Breaking News

बेकायदेशीर वागणाऱ्यांकडून २ कोटी ३० लाखांची तिजोरीत भर कोविड संदर्भात ६० हजार गुन्हे दाखल -१३ हजार व्यक्तींना अटक तर ४१ हजार वाहने जप्त

मुंबई: प्रतिनिधी
राज्यात सर्वत्र सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या काळात २२ मार्च ते २०एप्रिल या कालावधीत राज्यात कलम १८८ नुसार ६० हजार ५ गुन्हे दाखल झाले आहेत. तर १३,३८१ व्यक्तींना अटक करण्यात आली असून ४१,७६८ वाहने जप्त करण्यात आली असून विविध गुन्ह्याखाली बेकायदेशीर वागणाऱ्यांकडून २ कोटी ३० लाख रूपयांचा दंड आकारण्यात  आल्याची माहिती पोलीस विभागाने प्रसिद्धी पत्रकामार्फत देण्यात आली.
उपरोक्त कालावधीत राज्यभरात पोलीस विभागाच्या १०० नंबर वर ७५,११५ फोन आले. त्या सर्वांची योग्य ती दखल घेण्यात आली. राज्यभरात पोलिसांनी ज्यांच्या हातावर Quarantine असा शिक्का आहे, अशा ५८९ व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठवले. या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या १०६२ वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले. परदेशी नागरिकांकडून व्हिसा उल्लंघनचे १५ गुन्हे राज्यभरात नोंदवले आहेत. या कालावधीत झालेल्या विविध गुन्ह्यांसाठी २ कोटी ३० लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
पोलिसांवर हल्ला
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. पोलीस कर्मचारी अधिकारी दिवस-रात्र कार्यरत आहेत . मात्र दुर्दैवाने या कालावधीत पोलिसांवर हल्ला होण्याच्या १२१ घटनांची नोंद झाली असून यात ४११ आरोपींना अटक करण्यात आली.

Check Also

सुनिता केजरीवाल यांना अरविंद केजरीवाल यांची भेट घेण्यास मुभा

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता यांना तिहार तुरुंग प्रशासनाने त्यांना भेटण्याची परवानगी दिली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *