Breaking News

Tag Archives: shivsena (UBT)

संजय राऊत म्हणाले, प्रकाश आंबेडकर यांचा निर्णय एकांगी त्यांनी…

शनिवारी प्रकाश आंबेडकर यांनी कोल्हापूरात काँग्रेसचे लोकसभा उमेदवार शाहु महाराज यांना बिनशर्त पाठिंबा जाहिर केला. तसेच शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबरोबरील युतीबाबत विचारले असता प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट करताना म्हणाले की, शिवसेना उबाठा गटाबरोबरील युती आता राहिलेली नाही असे जाहिर करत आता जमलं तर महाविकास आघाडीसोबत युती नाही …

Read More »

प्रकाश आंबेडकर म्हणाले, आमचं टार्गेट ठरलेलं आहे…ती युती आता राहिली नाही

आमचं टार्गेट आम्ही ठरवले आहे, भाजपाला पराभूत करणे हेच आमचे टार्गेट आहे. यामुळे टार्गेट मिळवण्यासाठी छोटे-मोठे हेवेदावे आम्ही बाजूला सारत आहोत. आमचं म्हणणं आहे की, त्यांची भांडणं संपली पाहिजेत. त्यामुळे त्यांची भांडणं संपत नसल्यास आम्ही आमची भूमिका जाहीर करू, असे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी …

Read More »

शरद पवार यांचा इशारा,… तर तुमचेही बँक खाते बंद

ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण नाही. महागाई, बेकारी, भ्रष्टाचार वाढत आहे. हे घालवायचं असेल तर चुकीचे निर्णय घेणाऱ्यांना सत्तेपासून बाजूला करणे, हे तुमचे आणि माझे कर्तव्य आहे असे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी इंदापूर येथील शेतकरी मेळाव्यातून भाजपावर हल्लाबोल केला. इंदापूर येथे …

Read More »

इक्बाल सिंह चहल थेट मुख्यमंत्री कार्यालयातः आदित्य ठाकरे यांची टीका

लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता जाहिर होताच निवडणूक आयोगाने ज्या अधिकाऱ्यांना तीन वर्षे पूर्ण झाले आहेत अशा अधिकाऱ्यांची बदली करण्याचे आदेश दिले. परंतु राज्य सरकारने राज्यातील इतर अधिकाऱ्यांच्या ऐवजी मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांना महानगरपालिकेच्या पदावर कायम ठेवण्यासाठी आपल्या अधिकाराचा वापर सुरु केला. मात्र अखेर केंद्रीय निवडणूक आयोगाकडून इक्बालसिंह चहल यांची …

Read More »

चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार, उद्धव ठाकरे यांनी सत्तेसाठी भावाला घरातून हाकलून दिले

नुकतेच शिवसेना उबाठा गटाचे नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना औरंगजेबाची प्रवृत्ती असल्याचे बोलले. औरंगजेबाची प्रवृत्ती खरे तर उद्धव ठाकरे यांच्यातच असून सत्तेसाठी उद्धव ठाकरे यांनी सख्या भावाला घरातून बाहेर काढले. वडिलांना कैदेत ठेवल्याचा पलटवार भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला. गडचिरोलीतील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आज भाजपाच्या प्रदेश कार्यालयात …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना औरंगजेब म्हणणे हा देशद्रोह

देशाचा नावलौकिक जागतिक पातळीवर वाढविणारे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना औरंगजेबाशी करणे हा देशद्रोह आहे अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. अयोध्येत राम मंदिर उभारणे आणि काश्मिरमधिल ३७० कलम रद्द करण्याचे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न मोदीजींनी पूर्ण केले. त्यांच्याबद्दल असे उद्गार काढणे हा देशाचा अपमान असून …

Read More »

नाना पटोले यांची ग्वाही, महाविकास आघाडीचे जागावाटप निश्चित, दोन दिवसात निर्णय

महाविकास आघाडीची जागा वाटपावर चर्चा झाली असून वंचित बहुजन आघाडी, समाजवादी पक्ष, माकपा या मित्रपक्षांशी बोलणी झालेली आहे, वंचितसोबतही आजही चर्चा झाली आहे. काँग्रेस पक्षाचे उमेदवारही जवळपास निश्चित झाले आहेत. सर्व मित्र पक्षांशी चर्चा करून महाविकास आघाडीचे जागावाटप आणि उमेदवार दोन तीन दिवसात जाहीर होतील, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे …

Read More »

शाहु महाराजांची उमेदवारी जाहिर केल्यानंतर उद्धव ठाकरे म्हणाले, आमचं…

आज सकाळपासून लोकसभा मतदारसंघांच्या वाटपावरून महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यातील जागांचा तिढा सोडविण्यावरून बैठक सुरु होती. तर दुसऱ्याबाजूला उद्धव ठाकरे हे शिवसेना उबाठा गटाच्या जनसंवाद यात्रेनिमित्त सध्या कोल्हापूरच्या दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यात असतानाच उद्घव ठाकरे यांनी श्रीमंत शाहु महाराज यांच्या निवासस्थानी भेट घेतली. भेटीनंतर श्रीमंत शाहु महाराज …

Read More »

महाविकास आघाडीत अजूनही चर्चेचे गुऱ्हाळः वंचित नव्या प्रस्तावावर उद्या निर्णय

काल दिवसभर महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघातील संभावित मतदारांची नावे आणि काँग्रेसने दावा केलेल्या जागांवर अंतिम जागा वाटपाला मान्यता घेण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काल दिवसभर दिल्लीत तळ ठोकून राहिले. त्यानुसार काँग्रेस श्रेष्ठींनी नाना पटोले यांच्या प्रस्तावाला मान्यता देत काँग्रेस १७ जागांवर दिल्लीच्या श्रेष्ठींनी मान्यता दिली. त्यानंतर आज महाविकास आघाडी आणि …

Read More »

उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल, त्यांच्यात औरंगजेबाची वृती

लोकसभा निवडणूकीसाठी महाराष्ट्रासह देशभरात आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे आचारसंहिता लागू होण्यापूर्वी विविध राजकिय पक्षांकडून राजकिय प्रचाराला सुरुवात केली होती. शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचाही सध्या मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांच्या दौऱ्यावर असून राजकिय विरोधक असलेल्या भाजपावर टीकास्त्र सोडण्यात कोणतीही कसूर सोडली नाही. बुलढाणा येथे शिवसेना उबाठा गटाच्यावतीने आयोजित जनसंवाद …

Read More »