Breaking News

चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार, उद्धव ठाकरे यांनी सत्तेसाठी भावाला घरातून हाकलून दिले

नुकतेच शिवसेना उबाठा गटाचे नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना औरंगजेबाची प्रवृत्ती असल्याचे बोलले. औरंगजेबाची प्रवृत्ती खरे तर उद्धव ठाकरे यांच्यातच असून सत्तेसाठी उद्धव ठाकरे यांनी सख्या भावाला घरातून बाहेर काढले. वडिलांना कैदेत ठेवल्याचा पलटवार भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला.

गडचिरोलीतील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आज भाजपाच्या प्रदेश कार्यालयात प्रवेश केला. त्यावर वेळी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार केला.

चंद्रशेखर बावनकुळे पुढे बोलताना म्हणाले की, मागील विधानसभा निवडणूकीत भावाप्रमाणे प्रेम करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत युती केली. परंतु सत्तेसाठी उद्धव ठाकरे यांनी ही युती तोडत. सातत्याने विरोध करणाऱ्या काँग्रेससोबत युती करून राज्यातील सत्ता काबीज केली. इतकेच नव्हे तर स्वतः शिवसेना प्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते की, काँग्रेसबरोबर युती करण्याची वेळ आली तर माझा पक्ष मी बंद करेन या वक्तव्याचा विसरही उद्धव ठाकरे यांना पडला. इतके ते सत्तेसाठी अंध झाले आहेत अशी टीकाही केली.

पुढे बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्यात औरंगजेबाची प्रवृत्ती असताना ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना औरंगजेबाची उपमा देतात. ज्या अयोध्येत ५०० वर्षाहून अधिक काळ तंबूत राहणाऱ्या श्रीरामाला चांगल्या मंदिरात प्रतिष्ठापना करेल याची प्रतिक्षा देशातील तमाम हिंदूत्ववादी जनता वाट पहात होती. त्या रामाची प्रतिष्ठापना नरेंद्र मोदी यांनी मंदिरात केली. तसेच रामाच्या प्रतिष्ठापणेला महाआरतीला उद्धव ठाकरे यांना खास आमंत्रित केले. पण त्या आमंत्रणाचा स्विकारही केला नाही अशी टीकाही यावेळी केली.

यावेळी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, आतापर्यंत जितकी मते नरेंद्र मोदी यांना मिळाली आहेत त्यापेक्षा जास्तीच्या मतांनी उद्धव ठाकरे यांचा आणि त्यांच्या समर्थकांचा येणाऱ्या लोकसभा निवडणूकीत पराभव राज्यातील जनता करेल असा इशाराही यावेळी दिला.

Check Also

वर्षा गायकवाड यांचा आरोप, …बहुजन समाजातील मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न

शिक्षण हा प्रत्येक मुलाचा मूलभूत अधिकार असून ६ ते १४ वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *