लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता जाहिर होताच निवडणूक आयोगाने ज्या अधिकाऱ्यांना तीन वर्षे पूर्ण झाले आहेत अशा अधिकाऱ्यांची बदली करण्याचे आदेश दिले. परंतु राज्य सरकारने राज्यातील इतर अधिकाऱ्यांच्या ऐवजी मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांना महानगरपालिकेच्या पदावर कायम ठेवण्यासाठी आपल्या अधिकाराचा वापर सुरु केला. मात्र अखेर केंद्रीय निवडणूक आयोगाकडून इक्बालसिंह चहल यांची बदली करण्याचे आदेशच दिले. त्यानंतर अखेर राज्य सरकारने ज्येष्ठ सनदी अधिकारी भूषण गगराणी यांची मुंबई महापालिकेच्या आयुक्त पदी नियुक्ती केली.
मुख्यमंत्री कार्यालयाचे अप्पर मुख्य सचिव भूषण गगराणी यांची मुंबई महापालिकेच्या आयुक्त पदी नियुक्ती केल्यानंतर त्यांचे पद रिक्त राहिले. तर बदलीचे आदेश काढल्यानंतर काही दिवस इक्बालसिंह चहल यांना वेटींग फॉर द पोस्ट या असे स्टॅडिंग ठेवण्यात आले. त्यानंतर इक्बाल सिंह चहल यांची नियुक्ती आज भूषण गगराणी यांच्या बदलीमुळे रिक्त झालेल्या पदावर करण्यात आली.
इक्बालसिंह चहल यांची मुंबई महापालिकेतून थेट बदली मुख्यमंत्री कार्यालयात करण्यात आल्याने शिवसेना उबाठा गटाचे नेते तथा आमदार आदित्य ठाकरे यांनी टीकास्त्र सोडले आहे. यावेळी आदित्य ठाकरे यांनी मुंबई महापालिकेचे भ्रष्ट माजी आयुक्त आता मुख्यमंत्री कार्यालयात नियुक्त करण्यात आले आहेत. घटनाबाह्य मुख्यंत्र्यांना (CM-Contractor Minister) मदत करण्यासाठी ह्या भ्रष्ट माजी आयुक्तांची विशेष नियुक्ती करण्यात आल्याचा खोचक आरोप केला.
तसेच आदित्य टाकरे म्हणाले की, घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या मर्जीतील्या कंत्रांटदारांना मुंबई लुटण्यासाठी मदत केल्याबद्दल हे मिळालेलं बक्षिस असल्याची खोचक टीकाही केली.
मी २ दिवसांपूर्वी भाकित केलं होतं अगदी तसंच घडलंय… @mybmc चे भ्रष्ट माजी आयुक्त आता @CMOMaharashtra वर नियुक्त झालेत.
घटनाबाह्य मुख्यमंत्री (CM – contractor Minister) ना मदत करण्यासाठी ह्या भ्रष्ट माजी आयुक्तांची विशेष नियुक्ती झालीये.
घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या…
— Aaditya Thackeray (@AUThackeray) March 22, 2024