Breaking News

लष्कर प्रमुख मनोज पांडे यांना एक महिन्याची मुदतवाढ मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीचा निर्णय

सध्या लोकसभा निवडणूकीचे वारे देशात वाहत असतानाच लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे हे ३१ मे रोजी अर्थात त्यांचा निवृत्तीचा दिवस असताना अचानक दिल्लीत घडामोडी घडत मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने लष्करप्रमुख (COAS) जनरल मनोज पांडे यांना त्यांच्या सेवानिवृत्तीच्या तारखेनंतर ३० जून २०२४ पर्यंत अर्थात एक महिन्याची मुदतवाढ दिली.

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने रविवारी लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांचा कार्यकाळ एक महिन्यासाठी वाढवला. यापूर्वी १९७५ साली इंदिरा गांधी यांनी त्यावेळचे लष्करप्रमुख जी जी बेवूर हे निवृत्त होत होते. मात्र इंदिरा गांधी यांनी बेवूर यांची सेवा एक वर्षांनी वाढविली.

जनरल पांडे २५ महिन्यांच्या कार्यकाळानंतर ३१ मे रोजी सेवेतून निवृत्त होणार होते.

“मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने २६ मे रोजी लष्करप्रमुख जनरल मनोज सी पांडे यांच्या सेवेत एक महिन्याच्या कालावधीसाठी, त्यांच्या सेवानिवृत्तीच्या सामान्य वयाच्या (३१ मे), म्हणजे ३० जूनपर्यंत, नियमानुसार, मुदतवाढ देण्यास मंजुरी दिली. लष्करी नियम १९५४ च्या 16 ए (4), नुसार ही मुदतवाढ देण्यात आल्याचे ” संरक्षण मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे. ही घोषणा अशा वेळी आली जेव्हा त्यांच्यानंतरचे दोन वरिष्ठ अधिकारी देखील जूनमध्ये सेवानिवृत्त होणार आहेत.

जनरल मनोज पांडे यांना डिसेंबर १९८२ मध्ये कॉर्प्स ऑफ इंजिनियर्स (द बॉम्बे सॅपर्स) मध्ये नियुक्त करण्यात आले आणि त्यांच्या ४० वर्षांहून अधिक काळातील लष्करी कारकिर्दीत त्यांनी पूर्व लष्करी कमांडचे प्रमुख म्हणून काम केले, जे राज्यांमधील पूर्वेकडील क्षेत्रात चीनच्या विरूद्ध संरक्षणासाठी जबाबदार आहे. जसे अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीमची जबाबदारी ज्या लष्करी दलावर असते तशी.

एप्रिल २०२२ मध्ये भारतीय लष्कराचे देत उपप्रमुख पदही भूषवले होते.

Check Also

अजित पवार यांचे आश्वासन, फुले वाडा व क्रांतीज्योती फुले यांच्या स्मारक विस्तारासाठी २०० कोटी जुलै अखेरीस भिडेवाडा येथील राष्ट्रीय स्मारकाच्या कामाचे भूमिपूजन- मंत्री छगन भुजबळ

महात्मा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी सुरू केलेली भिडेवाडा येथील पहिली मुलींची शाळा येथे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *