Breaking News

उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल, त्यांच्यात औरंगजेबाची वृती

लोकसभा निवडणूकीसाठी महाराष्ट्रासह देशभरात आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे आचारसंहिता लागू होण्यापूर्वी विविध राजकिय पक्षांकडून राजकिय प्रचाराला सुरुवात केली होती. शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचाही सध्या मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांच्या दौऱ्यावर असून राजकिय विरोधक असलेल्या भाजपावर टीकास्त्र सोडण्यात कोणतीही कसूर सोडली नाही. बुलढाणा येथे शिवसेना उबाठा गटाच्यावतीने आयोजित जनसंवाद यात्रेत उद्धव ठाकरे बोलताना म्हणाले की, औरंगजेबचा जन्मही गुजरातमधील दारोह येथील आहे. परंतु ज्यांनी महाराष्ट्रावर चाल केली त्यांना महाराष्ट्रातील मावळ्यांनी काय हाल केले हे औरंगजेबाला विचारा असा खोचक टोला लगावत

पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, देशात सत्ताधारी असलेले त्यांच्या सभेला गर्दी व्हावी म्हणून सभेला लोक यावीत म्हणून पैसे दिली जातात त्यांच्यासाठी गाडी द्यावी लागते. तरीही लोकं त्यांच्या सभेला येत नाहीत. पण तुम्ही सकाळी ११ वाजल्यापासून इथं बसली आहेत. हे प्रेम लोकांना विकत घेऊन किंवा पैसे देऊन मिळत नाही असा उपरोधिक टोलाही यावेळी भाजपा आणि शिंदे गटाला लगावला.

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, सगळ्यांना माहित आहे की तुम्ही देशाचे गृहमंत्री आहात म्हणून तुम्ही क्रिकेट बोर्डाला फोन करून तुम्ही तुमच्या मुलाला अध्यक्ष केलात असा घणाघाती आरोप करत ज्यांना मागचा पुढचा विचार न करता उमेदवारी दिली शिवसेनेने मोठं केलं तेच गद्दार आता त्याच्या वळचणीला जाऊन बसले आणि शिवसेना संपवायला बसले आहे. अशा गद्दारांना घरी पाठवा असे आवाहनही केले.
तसेच भाजपावर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, देशाचा स्वातंत्र्य लढ्यात भाजपावाले कधीच नव्हते. मग तुमच्याकडून आम्ही काय शिकायचे गद्दारी असा उपरोधिक सवालही केला.

पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, जेव्हा अटलबिहारी वाजपेयी हे हिदूत्वाचा बुरखा पांघरून घटनात्मक पदाची पायमल्ली केली म्हणून त्यांना राजधर्म शिकवित होते. पण त्यावेळी शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या पाठीशी उभे राहिले म्हणून आज ते देशाचे पंतप्रधान आहेत. अन्यथा हे कुठे दिसलेही नसते असा उपरोधिक टोलाही यावेळी लगावला.

उद्धव ठाकरे पुढे बोलताना म्हणाले, देशाच्या पंतप्रधानांना फक्त गुजरातबद्दलच ममत्वच का, शेजारी असलेल्या उत्तर प्रदेश, उत्तराखंडला का नाही असा सवाल करत भाजपा म्हणजे भाडोत्री जनता पार्टी अशी खोचक टीकाही केली. भाजपाने यंदा चारसो पारचा नारा लगावला आहे. परंतु हे अशक्य असून देशाला हुकूमशाहीकडे नेले जात आहे. पण अशा प्रवृत्तीला वेळीच ठेचणे काळाची गरज असल्याचे मतही यावेळी व्यक्त केले.

शेवटी बोलताना उद्धव ठाकरे यांनी आवाहन केले की, महाराष्ट्राशी गद्दारी करणाऱ्यांना लोकसभेत पाठवायचं कि महाराष्ट्राला पुन्हा एकदा सन्मान मिळवून देणाऱ्याला निवडून द्यायचं असा सवाल करत गद्दारांना घरी पाठविणार ना असा सवालही यावेळी केला.

Check Also

वर्षा गायकवाड यांचा आरोप, …बहुजन समाजातील मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न

शिक्षण हा प्रत्येक मुलाचा मूलभूत अधिकार असून ६ ते १४ वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *