Breaking News

Tag Archives: winter session at nagpur

अजित पवारांची मागणी, कोयता गँग’ला मोक्का लावा, तडीपार करा, दहशत मोडून काढा 'कोयता गँग'मधला अल्पवयीन मुलांचा समावेश गंभीर मुद्दा

पुण्यासह राज्याच्या अनेक शहरे आणि उपनगरात कोयता गँगची दहशत दिवसेंदिवस वाढत आहे. ही गँग रात्री-अपरात्री रस्त्यांवर हवेत कोयता परजत फिरते. महिलांचे दागिने लुटणे, चोरी, लुटमारी करणे, गाड्यांची मोडतोड, जेवणाचे बिल न भरता हॉटेलमध्ये तोडफोड करण्यासारखे हिंसक कारवाया करते, राज्यातल्या अनेक शहरातील नागरिक कोयता गँगच्या दहशतीखाली जगत आहेत. कोयता गँगचे वाढते …

Read More »

जयंत पाटील म्हणाले, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना आता त्याच भाषेत उत्तर… हसन मुश्रीफ यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा मुद्दा जयंत पाटील यांनी सभागृहात केला उपस्थित...

सीमाभागातील मराठी माणसांवर पाळत ठेवली जात आहे, जाणीवपूर्वक मराठी माणसाला त्रास दिला जातो आहे. याचा आपण जाब विचारला पाहिजे, कर्नाटकचे मुख्यमंत्री ज्या भाषेत बोलत आहेत त्याच भाषेत त्यांना उत्तर द्यायला पाहिजे अशा शब्दात माजी मंत्री जयंत पाटील यांनी कर्नाटक सरकारला ठणकावून सांगितले. यांना जर मस्ती चढली असेल तर आपणही कोयना, …

Read More »

नाना पटोलेंची मागणी, भूखंड घोटाळ्याप्रश्नी मुख्यमंत्री शिंदे राजीनामा द्या ईडी सरकारविरोधात मविआची विधानभवनच्या पायऱ्यावर जोरदार घोषणाबाजी

हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही महाविकास आघाडीने शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला. नागपूरातील १०० कोटी रुपये किंमतीचा भूखंड एकनाथ शिंदे यांनी नगरविकास मंत्री असताना कवडीमोल भावाने बिल्डरच्या घशात घातला असून न्यायालयानेही या प्रकरणी मुख्यमंत्र्यांवर ताशेरे ओढले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक मिनीटही खूर्चीवर बसण्याचा अधिकार नाही, त्यांनी तात्काळ राजीनामा …

Read More »

देवेंद्र फडणवीस म्हणाले अजित पवारांना, आम्ही तुमच्याकडूनच शिकलो… निधी वाटप आणि कामाच्या स्थगितीवरून अजित पवारांच्या प्रश्नाला उत्तर

विधानसभेचे कामकाज सुरु झाल्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी निधी वाटपाला आणि सुरु झालेल्या कामांना स्थगिती शिंदे-फडणवीस सरकारने दिल्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले. यावेळी अजित पवार यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, तुम्ही आमच्यापेक्षा जास्तवेळा निवडूण आलात. आम्ही तुमच्यापेक्षा कमी वेळा …

Read More »

अजित पवार म्हणाले फडणवीसांना, आम्ही अनेकांची सरकारे पाह्यली पण…. निधी वाटपावरून विधानसभेत सत्ताधारी-विरोधक आमने सामने

आज विधानसभेचे कामकाज सुरु झाल्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारकडून महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंजूर केलेल्या कामांना स्थगिती देण्याचा मुद्दा उपस्थित केला. तसेच सरकारने स्थगिती दिलेली कामे पुन्हा सुरू करा, याप्रश्नी चर्चा करा अशी मागणही त्यांनी यावेळी केली. विधानसभेत प्रश्नोत्तराचा तास सुरु होण्यापूर्वी औचित्याचा मुद्दाद्वारे अजित पवार म्हणाले, …

Read More »

विधान भवनातील शिवसेना कार्यालयातून शिंदे गटाने ठाकरे गटाला बाहेर काढले नागपूरमधील हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानभवनात शिंदे गटाच्या आमदारांची दांडगाई

शिवसेना नेमकी कोणाची याचा वाद जरी सध्या सर्वोच्च न्यायालयात आणि केंद्रीय निवडणूक आयोगाकडे जरी अद्याप प्रलंबित असला तरी नागपूरातील गारठलेल्या वातावरणात शिवसेनेतील शिंदे गटात आणि ठाकरे गटात चांगलीच जुंपल्याने थंडीच्या वातावरणातही विधानभवनातील वातावरण चांगलेच तापल्याचे चित्र पाह्यला मिळाले. त्याचे झाले असेल की, आज हिवाळी अधिवेशनाचा पहिलाच दिवस असल्याने जरा जास्तच …

Read More »

अजित पवारांनी आत्राम यांचा मुद्दा उपस्थित करताच मुख्यमंत्र्यांनी लगेच दिले आश्वासन नक्षलवादाला घाबरून गडचिरोलीतला औद्योगिक विकास थांबणार नाही

हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी सीमावाद आणि कर्नाटक सरकारने मराठी भाषिकांच्या विरोधात सुर केलेल्या कारवाईवरून शिंदे-फडणवीस सरकारला घेरले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांना नक्षलवाद्यांकडून जीवे मारम्याची धमकी देण्यात आल्याचा मुद्दा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपस्थित केला. त्यावर तात्काळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेत सुरक्षा पुरविण्याचे आश्वासन …

Read More »

अंबादास दानवे म्हणाले, कर्नाटकला ईट का जवाब पत्थर से… मराठी बांधवांच्या संरक्षणासाठी सरकारने खंबीर भूमिका घेणे गरजेचे

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर केंद्रीय गृहमंत्र्यांनी हस्तक्षेप करूनही कर्नाटक सरकार दुटप्पी भूमिका अवलंबत आहे. त्यामुळे आता मराठी बांधवांच्या संरक्षणासाठी सरकारने खंबीर भूमिका घेतली पाहिजे, कर्नाटकला ईट का जवाब पत्थर से देण्याची गरज आहे, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सभागृहात केली. आज महाराष्ट्र बेळगाव एकीकरण समितीने आयोजित मोर्च्यात सहभागी झालेल्या …

Read More »

अजित पवार यांचा इशारा, कर्नाटकची दडपशाही सहन करणार नाही विधानसभेत अजित पवारांचा आक्रमक पवित्रा

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी देशाच्या गृहमंत्र्यांनी मध्यस्थी करुनही कर्नाटक सरकारच्या कुरापती सुरुच आहेत. महाराष्ट्रातल्या लोकप्रतिनिधींना बेळगावमध्ये प्रवेशबंदी करुन लोकशाही मुल्ये पायदळी तुडविण्याचे काम कर्नाटक सरकारने केले आहे. यापुढे कर्नाटक सरकारची दडपशाही सहन करणार नसल्याचे सांगत महाराष्ट्र सरकारने सीमा भागातील मराठी भाषिकांच्यामागे ठामपणे उभे राहण्याची जोरदार मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी …

Read More »

विरोधकांच्या हल्ल्यावरून मुख्यमंत्री शिंदे संतापून म्हणाले, ए गपा बसा… अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी खडाजंगी

हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी बेळगाव सीमावासीयांच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधक-आमने सामने आले आहेत. विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सीमावादाचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना उत्तर दिले. यावेळी विरोधकांचा गदारोळ सुरु असल्याने त्यांनी गप्प बसा असं सांगत फटकारलं. महत्त्वाचं म्हणजे, कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांच्या ट्विटवर खात्यावरुन ट्वीट …

Read More »