Breaking News

चंद्रशेखर बावनकुळे यांचे आव्हान, हिंमत असेल तर एक रोखठोक त्यावरही येऊ द्या संजय राऊत यांच्या लेखातील आरोपावरून बावनकुळे यांचे आव्हान

राज्यातील लोकसभा निवडणूकीसाठी मतदानाचा टप्पा पार पडल्यानंतर काही प्रमाणात राजकिय वातावरणात शांतता निर्माण झाल्याचे जावणत असल्याची चर्चा सर्वच राजकिय नेत्यांकडून करण्यात येत होती. मात्र लोकसभा निवडणूकीचा सहावा ठप्पा काल पार पडल्यानंतर मात्र पुन्हा एकदा राजकिय वर्तुळाता पुन्हा एकदा गरमागरमी निर्माण होते की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना मुजरा असा शब्द वापरल्यानंतर विरोधकांकडून सोडण्यात आलेल्या टीकास्त्रानंतर आज शिवसेना उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी नितीन गडकरी यांच्या पराभवासाठी भाजपाच्या दिल्लीतील बड्या नेत्यांनी ताकद लावल्याचा आरोप त्यांच्या लेख सदरातून केला. त्यावरून भाजपाच्या नेत्यांनी संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, राऊत यांनी मुख्यमंत्री बनण्याच्या प्रयत्नावरही रोखठोक लिहावे असे आव्हान एक्सवरून दिले.

पुढे बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, उबाठाचे अधिकृत आणि शरद पवार गटाचे स्वयंघोषित प्रवक्ते संजय राऊत यांनी आज पुन्हा अकलेचे तारे तोडत भाजपच्या अंतर्गत राजकारणावर भाष्य केलं आहे. संजय राऊत हे उद्धव ठाकरे यांचे कर्मचारी आहेत, पण ते शरद पवार यांची चाकरी करतात. ते भ्रमिष्ट अवस्थेत ‘रोखठोक‘ लिहित असावेत. भाजपा हा पक्ष नाही तर परिवार आहे. ज्यांनी आयुष्यभर गटातटाचं राजकारण केलं त्या संजय राऊतांना परिवार काय कळणार? अशी खोचक टीकाही यावेळी केली.

चंद्रशेखर बावकनुळे पुढे आपल्या एक्सवरील ट्विटमध्ये लिहिले की, पंतप्रधान मोदीजी, अमित शाह, योगी आदित्यनाथ , नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस हे भाजपाच्या एकाच परिवारातील सदस्य आहेत. प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष आणि शेवटी स्वतः हे मूल्य घेऊन भाजपाचा प्रत्येक कार्यकर्ता काम करतो. पण संजय राऊतांच्या बाबतीत प्रथम शरद पवार नंतर स्वतः आणि शेवटी उद्धव ठाकरे आणि उबाठा गट असा क्रम आहे. त्यामुळे राऊतांच्या डोक्यातून असंच काहीतरी बाहेर पडणार अशी टीकाही केली.

त्यानंतर शेवटी चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, २०१९ मध्ये स्वतः मुख्यमंत्री होण्यासाठी संजय राऊतांनीही प्रयत्न केले होते. पण त्यांचा डाव यशस्वी झाला नाही. हिंमत असेल तर एक ‘ रोखठोक‘ त्यावरही येऊ द्या ! असे आव्हानही संजय राऊत यांना दिले.

Check Also

राज्यातील १२४५ दुष्काळ सदृष्य तालुक्यात चारा डेपो महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती

राज्यातील अनेक भागात पावसाचे आगमन झाले असले, तरी अनेक विभागात अद्यापही समाधानकारक पावसाचे प्रमाण झाले …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *