

केंद्र पुरस्कृत अपंग समावेशित शिक्षण (माध्यमिक स्तर) योजनेअंतर्गत नियुक्त केलेल्या विशेष शिक्षक व परिचर यांना समायोजीत करण्याचा निर्णय उच्च न्यायालयाने दिला आहे. या निर्णयानुसार संबंधित १ हजार १८५ विशेष शिक्षक आणि ७२ परिचर यांना सेवेत समायोजीत करण्यात यावेत, असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज दिले.

मंत्रालयात आज केंद्र पुरस्कृत अपंग समावेशित शिक्षण योजनेअंतर्गत कार्यरत शिक्षकांच्या समायोजने संदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंत्री तावडे बोलत होते. या बैठकीस विधान परिषद सदस्य नागो नाणार, श्रीकांत देशपांडे, दत्तात्रय सावंत, विभागाच्या उपसचिव चारूशिला चौधरी आदीसह संबंधित शिक्षक आणि अधिकारी उपस्थित होते.

सदर योजनेची अंमलबजावणी करताना नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षकांच्या कागदपत्रांची पडताळणी करावी. त्यानंतर संबंधित १ हजार १८५ आणि ७२ परिचर यांचे समायोजन करण्यात यावे. तसेच, पडताळणी करताना अथवा तदनंतर या जागांसाठी पात्र म्हणून शिक्षकांचे अर्ज प्राप्त झाल्यास त्यांचे विहित तपासणी करूनच निर्णय घेण्यात यावा असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Check Also

फारूख अब्दुल्ला म्हणाले, पीओके बाबत राजनाथ सिंह यांना कोणी अडवलेय…

लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तान ऑक्युपायड जम्मू काश्मीर अर्थात पीओके …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *