Breaking News

मध्य रेल्वेला वर्षाला १.१३ कोटींचे आर्थिक नुकसान

मुंबई उपनगर अर्थात मध्य रेल्वे सेवेतील एस्केलेटर हे प्रवाश्यांच्या सुविधेसाठी बसविण्यात आले असले तरी नेहमीच यात बिघाड असतो. एका एस्केलेटरच्या देखभालीवर पश्चिम रेल्वे १.८५ लाख वर्षाला खर्च करते तर मध्य रेल्वे २.९७ लाख रुपये खर्च करत असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाकडे एस्केलेटरच्या बाबत विविध माहिती विचारली होती. पश्चिम रेल्वेचे वरिष्ठ विभागीय विद्युत अभियंता शकील अहमद यांनी अनिल गलगली यांस कळविले की चर्चगेट ते विरार या दरम्यान १०६ एस्केलेटर आहेत. एका एस्केलेटरचा प्रतिवर्षं देखभाल खर्च हा १.८५ लाख आहे. तर मध्य रेल्वेचे वरिष्ठ विभागीय विद्युत अभियंता एच एस सूद यांनी अनिल गलगली यांस कळविले की सीएसटीएम ते कल्याण आणि सीएसटीएम ते वाशी या दरम्यान १०१ एस्केलेटर आहेत. एका एस्केलेटरचा प्रतिवर्षं देखभाल खर्च हा २.९७ लाख आहे.

१८२५ वेळा बंद पडते एस्केलेटर

पश्चिम रेल्वेने बंद होणाऱ्या एस्केलेटरची माहिती देताना स्पष्ट केले आहे की एका वर्षात १८२५ वेळा एस्केलेटर बंद पडते. ९५ टक्के आपत्कालीन बटन अज्ञात व्यक्तीकडून बंद केल्याने एस्केलेटर बंद होते. तर मध्य रेल्वेच्या एच एस सूद यांनी बंद एस्केलेटरची माहिती जतन न केल्याची कबूली दिली आहे. विशेष दिवशी बंद असलेल्या एस्केलेटर माहिती विचारली तर ती दिली जाऊ शकते.

अनिल गलगली यांनी मुंबईतील २ रेल्वे अंतर्गत एस्केलेटर बाबत खर्चातील १.१२ लाखांच्या तफावतीवर आश्चर्य व्यक्त केले.यामुळे मध्य रेल्वेला वर्षाला १.१३ कोटींचे आर्थिक नुकसान होत आहे. याबाबत त्यांनी रेल्वे प्रशासनाकडे चौकशीची मागणी करत संबंधित अधिकारी वर्गावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सुविधासाठी बसविण्यात आलेले एस्केलेटर गर्दीच्या अधिकांश वेळी बंद असल्याने प्रवाश्यांना दुविधांचा सामना करावा लागतो, याबाबत नाराजगी व्यक्त केली.

Check Also

दृष्टिबाधित व्यक्तींसाठी समावेशक ॲटलासचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन

दिव्यांग व्यक्तींना देशाच्या सामाजिक, आर्थिक प्रगतीमध्ये योगदान देण्यासाठी सक्षम करणे आवश्यक आहे. दिव्यांगांना शिकविण्यात येणारी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *