मुख्यमंत्र्यांना सांगून सुद्धा शिवतारे यांचे शेपूट सरळ झाले नाही त्यामुळे त्यांचे शेपूट छाटण्याची वेळ आली असून मुख्यमंत्र्यांनी विजय शिवतारे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करुन तात्काळ हकालपट्टी करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी केली आहे.
गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन उमेश पाटील यांनी शिवसेना नेते विजय शिवतारे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. आज पुन्हा एकदा विजय शिवतारे यांनी मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांच्यावर टिका केल्यानंतर उमेश पाटील यांनी त्याच भाषेत प्रत्युत्तर दिले.
उमेश पाटील म्हणाले की, विजय शिवतारे यांचे व्यक्तीगत आयुष्य आणि बाबी इतक्या खालच्यास्तराच्या आहेत आणि त्या चव्हाटयावर आल्यामुळे विजय शिवतारे यांचे व्यक्तिमत्त्व काय लायकीचे आहे हे संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेसमोर आले. त्यामुळे त्यांना इतरांची लायकी तपासण्याचा अधिकार नाही असा जोरदार प्रतिहल्लाही चढवला.