Breaking News

ईडीची मागणी अरविंद केजरीवाल यांना १० दिवसांची कोठडी द्याः न्यायालयाने निकाल राखून ठेवला

ईडी अर्थात सक्त वसुली संचालनालयाने, अरविंद केजरीवाल यांच्या १० दिवसांच्या कोठडीची मागणी करताना, न्यायालयाला सांगितले की आप सुप्रीमो अरविंद केजरीवाल हे “दारू धोरण घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार” होते. तरीही दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी असा युक्तिवाद केला की त्यांच्याशी संबंध जोडणारा कोणताही “थेट पुरावा” या प्रकरणात नाही.

ईडीने न्यायालयासमोर युक्तीवाद करताना सांगितले की, अरविंद केजरीवाल, ज्यांना गुरुवारी रात्री मोठ्या नाट्यमय घडामोडीनंतर अटक करण्यात आली, दिल्ली सरकारने आता मागे घेतलेल्या दारू धोरण तयार करण्यात त्यांचा थेट सहभाग होता.

ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी अरविंद केजरीवाल यांच्याबाजूने युक्तीवाद करताना म्हणाले की, अटकेचे कोणतेही कारण नाही, कारण ८०% लोकांनी त्यांच्या वक्तव्यात दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचे नाव घेतले नाही.

दरम्यान, अरविंद केजरीवाल आणि ईडीच्या वकिलांचे म्हणणे ऐकूण घेतल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भातील निर्णय राखून ठेवला. तसेच याप्रकरणी नंतर निर्णय देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.

ईडीचे अरविंद केजरीवाल यांच्यावर केलेले आरोप

ईडीने न्यायालयाला सांगितले की, अटक केलेले पहिले विद्यमान मुख्यमंत्री बनलेले अरविंद केजरीवाल हे धोरण तयार करण्यात थेट सहभागी होते. “पॉलिसी (अबकारी) अशा पद्धतीने बनवण्यात आली होती की त्यामुळे लाच घेणे शक्य झाले,” असे ईडीच्या वकिलाने कोर्टाला सांगितले.

ईडीने म्हटले आहे की केजरीवाल हे धोरण तयार करण्यात थेट सामील होते आणि ते गुन्ह्यातील पैसे हाताळण्यात गुंतले होते. या गुन्ह्यातून मिळालेले पैसे गोवा निवडणुकीच्या प्रचारासाठी वापरण्यात आल्याचे ईडीने म्हटले आहे. ईडीने सांगितले की, “आम्ही गुन्ह्यातील रक्कम शोधून काढली आहे आणि गोवा निवडणूक प्रचारात सहभागी असलेल्या अनेक लोकांचे जबाब घेतले आहेत.”

तपास यंत्रणांनानी सांगितले की अरविंद केजरीवाल यांनी ‘दक्षिण ग्रुप’कडून मदतीच्या बदल्यात किकबॅकची मागणी केली. ईडीच्या वकिलांनी सांगितले की, किकबॅकच्या बदल्यात ‘दक्षिण ग्रुप’ला दिल्लीतील दारू व्यवसायांवर नियंत्रण मिळाले.

ईडीने सांगितले की, आपचे माजी संपर्क प्रमुख विजय नायर यांनी दक्षिण गट आणि आपमधील मध्यवर्ती व्यक्ती म्हणून काम केले. विजय नायर हे केजरीवाल यांच्या निवासस्थानाजवळील घरात थांबले होते.

एएसजी पुढे म्हणाले की, गुन्ह्यातून मिळालेली रक्कम ६०० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. एएसव्ही राजू म्हणाले, “गुन्ह्याची कमाई म्हणजे केवळ १०० कोटी रुपयांची लाचच नव्हे तर लाच देणाऱ्यांनी मिळवलेला नफाही ६०० कोटी रुपयांचा आहे,” एएसव्ही राजू म्हणाले.

Check Also

प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आरक्षण बचाव यात्रेला सुरुवात चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून यात्रेचा शुमारंभ

वंचित बहुजन आघाडी आयोजित ‘आरक्षण बचाव यात्रे’ला मुंबई, चैत्यभूमीवरून सुरुवात झाली आहे. वंचित बहुजन आघाडीचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *