Breaking News

काँग्रेसने दिली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हरविल्याची जाहिरात मणिपूर प्रश्नी कोणी प्रश्न विचारू नये

संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरु होऊन पाच ते सहा दिवस झाले आहेत. या कालावधीत काँग्रेससह सर्वच प्रमुख राजकिय विरोधी पक्षांकडून मणिपूर मधील हिंसाचार प्रश्नी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलावं अशी मागणी करत आहेत. तसेच पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीतच चर्चा करण्याची मागणी लावून धरली आहे. मात्र मणिपूरसह इतर काँग्रेस शासित राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या मुद्यावरून भाजपा आणि मोदी सरकारमधील केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी चर्चेचा प्रस्ताव लोकसभा आणि राज्यसभेत विरोधकांना दिला. मात्र विरोधकांनी मंत्र्यांनी मांडलेल्या प्रस्तावावर चर्चा करण्यास नकार देत आपल्या मागणीवर ठाम राहिले. त्यामुळे पंतप्रधान मोदी हे संसदेकडे फिरकलेच नाहीत. यापार्श्वभूमीवर काँग्रेसने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हरविल्याची जाहिरातच ट्विटरवर प्रकाशित केली.

काँग्रेसने ट्विटरवर प्रकाशित केलेल्या जाहिरातीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हरविल्याची जाहिरात दिली आहे. तर त्यांची ओळख म्हणून महत्वाच्या मुद्यावर गप्प राहणे असे लिहिले आहे तर अनावश्यक मुद्यांवर मोठ्या प्रमाणावर खोटे बोलणे, कॅमेऱ्याचे छंदिष्ट असल्याचे लिहिले आहे. तर कपडे या सदरात दिवसात चारवेळा बदलणे असे लिहिले आहे.

तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शेवटचे दिल्लीत कोठे तरी उद्घाटन करताना दिसून आले होते. मणिपूर प्रश्नी कोणीही प्रश्न विचारू नये म्हणून ते घाबरून संसदेत येत नाहीत.

त्यानंतर शेवटी आवाहनाच्या रकान्यात जनता की अपील च्या माध्यमातून प्रिय पंतप्रधान संसदेत परत या तुम्ही राज्यघटनेची शपथ घेतली होती अशी आठवण काँग्रेसने करून देत आता तर राहुल गांधी हे पण संसदेत नाहीत. त्यामुळे तुम्ही घाबरू नका संसदेतील विरोधी पक्ष फक्त मणिपूरवर चर्चा करण्याची इच्छा बाळगत आहेत. बाकी कोणी काही तुम्हाला म्हणणार नाही असा खोचक टोलाही काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला आहे.

Check Also

लोकसभा निवडणूकीच्या ६ व्या टप्प्यात ५९ टक्के मतदान केंद्रीय निवडणूक आयोगाने दिली माहिती

केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूकीसाठी आज ५८ लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांसाठी सहाव्या टप्प्यात मतदान घेतले.  लोकसभा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *