Breaking News

प्रकाश आंबेडकर यांचे टीकास्त्र, भाजपाचे स्टार प्रचारक ईडी, सीबीआय, ईव्हीएम

देशात सध्या लोकसभा निवडणूकांचे वारे वहात आहे. त्यातच काँग्रेसची बँक खाती गोठविल्याच्या मुद्यावरून आधीच भाजपा आणि नरेंद्र मोदी-भाजपाला यांना लक्ष्य करण्यास देशातील सर्वच प्रमुख विरोधी पक्षांनी टीका करण्यास सुरुवात केली. त्यातच काल रात्री ईडी अर्थात सक्तवसुली संचालनायने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली. त्यावरून विरोधी पक्षांनी तयार केलेल्या इंडिया आघाडीतील घटक पक्षांनी भाजपावर हल्लाबोल करण्यास सुरुवात केली. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनीही एक्स या सोशल नेटवर्किंग ब्लॉगवरून भाजापावर टीकास्त्र सोडले.

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ED, सीबीआय, आयटी विभाग आणि ईव्हीएम हे भारतीय जनता पक्षाचे स्टार प्रचारक असल्याची खोचक टीका केली.

पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, ED, सीबीआय, आयटी विभाग आणि ईव्हीएम या स्वायत्त संस्थांचा वापर करून भाजपा देशातील विरोधी पक्षांतील नेत्यांवर कारवाई करत असल्याचे बोलले जात आहे. झारखंडमधील हेमंत सोरेन आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर देखील कारवाई करण्यात आली. ही कारवाई दडपशाहीतून होत असल्याचा आरोपही यावेळी भाजपावर केला.

Check Also

वर्षा गायकवाड यांचा आरोप, …बहुजन समाजातील मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न

शिक्षण हा प्रत्येक मुलाचा मूलभूत अधिकार असून ६ ते १४ वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *