Breaking News

Tag Archives: winter session at nagpur

नाना पटोले यांचा सवाल, …लुट करणाऱ्या कंपनीवर कारवाई करणार का?

ठाणे जिल्ह्यातील मीरा भायंदर येथील ८९९४ एकर जमीन तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने २००८ रोजी इस्टेट इन्व्हेस्टमेंट या खाजगी कंपनीला बेकायदेशीरपणे हस्तांतरीत करण्यात आली असून या कंपनीचे ७/१२ उताऱ्यावर नावही आहे. येथील जमीन व्यवहार करताना जनतेला या कंपनीला पैसे द्यावे लागतात. सरकारी जमिनीवरून अशा पद्धतीने पैसे वसूल करण्याचा या कंपनीला अधिकार आहे …

Read More »

नाना पटोले यांची टीका,…भयावह परिस्थितीत सरकारचे दुर्लक्ष आणि जनता वाऱ्यावर

छत्रपती शिवाजी महाराज, शाहु, फुले, आंबेडकरांच्या महाराष्ट्रात वणवा पेटवून भाजपाला काय मिळते? महागाई, बेरोजगारी, दुष्काळ, शेतकरी आत्महत्या, पाण्याची टंचाई आहे तसेच आरक्षणावरून महाराष्ट्र अशांत करण्याचे पाप केले जात आहे. राज्यातील परिस्थिती अत्यंत भयावह आहे. वाऱ्यावर सोडणार नाही असे मुख्यमंत्री सांगतात पण भाजपाप्रणित सरकारने जनतेला वाऱ्यावर सोडले अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष …

Read More »

महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट सहकारी बँकेतील अनियमिततेबाबत कारवाई करणार

राज्य परिवहन महामंडळातील कामगारांच्या हितासाठी महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट सहकारी बँक स्थापन करण्यात आलेली आहे. या बँकेत निवडणुकीनंतर नवीन संचालक मंडळ आले आहे. या संचालक मंडळाने घेतलेले निर्णय तसेच त्यांच्या काळातील कामकाजाची आर्थिक तपासणी करण्यासाठी जिल्हा उपनिबंधक मुंबई -१ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रकरणी दोन महिन्यात अहवाल सादर करण्याचे …

Read More »

पुण्याच्या मनपा क्षेत्रातील विनापरवाना अनधिकृत बांधकामे रोखणार

पुणे महानगरपालिका हद्दीत २०१७ मध्ये ११ गावांचा समावेश झाला. तर २०२१ मध्ये २३ गावे नव्याने समाविष्ट झाली आहेत. या क्षेत्रामध्ये नव्याने विनापरवाना अनधिकृत बांधकामे होणार नाहीत, याची दक्षता घेऊन अशी बांधकामे होतानाच ती थांबवण्याचे निर्देश पुणे महानगरपालिकेला देण्यात येतील, असे मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत सांगितले. सदस्य सुनील टिंगरे यांनी …

Read More »

छगन भुजबळ यांची स्पष्टोक्ती,… त्यांना वेगळ आरक्षण द्या, मात्र ही झुंडशाही थांबवा

मराठा समाजाला आरक्षण देण्यासासाठी आपला विरोध नाही. त्यांना स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे.ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे. सारथी, प्रमाणे महाज्योतीसह इतर संस्थाना समान निधी द्यावा. ओबीसी समाजाचा सरकारी नोकऱ्यांमधील अनुशेष भरून काढण्यात यावा यासह विविध मागण्या मांडत नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणावरील नियम …

Read More »

देवेंद्र फडणवीस यांची घोषणा, गृह विभागात २३ हजार ६२८ पदांची पोलिस भरती

गृह विभागातील १९७६ पासून आकृतीबंध नुसार पदभरती केली जात होती. आता लोकसंख्यनुसार किती अंतरावर पोलिस स्टेशन, कर्मचारी, युनिट असले पाहिजे याबाबत नवीन आकृतीबंध तयार करण्यात आला असून याअंतर्गत २३ हजार ६२८ पोलिस शिपाई पदे भरली जाणार असल्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत सांगितले. गृह विभागातील पोलीस शिपाई …

Read More »

नाना पटोले यांची मागणी, आरक्षणाच्या वादावर एकच पर्याय…

राज्यात आज विविध समाज आरक्षणासाठी आंदोलन करत आहेत. मराठा, धनगर, हलबा, गोवारी, ओबीसी समाज आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरला, हे बीज कोणी रोवले? भाजपाने सत्तेत येण्यासाठी २०१४ मध्ये या समाज घटकांना आरक्षणाचे आश्वासन दिले होते मग सत्ता आल्यानंतर आरक्षण देण्यापासून तुम्हाला कोणी थांबवले आहे का? आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराजांच्या भूमीतच …

Read More »

उदय सामंत म्हणाले, २०२७ पर्यंत बेस्ट उपक्रमात संपूर्ण बसगाड्या इलेक्ट्रिक

प्रवाशांच्या सोयीकरिता बेस्ट उपक्रमातील संपूर्ण बसताफा हा सन २०२७ पर्यंत इलेक्ट्रिकवर करण्याचे प्रस्तावित करण्यात येत असल्याचे मंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत सांगितले. बेस्ट बससेवेसंदर्भात सदस्य सुनिल शिंदे यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती, त्याला उत्तर देताना उदय सामंत बोलत होते. मंत्री उदय सामंत म्हणाले की, बेस्ट उपक्रमामार्फत सद्य:स्थितीत २१०० एकमजली व …

Read More »

प्रसूतीदरम्यान महिलांच्या मृत्यूवरून विरोधकांचा गदारोळ आणि सभात्याग काँग्रेसच्या सदस्यांनी आरोग्य मंत्री डॉ तानाजी सावंत यांनी घेरले

गडचिरोली जिल्ह्यातील दोन आणि अकोला जिल्ह्यातील एक अशा तीन महिलांचे योग्य व वेळीच उपचार न मिळाल्याने प्रसूति दरम्यान मृत्यू झाल्यामुळे आज विधानसभेत प्रश्नोत्तर तासात प्रचंड गदारोळ झाला.आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या उत्तराने समाधान न झाल्याने आरोग्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी सर्व विरोधी सदस्यांनी निषेध करीत सभात्याग केला. विधानसभेचे नियमित कामकाज सुरु …

Read More »

अजित पवार यांचे सारथीच्या फेलोशिप संदर्भात मोठे वक्तव्य

राज्य सरकारच्या छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेकडून (सारथी) मराठा समाजातील पीएच.डी. करणाऱ्या केवळ २०० विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्यात येणार आहे. मुळात यासाठी १३८९ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. सरकारने जाहिरात काढताना विद्यार्थ्यांच्या मर्यादा संख्येचा त्यात उल्लेख नव्हता. त्यामुळे २०२३ च्या बॅचमधील संशोधक विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप द्या, अशी मागणी …

Read More »