Breaking News

Tag Archives: western railway

मध्य रेल्वेला वर्षाला १.१३ कोटींचे आर्थिक नुकसान

मुंबई उपनगर अर्थात मध्य रेल्वे सेवेतील एस्केलेटर हे प्रवाश्यांच्या सुविधेसाठी बसविण्यात आले असले तरी नेहमीच यात बिघाड असतो. एका एस्केलेटरच्या देखभालीवर पश्चिम रेल्वे १.८५ लाख वर्षाला खर्च करते तर मध्य रेल्वे २.९७ लाख रुपये खर्च करत असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस रेल्वे प्रशासनाने दिली आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल …

Read More »

लोकल रेल्वे सेवा सर्वांसाठी लवकरच…पण १ फेब्रुवारीपासून नाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक

मुंबई : प्रतिनिधी कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्याच्या उद्देशाने सर्वसामान्य मुंबईकरांना मागील १० महिन्यापासून लोकलने प्रवास करण्यास बंदी घालण्यात आली. मात्र आता ही बंदी लवकरच उठविण्यात येणार असून याबाबतचा निर्णय लवकरच सर्वांसाठी सुरू करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सांगितले. मात्र लोकल सेवा सर्वांसाठी १ फेब्रुवारी २०२१ पासून सुरू करण्यात …

Read More »

मुंबईकरांचा त्रास कमी करण्यासाठी रेल्वे विभागाने लवकरात लवकर सेवा सुरू करावी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांची सूचना

मुंबई : प्रतिनिधी मुंबईकरांचा त्रास कमी करण्यासाठी रेल्वे विभागाने लवकरात लवकर रेल्वे सेवा सुरू करावी आणि महिलांसाठी विशेष सेवा सुरू करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री व मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी माध्यमांशी बोलताना केली. राज्य सरकारने महिलांना प्रवास करण्यासाठी परवानगी दिल्यानंतर रेल्वेने नियमित सेवा सुरू …

Read More »

महिला प्रवाशांना परवानगी द्या, रेल्वे म्हणते रेल्वे बोर्डाची मंजूरी मिळाल्यावर राज्य सरकारला पत्र पाठवत दिली माहिती

मुंबई: प्रतिनिधी मुंबई महानगरात राहत असलेल्या चाकरमानी महिलांना नवरात्रोत्सावाच्या पहिल्या दिवसापासून रेल्वेने प्रवास करण्यास परवानगी देण्याची मागणी करणारे पत्र राज्य सरकारने रेल्वे विभागाला पाठविले. त्यावर तातडीने पश्चिम रेल्वेने त्यावर उत्तर देत राज्य सरकारच्या विनंतीचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठविण्यात आला असून बोर्डाची परवानगी मिळाल्यानंतर सर्वसाधारण महिलांना प्रवासास परवानगी देता येणे शक्य …

Read More »

सरकार म्हणते ८ लाख तर रेल्वे म्हणते १५ लाख कामगारांना घरी सोडले स्थलांतरीत कामगारांना त्यांच्या राज्यात पोहोचविण्याच्या आकडेवारीवरून गोंधळ

मुंबई : प्रतिनिधी राज्यात विशेषत: मुंबई महानगरातील स्थलांतरीत कामगारांना बिहार, उत्तर प्रदेशमधील स्थलांतरीत कामगारांना त्यांच्या घरी पोहोचविण्यावरून रेल्वे गाड्या उपलब्ध असणे-नसण्यावरून केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल आणि शिवसेना यांच्यात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. एकाबाजूला या कामगारांना त्यांच्या राज्याच्या सीमापर्यंत पोहोचविण्यासाठी रेल्वेबरोबरच एसटीने ७ ते ८ लाख जणांना पोहोचविल्याचे राज्य …

Read More »