Breaking News

देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच ३८ जणांना एकदम फाशीची शिक्षा विशेष न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय

मराठी ई-बातम्या टीम  

गुजरातच्या गोध्रा हत्याकांडानंतर उसळलेल्या आणि २००८ साली संपूर्ण देशाला हादरवून सोडलेल्या अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोटाप्रकरणी आज विशेष न्यायालयाने आपला निर्णय जाहीर केला. मागील सुनावणीवेळी ३८ जणांना दोषी ठरविण्यात आले होते. या ३८ जणांना आज फाशीची शिक्षा विशेष न्यायालयाने सुणावली.

गोध्रा हत्याकांडाचा सूड घेण्यासाठी दहशतवादी संघटना इंडियन मुजाहिद्दीनने अहमदाबाद शहरातील २१ ठिकाणी लागोपाठ बॉम्बस्फोट घडवले होते. या बॉम्बस्फोटात ५६ निष्पाप लोकांचा मृत्यू झाला होता तर २०० हून लोक गंभीर जखमी झाले होते. विशेष न्यायालयाने १४ वर्षानंतर या खटल्याचा निकाल सुनावला आहे. बॉम्बस्फोटातील मृतांना उशिरा न्याय मिळाल्याचे खंत पीडितांच्या नातेवाईकांनी व्यक्त केली आहे. न्यायालयाने अन्य ११ दोषींना आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली.

एकाच वेळी इतक्या दोषींना फाशीची शिक्षा सुनावण्याची ही इतिहासातील पहिलीच वेळ आहे. अहमदाबादमध्ये २६ जुलै २००८ रोजी संध्याकाळी ६.४५ वाजता पहिला बॉम्बस्फोट झाला होता. मणिनगरमध्ये हा स्फोट झाला होता. मणिनगर हा तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ होता. यानंतर ७० मिनिटे आणखी २० बॉम्बस्फोट झाले. या स्फोटांमध्ये ५६ जणांचा मृत्यू झाला असून २०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत.

वर्ष २००२ मध्ये झालेल्या गोध्रा हत्याकांडाचा बदला घेण्यासाठी इंडियन मुजाहिद्दीनने अहमदाबादमध्ये साखळी बॉम्बस्फोट घडवून आणले होते. हे सर्व स्फोट गर्दीच्या ठिकाणी आणि बाजारपेठेत झाले होते. इंडियन मुजाहिदीन (आयएम) आणि स्टुडंट्स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया (सिमी) यांच्याशी संबंधित दहशतवाद्यांचा या स्फोटांमध्ये सहभाग होता. इंडियन मुजाहिद्दीनच्या १२ दहशतवाद्यांचा या स्फोटात सहभाग होता. स्फोटांच्या ५ मिनिटांपूर्वी दहशतवाद्यांनी वृत्तसंस्थांना एक मेलही पाठवला होता, ज्यामध्ये ‘जे हवे ते करा, थांबवता येत असेल तर थांबवा’, असे लिहिले होते.

Check Also

ठाणे जिल्हयात तृतीयपंथी मतदारांची संख्या अधिक

लोकसभा निवडणुकीत २००४, २००९ च्या वेळी तृतीयपंथी अशी वेगळी नोंद नव्हती. सन २०१४ च्या निवडणुकीदरम्यान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *