Breaking News

महाविकास आघाडी सरकारचा मोठा निर्णय: १८ वर्षावरील सर्वांना मोफत लस राज्याच्या तिजोरीतून कार्यक्रम हाती घेणार ;चांगली लस उपलब्ध व्हावी म्हणून जागतिक टेंडर काढणार-नवाब मलिक

मुंबई : प्रतिनिधी

राज्यातील १८ वर्षावरील सर्वांना मोफत लस देण्यात येणार असून त्यासाठी स्वस्त दरात व चांगली लस उपलब्ध व्हावी म्हणून जागतिक टेंडर काढण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य सरकारच्या तिजोरीतून कार्यक्रम हाती घेण्यात येणार असल्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली.

केंद्र सरकारने १ मे पासून देशभरात १८ वर्षावरील लोकांना लसीकरण करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे ४५ च्या खालील लोकांना केंद्र सरकार लस पुरवठा करणार नाही हे स्पष्ट दिसत आहे. दरम्यान, कोविशील्ड केंद्राला दीडशे रुपये, राज्याला ४०० रुपये आणि खाजगींना ६०० रुपये या किंमतीत उपलब्ध राहणार आहे. कोवॅक्सीनची किंमतसुध्दा ६०० रुपये राज्यांना व १२०० रुपये खाजगींना जाहिर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

मागच्या कॅबिनेटमध्ये या दराबाबत चर्चा झाली. यामध्ये एकमत होत राज्यातील जनतेला मोफत लस देण्याचा निर्णय झाला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी होकार दिला होता. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कालच (शनिवारी) जाहीर केल्याचे सांगत मोफत लसीकरणासाठी लवकरात लवकर टेंडर काढण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Check Also

अरविंद केजरीवाल यांच्या वकिलांचा युक्तीवाद, घोटाळ्यातील पुरावे मिळाले नाहीत

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या कथित दिल्ली अबकारी धोरण घोटाळ्यातून उद्भवलेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *