Breaking News

धुर हल्ल्यातील एक जण महाराष्ट्रातीलः भाजपा खासदाराच्या शिफारसीवर संसदेत

भारताची राजधानी असलेल्या नवी दिल्लीत आणि लोकशाहीचे सभागृह असलेल्या संसदेवर आज अज्ञात दोघांनी लोकसभेच्या दालनात प्रेक्षक गॅलरीतून उडी मारत बुटाच्या आत लपवून आणलेल्या कॅडल स्मोक यंत्राच वापर करत सभागृहात पिवळा धूर सोडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या घटनेत लोकसभेतील कोणत्याही सदस्याला शाररीक दुखापत झाली नाही. मात्र घबराहट पसरली. परंतु काही खासदारांनी धाडस करत संबधित दोघा अज्ञात व्यक्तींना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानंतर त्यातील अमोल शिंदे आणि नीलम हे दोघे महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील असल्याची माहिती पुढे आली आहे.

संसदेत अनिधकृत मार्गाने उतरून धुर फवारणी करणाऱ्यांमधील अमोल शिंदे हा लातूर जिल्ह्यातील झरी गावातील असून कॉलेजच्या निमित्ताने तो एका वसतिगृहात रहात असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच त्याच्यासोबत अटक करण्यात आलेली नीलम ही पण महाराष्ट्र आणि तामिळनाडूशी संबधित असल्याचे सांगण्यात येत आहे.

विशेष म्हणजे भाजपाचे कर्नाटकातील एका खासदाराने दिलेल्या व्हिसीटर पासच्या आधारे या दोघांना संसदेत प्रवेश देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय संसदेत धुराची फवारणी करत भीती निर्माण करणारे दोघेही जणांनी संसदेच्या आवारात प्रवेश करताना कोणत्याही प्रकारचा मोबाईल फोन, ओळख पत्र किंवा गावचा पुरावा सोबत नेला नसल्याची माहिती एका वृत्तसंस्थेने दिली आहे.

तसेच संसदेच्या लोकसभा सभागृहातील हल्ल्यानंतर अमोल शिंदे आणि त्याच्या सोबतच्या सहकाऱ्यांनी तानाशाही नही चलेगी, भारत माता की जय, संविधान बचावच्या घोषणा दिल्याचे सांगण्यात येत आहे.

दिल्ली पोलिसांनी या सर्वांना ताब्यात घेतल्यानंतरही अमोल शिंदेंच्या बुटातून पिवळ्या धुराचे लोट त्याच्या बुटातून बाहेर पडत असल्याचे आणि घोषणाबाजी करण्यात येत होती असेही सांगण्यात येत आहे.

Check Also

५ लोकसभा मतदारसंघातील १,४१ लाख नवमतदार बजावणार मतदानाचा हक्क

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर या मतदारसंघात १९ एप्रिल रोजी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *