Breaking News

विधिमंडळाचे पुढील अधिवेशन नागपुरात? अजित पवारांनी दिले हे उत्तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या प्रश्नावर पवारांचे उत्तर

मराठी ई-बातम्या टीम

विधिमंडळाचे  हिवाळी अधिवेशन गेली २ वर्षे नागपुरात झाले नाही. त्यामुळे पुढील अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपुरात घेण्याचा विचार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता.

यापूर्वीही मागील आठवड्यात अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर अधिवेशन घेण्याबाबतची विचारणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विधानसभेत केली होती. त्यावेळी उमपुमख्यमंत्री अजित पवार यांनी सजेशन फॉर अॅक्शन असे उत्तर दिले होते. त्यानंतर याविषयीचा मुद्दा फडणवीस यांनी पुन्हा उपस्थित केला.

नागपूरच्या अधिवेशनात अधिकारी आणि कर्मचारी यांना मिळणाऱ्या भत्यातील वाढीबाबत योग्य विचार केला जाईल असे आश्वासनही त्यांनी प्रताप सरनाईक यांच्या प्रश्नाच्या उत्तरात दिले.

त्याचबरोबर नागपूर अधिवेशनासाठी उपस्थितीत राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना मिळणारा १०० टक्के भत्ता न देण्याबाबतचा निर्णय झाल्याबाबत प्रताप सरनाईक यांनी प्रश्न उपस्थित केला असता त्यावर असा निर्णय झाल्याचे सांगत अधिकारी-कर्मचाऱ्यांची सोय राज्य सरकारकडून करण्यात येत असल्यास १०० टक्के भत्ता दैनिक भत्ता न देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे अजित पवार यांनी लेखी उत्तरात सांगितले.

प्रशिक्षणात घोटाळ्या प्रकरणी १५ दिवसात चौकशी

राज्यातील ग्रामपंचायत हद्दीतील पथदिव्यांची रखडलेली बिले १५व्या वित्त आयोगाच्या निधीतून भरली जातील, काही बिलांबाबत तपासणी सुरू आहे, ग्रामीण पाणीपुरवठा योजना बिले न भरल्याने बंद आहेत, ती मात्र अर्धी संबंधित ग्रामपंचायतीने भरलीच पाहिजेत असे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी यासंदर्भातील प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले, अर्धे बील जिल्हा परिषद भरेल मात्र ग्रामपंचायतींनी सहकार्य करावे लागेल असे ते म्हणाले. नागपूर जिल्हा परिषदेच्या महिला आणि बालकल्याण विभागात कोरोना काळात मुलींना दिलेल्या दिलेल्या ऑनलाईन संगणक प्रशिक्षणात घोटाळा प्रकरणी १५ दिवसात चौकशी करून कारवाई करण्याचं आश्वासन ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी बाबतच्या प्रश्नाच्या उत्तरात दिले, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत आग्रही होते , त्यांनी या संदर्भातील पुरावे सभागृहात दिल्यानंतर मुश्रीफ यांनी हे जाहीर केले.

Check Also

नाना पटोले यांची टीका, गुवाहाटीच्या गद्दारांना राहुल गांधींवर बोलण्याचा अधिकार नाही

लोकसभेच्या निवडणुकीचा दुसराच टप्पा होत असताना भारतीय जनता पक्ष व त्यांच्या मित्रपक्षांची घाबरगुंडी उडाली आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *