Breaking News

अखेर निवडणूक आयोगाने बदली केलीच, नवे मुंबई पालिका आयुक्त भूषण गगराणी

मागील महिन्यात केंद्रीय निवडणूक आयोगाने एकाच ठिकाणी एखादा अधिकारी तीन वर्षापेक्षा जास्त कालावधी राहिला असेल तर अशा आयपीएस आणि आयएएस अधिकाऱ्याची बदली करण्यात यावी असे आदेश राज्य सरकारने दिले होते. मात्र राज्य सरकारकडून मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांची बदली करू नये यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांना दोन वेळा पत्र लिहीत चहल यांची बदली करू नये अशी विनंती केली. मात्र मुख्य निवडणूक आयुक्तांनी राज्य सरकारची विनंती डावलत नियमानुसार नव्या आयुक्ताचे नाव कळविण्यास सांगत त्याच व्यक्तीची नियुक्ती केली. अखेर राज्य सरकारने मुंबई महापालिकेच्या तीन्ही आयएएस अधिकाऱ्यांची बदली करत नव्या आयुक्तांची नियुक्ती केली.

आता नव्या आदेशानुसार मुंबई महापालिकेचे आयुक्त पदाची जबाबदारी मुख्यमंत्री कार्यालयाचे अप्पर मुख्य सचिव भूषण गगराणी यांच्यावर नियुक्ती करण्यात आली. तसेच मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे आणि पी वेलारासू यांची बदली करण्यात आली. मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदाचा पदभार अश्विनी भिडे यांच्याकडून तो अभिजित बांगर आणि कल्याणच्या आयुक्तांकडे ही मुंबई महापालिकेची जबाबदारी सोपविण्यात आली.

विशेष म्हणजे मुख्यमंत्री कार्यालयाचे अप्पर मुख्य सचिव भूषण गगराणी हे मुंबई महापालिकेचे आयुक्त म्हणून जाण्यास फारसे उत्साही नव्हते. तसेच मुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव म्हणूनच काम करण्याची इच्छा होती. मात्र निवडणूक आयोगाच्या आदेशासमोर राज्य सरकारही अखेर हतबल ठरले. त्यामुळे अखेर राज्य सरकारला चहल यांची बदली करत त्यांच्या ठिकाणी भूषण गगराणी यांच्याकडे नियुक्ती करण्यात आली.

त्याबरोबरच ठाणे मुंबई महापालिकेच्या आयुक्त पदी सौरभ राव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर नवी मुंबई महापालिकेच्या आयुक्त पदी कैलास शिंदे यांची नियुक्ती करण्यात राज्य सरकारकडून करण्यात आली. या तिघांकडेही त्या त्या महापालिकांचा पदभार सोडून निवडणूकीशी संबधिक कोणत्याही पदाची जबाबदारी स्विकारू नये असे स्पष्ट आदेश मुख्य निवडणूक आयोगाच्या मुख्याधिकाऱ्यांनी दिले.

मुख्य निवडणूक अधिकारी यांची ऑर्डर-

Check Also

संध्या सव्वालाखे यांची टीका, महिला अत्याचाऱ्यांचे समर्थन करणाऱ्या भाजपाने…

भारतीय जनता पक्ष, तसेच त्यांचे सर्वोच्च नेते यांनी महिलांचा सातत्याने अपमान केला आहे. भाजपाच्या नेत्यांची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *