काल दिवसभर महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघातील संभावित मतदारांची नावे आणि काँग्रेसने दावा केलेल्या जागांवर अंतिम जागा वाटपाला मान्यता घेण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काल दिवसभर दिल्लीत तळ ठोकून राहिले. त्यानुसार काँग्रेस श्रेष्ठींनी नाना पटोले यांच्या प्रस्तावाला मान्यता देत काँग्रेस १७ जागांवर दिल्लीच्या श्रेष्ठींनी मान्यता दिली. त्यानंतर आज महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीची आज सकाळी बैठक झाली. मात्र आजच्या बैठकीतही महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीमधील यांच्यात जागा वाटपासंदर्भात असलेली कोंडी अद्याप दूर होऊ शकली नसल्याचे महाविकास आघाडीतील घटकपक्षांकडून सांगण्यात येत आहे.
दोनच दिवसांपूर्वी वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसला मिळालेल्या लोकसभा जागांपैकी ७ जागांची मागणी करत उर्वरित मतदारसंघात काँग्रेसच्या लोकसभा उमेदवारांना पाठिंबा देण्याची तयारी दर्शविली. परंतु वंचित बहुजन आघाडीने दिलेल्या प्रस्तावावर काँग्रेसकडून अद्याप कोणतीही भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटानेही अद्याप वंचितला किती जागा देणार याच्यात स्पष्ट केले नाही. त्यामुळे आज महाविकास आघाडीच्या नेत्यांची आज मुंबईत बैठक झाली. या बैठकीला प्रकाश आंबेडकर, जितेंद्र आव्हाड आणि संजय राऊत आदी उपस्थित होते. या बैठकीत वंचित बहुजन आघाडीने ७ जागांचा प्रस्ताव पुन्हा नव्याने देत ६ जागा लोकसभेच्या जागा लढविण्याची तयारी दाखविली. त्यावर शिवसेना उबाठा, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अंतिम होकार दिला नाही. यासंदर्भात या तिन्हा पक्षांच्या शीर्ष नेत्यांची चर्चा करून अंतिम निर्णय घेणार असल्याची माहिती नाना पटोले यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.
त्याचबरोबर नाना पटोले पुढे बोलताना म्हणाले की, वंचित बहुजन आघाडीने आज नव्याने प्रस्ताव दिला आहे. त्यावर अंतिम चर्चा करून महाविकास आघाडीचे जागा वाटप उद्या शुक्रवारी जाहिर करणार असल्याचे सांगितले.
दरम्यान, वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीकडून यापूर्वीच चार लोकसभा मतदारसंघ देऊ केले आहेत. त्यामुळे तसेच एखादी अतिरिक्त जागा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार किंवा शिवसेना उबाठा गटातील एखादी जागा देऊन एकूण ४ ते ५ जागा देण्यावर वंचित वगळता महाविकास आघाडीचे एकमत असल्याची माहिती महाविकास आघाडीतील विश्वसनीय सूत्रांनी दिली.