Breaking News

पुढील वर्षापासून कार महाग, मारुती, टाटासह १० कंपन्यांनी किंमती वाढवल्या या कारणामुळे वाढविल्या किंमती

मराठी ई-बातम्या टीम

मारुती सुझुकी, टोयोटा, स्कोडा आणि टाटा सारख्या अनेक कार कंपन्यांनी जानेवारी २०२२ पासून त्यांच्या मॉडेल्सची किंमत वाढवण्याची घोषणा केली आहे. मात्र, कार कंपन्यांनी वर्षाच्या सुरुवातीलाच किंमती वाढवणे ही नवीन गोष्ट नाही. सर्व कंपन्यांनी विनिमय दरातील चढउतार आणि कच्च्या मालाच्या वाढत्या खर्चाला किंमत वाढण्याचे कारण दिले आहे.
1.मारुती सुझुकी
मारुती सुझुकीने सर्वप्रथम जानेवारी २०२२ पासून कारच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. वाढलेल्या किंमती मारुती एरिना आणि नेक्सा मॉडेल्सवर लागू होतील, परंतु मॉडेलनुसार भिन्न असतील. मारुतीने अद्याप मॉडेलनुसार दरवाढीची घोषणा केलेली नसली तरी, ३१ डिसेंबरपूर्वी अद्ययावत किमती जाहीर केल्या जातील अशी अपेक्षा आहे. २०२१ मध्येच मारुतीने आपल्या कारच्या किंमती ३ वेळा वाढवल्या आहेत. कंपनीने जानेवारीमध्ये पहिल्यांदा, एप्रिलमध्ये दुसऱ्यांदा आणि सप्टेंबरमध्ये तिसऱ्यांदा किंमत वाढवली होती.
2.होंडा
होंडाही पुढील महिन्यापासून आपल्या कारच्या किंमती वाढवणार आहे. कंपनीचे म्हणणे आहे की वाढत्या इनपुट आणि कमोडिटी खर्चाचा अभ्यास केल्यानंतर कंपनी वाहनांवर किती खर्च येईल हे ठरवेल. येत्या काही दिवसांत अधिकृत घोषणा अपेक्षित आहे. या दरवाढीचा परिणाम भारतातील होंडाच्या सर्व मॉडेल्सवर होण्याची अपेक्षा आहे.
3.टाटा मोटर्स
टाटा मोटर्सने जानेवारी २०२२ पासून त्यांच्या संपूर्ण वाहनांच्या किंमतीत वाढ करण्याची घोषणा केली आहे. यामध्ये व्यावसायिक आणि प्रवासी वाहनांचा समावेश आहे. टाटाने त्यांच्या व्यावसायिक वाहनांच्या किंमतीत २.५ टक्के वाढ केली आहे. इलेक्ट्रिक आणि ICE पॉवर आणि नव्याने लाँच झालेल्या टाटा पंचसह त्यांच्या सर्व मॉडेल्सना लागू. त्याचबरोबर कंपनीने पॅसेंजरमध्ये किती किंमत वाढवली जाईल याचा खुलासा केलेला नाही.
4.रेनो
रेनॉल्ट जानेवारीपासून आपल्या वाहनांच्या किंमती वाढवण्याच्या विचारात आहे. भारतात सध्या रेनॉल्टची चार मॉडेल्स विकली जात आहेत. यामध्ये Kwid, Triber, Keeger आणि Duster यांचा समावेश आहे.
5.टोयोटो
जानेवारी २०२२ पासून टोयोटाच्या सर्व वाहनांच्या किंमतीही महाग होणार आहेत. टोयोटाने देखील मॉडेलनुसार दरवाढ जाहीर केलेली नाही, परंतु ती सर्व मॉडेल्सना लागू होईल असे सांगितले आहे. टोयोटा सध्या भारतात इनोव्हा क्रिस्टा, फॉर्च्युनर आणि बॅज-इंजिनियर अर्बन क्रूझर आणि ग्लान्झा विकते.
6.स्कोडा
Skoda जानेवारी २०२२ पासून भारतात विकल्या जाणार्‍या Kushak, Octavia आणि Superb या मॉडेल्सच्या किंमतीत ३ टक्के वाढ करेल. कंपनीने २०२१ मध्ये फक्त एकदाच आपल्या मॉडेल्सच्या किंमती वाढवल्या आहेत.
7.फोक्सवॅगन
फोक्सवॅगनने १ जानेवारी २०२२ पासून पोलो, व्हेंटो आणि तैगुनच्या किंमती २ ते ५ टक्क्याने वाढवण्याची घोषणा केली आहे. तसेच अद्याप मॉडेलनुसार दरवाढ जाहीर केलेली नाही. नुकतीच लाँच झालेली फोक्सवॅगन तैगन फेसलिफ्ट किंमत वाढीच्या कक्षेबाहेर ठेवण्यात आली आहे.
8.सिट्रोजन
सिट्रोजनचे भारतातील एकमेव मॉडेल – C5 Aircos ची एक्स-शोरूम किंमत ३ टक्क्याने वाढली आहे. C5 एअरक्रॉसची किंमत दोन महिन्यांत वाढण्याची ही दुसरी वेळ आहे. नोव्हेंबरमध्ये कारच्या किंमतीत १.३० लाख रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली होती. C5 एअरक्रॉसची भारतातील किंमत ३१.३० लाख ते ३२.८० लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.
9.मर्सिडीज बेंझ
मर्सिडीज-बेंझने निवडक मॉडेल्सवर २ टक्के वाढीची घोषणा केली आहे, मात्र, मर्सिडीजने स्पष्ट केले आहे की, ज्या ग्राहकांनी त्यांचे MY2021 मॉडेल बुक केले आहेत आणि त्यांच्या डिलिव्हरीची वाट पाहत आहेत. त्यांना बुक केल्यावर तीच किंमत मिळेल. याव्यतिरिक्त, जे ग्राहक ३१ डिसेंबरपर्यंत A-क्लास, GLA आणि E-क्लास सारख्या निवडक श्रेणीतील कार बुक करतात, त्यांनाही किंमत तीच असेल.
10.ऑडी
ऑडीने आपल्या सर्व  मॉडेलच्या किंमत ३ टक्क्याने वाढवल्या आहेत. इतर सर्व कार कंपन्यांप्रमाणेच ऑडीनेही उत्पादन खर्च वाढल्यामुळे किमतीत वाढ केल्याचे सांगितले आहे.

Check Also

भारतीय समभागांचे मुल्य वाढले, १.४ ट्रिलियन हून जास्त अहवालात माहिती उघड

नॉर्वेच्या सरकारी पेन्शन फंड ग्लोबल, $१.४ ट्रिलियन पेक्षा जास्त पोर्टफोलिओ मूल्यासह जगातील सर्वात मोठा सार्वभौम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *