Breaking News

WHO शास्त्रज्ञ म्हणतात, छोट्या छोट्या लाटा येवू शकतात मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन

फेब्रुवारी २०२२ अखेर पर्यंत महाराष्ट्रासह देशात कोरोनाच्या तीन लाटा आलेल्या आहेत. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेच्या तुलनेत तिसऱ्या लाटेच्या दरम्यान रूग्णालयात दाखल होणाऱ्यांचे प्रमाण आणि मृत्यूचे प्रमाण कमी होते. मात्र बाधित होण्याचे प्रमाण जास्त होते. त्यानुसार कोरोना संख्येत चांगलीच घट आल्यानंतर आता चार महिन्याच्या अंतरानंतर पुन्हा एकदा कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. यापार्श्वभूमीवर WHO शास्त्रज्ञांनी कोरोनाच्या छोट्या छोट्या लाटा येणार असल्याची शक्यता व्यक्त केल्या.

या वाढत्या करोनामुळे देशात पुन्हा करोनाच्या छोट्या लाटा येऊ शकतात, अशी शक्यता जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी वर्तविली आहे.

देशात नव्या रुपातील कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. या नव्या कोरोनाचे रुप ओमिक्रॉनपेक्षा अधिक धोकादायक आहे. या कोरोनामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊ शकते. तसेच दर चार ते सहा महिन्यांनी कोरोनाच्या अशा लहान लाटा येऊ शकतात. त्यामुळे करोनाच्या नियमांचे पालन करण्यासोबतच या नव्या कोरोनाचा शोध घेणेही महत्वाचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

तसेच घरगुती स्वंयम् चाचणीमुळे कोरोनाबाधितांची संख्या कमी प्रमाणात नोंदवली जात असल्याची शक्यता व्यक्त करत यासाठी प्रशासनाला रुग्णालयांवर लक्ष ठेवण्याची गरज असल्याचेही त्या म्हणाल्या.

त्याचबरोबर ६० वर्ष आणि त्याहून अधिक वयाच्या वृद्धांना बुस्टर डोस दिले जातील याची खात्री करणे आवश्यक आहे. बहुधा हा नवा करोना ओमिक्रॉनचे उप-प्रकार असण्याची शक्यता आहे. लसीकरण केलेल्या किंवा अगोदर करोना झालेल्या व्यक्तींनाही पुन्हा नव्या करोनाची लागण होऊ शकते. मात्र, जर तुम्ही योग्य काळजी घेतली आणि लसीकरण केले तर तुम्हाला घाबरण्याची गरज नसल्याचेही त्यांनी सांगितले.

संपूर्ण भारतात ही लाट आहे, असे म्हणणे चूकीचे आहे. कारण वेगवेगळ्या हॉटस्पॉट्समध्ये प्रादेशिक स्पाइक आहेत. या स्पाइक्सचे निरीक्षण करणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, युनायटेड स्टेट्समध्ये गेल्या चार ते सहा आठवड्यांत कोरोना रुग्णांमध्ये वाढ झाली होती आणि आता गेल्या दोन दिवसांत घट झाल्याचे दिसून आले असल्याचे ICMR च्या Covid-19 टास्क फोर्सचे तांत्रिक तज्ज्ञ डॉ. संजय पुजारी यांनी सांगितले.

Check Also

महाराष्ट्रासह तीन राज्यांमध्ये होणार ‘नऊ’ ईएसआयसी रुग्णालयांची उभारणी

कर्मचारी राज्य विमा योजनेतंर्गत महाराष्ट्र, मध्यप्रदेश व उत्तराखंड राज्यांमध्ये नऊ ‘ईएसआयसी’ रुग्णालयांची उभारणी केली जाणार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *