Breaking News

अर्थमंत्री सीतारामण यांनी केली; पेट्रोल-डिझेल आणि गॅससह या किंमतीत कपात पेट्रोल ९.५० तर डिझेल ७ रूपयांनी मिळणार स्वस्त

देशातील वाढत्या महागाईमुळे जनतेत मोठ्या प्रमाणावर रोष निर्माण होत आहे. त्यातच नागरीकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडत आहे. तसेच मागील आठ वर्षाच्या तुलनेत महागाईने मोठा उच्चांक गाठला आहे. यापार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशातील वाढत्या महागाईवर मात करण्यासाठी अनेक घोषणा केल्या आहेत. यातील सर्वात मोठी घोषणा म्हणजे पेट्रोल, डिझेलवर लावण्यात आलेल्या केंद्रीय करात कपात केली आहे. त्याचबरोबर उज्वला योजनेतंर्गत मिळणाऱ्या गँसच्या दरातही मोठी घट केली आहे. याशिवाच कच्च्या मालावरील विशेषत: प्लास्टीकवरील करात आणि आयात लोखडांवरील करातही कपात करत खतांच्या किंमतीतही सबसिडी जाहिर केली आहे.

पेट्रोलवर आकारण्यात येणाऱ्या पेट्रोलवरील केंद्रीय करात ८ रूपयांनी कपात करण्यात आली आहे. तर डिझेलवर आकारण्यात येणाऱ्या केंद्रीय करात ६ रूपयांची कपात करण्यात आल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी केली. त्यामुळे पेट्रोल, डिझेलच्या दर अनुक्रमे ९ रूपये ५० पैसे आणि ७ रूपयांनी स्वस्त होणार आहे. त्यामुळे १०० रूपयांनी किंवा त्याहून कमी किंमतीत पेट्रोल मिळेल. तर डिझेल ७ रूपयांनी स्वस्त मिळणार आहे.

तर खतांना देण्यात येणाऱ्या १.०५ लाख कोटीच्या सबसिडीत वाढ करत ती आता १.२० लाख कोटी पर्यत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मिळणाऱ्या खतात आणखी कपात होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

याशिवाय उज्वला गँस योजनेच्या किंमतीत मिळणाऱ्या गँसच्या दरात तब्बल २०० रूपयांनी कपात करण्यात आली आहे. त्यामुळे या योजनेकाली असलेला गँस ८०० रूपयांना मिळणार मिळणार आहे. याचा लाभ ९ कोटी गॅस धारकांना होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

प्लास्टीक उत्पादनासाठी लागणाऱ्या कच्च्या मालावरील केंद्रीय कस्टम करात कपात केली आहे. त्यामुळे प्लॅस्टीक वस्तूच्या किंमतीत घट होणार आहे. याशिवाय स्टील उत्पादनासाठी लागणाऱ्या आयात कच्चा मालावरील कस्टम ड्युटीत कपात करण्यात आली आहे. तर स्टीलच्या निर्यात होणाऱ्या काही उत्पादनांवर लेव्ही आकारण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

मागील वेळी पेट्रोल-डिझेलवरील करात केल्यानंतर ज्या राज्यांनी आपल्या करात कपात केली नव्हती. त्यांनी यावेळी तरी राज्य करात कपात करून राज्यातील नागरीकांना दिलासा द्यावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

त्याचबरोबर देशातील बांधकाम क्षेत्राला दिलासा देण्यासाठी सिमेंटच्या चढ्या दरातही घट करण्यात येणार असून ही सर्व कपात कधीपासून लागू करणार याची माहिती काही तासात जाहिर करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

Check Also

तिसऱ्या टप्प्यात ११ लोकसभा मतदारसंघात ५ वाजेपर्यंत ५३ टक्के मतदान

लोकसभा निवडणूकीत महाराष्ट्रासह देशभरात ९४ लोकसभा मतदारसंघात आज मतदान पार पाडले. महाराष्ट्रातील ११ मतदारसंघातील मतदानाची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *