Breaking News

पवारांच्या वक्तव्यावर चंद्रकांत पाटील म्हणाले,… विश्वास कोण ठेवणार? राज्यात सरकार स्थापन करण्याबाबत मोदींशी चर्चा झाल्याच्या पवारांच्या वक्तव्यावर भाजपा प्रदेशाध्यक्षांची प्रतिक्रिया

मराठी ई-बातम्या टीम

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात राज्यात सरकार स्थापन करण्याच्या अनुषंगाने चर्चा झाल्याची माहिती शरद पवार यांनीच काल एका कार्यक्रमात दिल्यानंतर त्यावर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पवारांवर खोचक टीका करत यांचा इतिहासच खोटे बोलण्याचा आहे. त्यामुळे यांच्या बोलण्यावर विश्वास कोण ठेवणार असला उपरोधिक टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

अजित पवार यांनी शपथ का घेतली ? शरद पवार यांनी त्यांना पाठवले होतो का ? हे मला समजणार नाही. कारण मी एक छोटा कार्यकर्ता आहे. पण मी शरद पवार यांना एकच प्रश्न विचारेन की हे सांगायला तुम्हाला इतके महिने का लागले? तुमचा इतिहास खरं न बोलण्याचा आहे. त्यामुळे तुम्ही जे बोलताय त्यावर विश्वास कोण ठेवणार. मोदी यांनी ऑफर दिल्यावर तुमची धावत जाण्याची परंपरा आहे. त्यामुळे तुम्ही थांबलात का ? हा मोठा प्रश्न आहे असल्याचा उपरोधिक सवालही त्यांनी यावेळी केला.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी नितेश राणे यांच्या ठावठिकाण्याबाबत बोलताना त्यांच्या पत्ता सांगायला मी काय मुर्ख आहे का ? असे वक्तव्य केल्यामुळे सिंधुदूर्ग पोलिसांनी त्यांना नोटीस बजावत चौकशीसाठी पोलिस ठाण्या येणाची नोटीस बजावली होती. त्यावरदेखील चंद्रकांत पाटील यांनी भाष्य करताना म्हणाले की, राणे सर्वांना पुरून उरणार आहेत. नारायण राणे तसेच नितेश राणे यांच्या स्टेरमेंटवर ते कमेंट करत नव्हते. बराच काळ ते बोलण्याचे धाडस करत नव्हते. महाविकास आघाडी सरकार कृत्रीमरित्या आलेले आहे. लोकांनी त्यांना कौल दिला नव्हता असेही ते म्हणाले.

नारायण राणे यांना नोटीस पाठवणं हा हस्यास्पद प्रकार आहे. पण शेवटी प्रत्येक विषयामध्ये अॅक्शन घेऊन तोंड फोडून घ्यायचं अशीच परंपरा सुरु झाल्याची टीकाही त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर केली.

पवारांवरील वक्तव्यावर चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या टीकावरून आणखी वादंग निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Check Also

लोकसभा निवडणूकीच्या दोन टप्प्यात सरासरी ६६ टक्के मतदान बोगस कंपन्यांच्या नावांवर म्युच्युअल फंड विक्रीला पायबंद करण्यासाठी

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ६६.१४ टक्के आणि लोकसभा निवडणुकीच्या टप्प्यात ६६.७१ टक्के मतदान झाल्याची माहिती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *