Breaking News

घरेलू कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी सकारात्मक महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांची शिष्टमंडळाला ग्वाही

मुंबई : प्रतिनिधी

कोरोना परिस्थितीमुळे विविध समस्यांना तोंड देत असलेल्या घरेलू कामगार महिलांच्या शिष्टमंडळाने काल महिला व  बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांची भेट घेऊन आपल्या समस्या मांडल्या. या महिलांना त्यांच्या समस्यांवर सकारात्मक तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करु, अशी ग्वाही ॲड. ठाकूर यांनी यावेळी दिली.

राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा सुशीबेन शहा यांच्यासह घरेलू कामगार महिलांच्या शिष्टमंडळाने मंत्री ॲड. ठाकूर यांची भेट घेतली.

घर स्वच्छता कामातील महत्त्वपूर्ण भूमिकेमुळे या कामगार महिलांचे अनेक कुटुंबांशी जिव्हाळ्याचे संबंध निर्माण होतात. मात्र, कोरोना परिस्थितीत लॉकडाऊन कालवधीमध्ये अनेक महिलांना रोजगाराला मुकावे लागले. दररोज कामावर गेल्याशिवाय कमाई होत नाही अशी परिस्थिती असल्यामुळे अनेक महिलांना आर्थिक हालाखीला सामोरे जावे लागले. आता परिस्थितीमध्ये थोडीफार सुधारणा होत असली तरी या महिलांच्या कुटुंबांची आर्थिक घडी विस्कटली आहे, असे शहा यांनी सांगून घरेलू कामगारांसाठी सुरू करण्यात आलेले घरेलू कामगार कल्याण मंडळ पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करुन त्यामार्फत या कामगांच्या कल्याणाचे निर्णय घेतले जावेत, अशी मागणी केली.

घरेलू कामगार महिला या समाजाचा महत्त्वाचा घटक असून त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रतिबद्ध असल्याचे आश्वासन देत या महिलांचे आरोग्य, पोषण, मुलांचे शिक्षण, त्यांचे हक्क आदींसाठी शासन सकारात्मक पावले उचलेल, अशी ग्वाही मंत्री ठाकूर यांनी शिष्टमंडळाला दिले.

Check Also

काँग्रेस नेते नसीम खान यांची नाराजी दूर म्हणाले, वर्षा गायकवाड माझ्या लहान बहिण

लोकसभा निवडणूकीच्या उमेदवारीवरून काहीसे नाराज झालेल्या काँग्रेसचे माजी आमदार नसीम खान यांनी काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्ष …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *