Breaking News

Tag Archives: winter session at nagpur

हिवाळी अधिवेशनात शिंदे-फडणवीस सरकार मांडणार ही २३ विधेयके प्रस्तावित विधेयके :- २३ (मंत्रीमंडळाची मान्यता प्राप्त - १२,मंत्रीमंडळ मान्यता सापेक्ष-११) पटलावरती ठेवावयाचे अध्यादेश -५

राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन १९ डिसेंबर रोजीपासून सुरु होत असून या अधिवेशनात शिंदे-फडणवीस सरकारकडून मंत्रिमंडळ मान्यता प्राप्त अशी एकूण २३ विधेयके मांडण्यात येणार आहे. तर ५ अध्यादेश विधिमंडळाच्या मान्यतेसाठी ठेवण्यात येणार आहेत. तसेच यातील अनेक विधेयके मंजूर करून घेण्यासाठी राज्य सरकारकडून मंजूर करून घेण्यात येणार असल्याचे सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारकडून स्पष्ट …

Read More »

अजित पवारांच्या टीकेवर देवेंद्र फडणवीसांचे प्रतिउत्तर, महापुरूषांचे पुरावे मागतात आणि… विरोधकांना प्रश्न विचारण्याचा अधिकारच नाही

राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून उपराजधानी नागपुरात सुरू होत आहे. तत्पूर्वी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येस सत्ताधारी विरुद्ध विरोधकांमध्ये पत्रकार परिषदेच्या माध्यमातून टीका, टिप्पणीला सुरूवात झाल्याचे आज दिसून आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयोजित केलेल्या चहापानावर बहिष्कार टाकत विरोधकांनी आज पत्रकार परिषदेतून विविध मुद्य्यांवरून सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली. विरोधी पक्षनेते अजित पवार …

Read More »

अजित पवार म्हणाले, आधी भाजपाच्या लग्नाचे वऱ्हाडी बघतो अन् मग बोलतो… राज्य सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार

तब्बल दोन वर्षानंतर राज्याचे हिवाळी अधिवेशन पहिल्यांदाच नागपूरला होत आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शिंदे-फडणवीस सरकारकडून आयोजित केलेल्या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधी पक्षाने बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. तत्पूर्वी राज्यातील सर्व विरोधी पक्षियांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार, विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे …

Read More »

शेतकरी कर्जमाफीची मुख्यमंत्री ठाकरेंकडून घोषणा तर फडणवीसांचा सभात्याग कर्जमाफीची मार्चपासून अंमलबजावणी करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांकडून जाहीर

नागपूरः प्रतिनिधी राज्यातील शेतकऱ्यांना चिंतामुक्त करण्याचे देण्यात आलेले आश्वासन करण्याच्यादृष्टीने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी ३० सप्टेंबर २०१९ पर्यंतचे दोन लाख रूपयांपर्यंतचे कर्जमाफ करत असल्याची घोषणा विधानसभेत केली. तसेच या कर्जमाफीची अंमलबजावणी मार्च २०२० पासून करणार असून ही कर्जमाफी कोणत्याही अटीशर्तीशिवाय राहणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा …

Read More »

गिरणी कामगारांच्या घरांसाठी पनवेल येथे जागा हक्काची घरे देण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी सरकारचा प्रयत्नः मंत्री जयंत पाटील

नागपूरः प्रतिनिधी मुंबईतील गिरणी कामगारांना हक्काची घरे देण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी सरकारचा आहे. त्यादृष्टीकोनातून शहरातील ३८ गिरण्यांच्या जमिनीवर २४ हजार घरे तर उरलेली पनवेल येथील कोन गाव येथे पर्यायी जागा उपलब्ध असल्याची माहिती अर्थमंत्री जयंत पाटील यांनी दिली. विधानसभेत विचारण्यात आलेल्या लक्षवेधी सुचनेला उत्तर देताना त्यांनी वरील माहिती दिली. गिरण्या …

Read More »

फडणवीसांच्या उद्विग्न प्रश्नांना मुख्यमंत्री ठाकरेंची दिलखुलास उत्तरे भारूडाला अभंगातून आणि विडंबनातून जवाब

नागपूरः विशेष प्रतिनिधी राज्यपालांच्या अभिभाषणावरील ठरावाच्यावेळी काल काहीजणांनी हे चालेची ना ते चालेची ना सारखे काहीतरी म्हणत होते. मात्र आम्ही कमी बोलतो, जास्त काम करतो असे सांगत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या भाषेत सांगायचे तर संताचा तो प्रचार अमर, अजूनही लोक-मनावर, राज्य चालवोनी निरंतर, लाखो जीवा उद्धरितो अशा पध्दतीचे आमचे राज्य …

Read More »

शेतकरी आशेने बघतोय मात्र सरकारकडून फसवणूक सुरूय विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा आरोप

नागपूरः प्रतिनिधी राज्यात तीन पक्षांचे मिळून सरकार सत्तेवर बसलय. सत्तेवर आल्यावर शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र या सरकारकडून शेतकऱ्यांची अजूनही फसवणूकच करण्यात येत असून कर्जमाफीची घोषणा अद्याप केली नाही. उलट शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी केवळ ५ हजार ६०० कोटी रूपयांची तरतूद केल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस …

Read More »

सरकार स्थापनेवरून रंगली फडणवीस आणि शिंदे यांच्यात खडाजंगी अभिभाषणावरील चर्चेवेळी विरोधी पक्षनेत्यांची घसरली गाडी

नागपूरः विशेष प्रतिनिधी राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या सलग तिसऱ्या दिवशीही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरत हे सरकार जनमताचा कौल नाकरून सत्तेत विराजमान झाल्याचा आरोप केला. त्यावर शिवसेनेचे गटनेते तथा मंत्री एकनाथ शिंदे यांनी फडणवीस यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेत गोवा, मेघालय येथे काय केले ते आठवून पहा …

Read More »