Breaking News

Tag Archives: sharad pawar

राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वेसर्वा शरद पवार यांचा राजकिय वारस कोण? नेते प्रफुल पटेल यांचे मोठे विधान.. प्रफुल पटेल यांची स्पष्टोक्ती मी रेस मध्ये नाही

मंगळवारी सकाळी शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आलं. एकीकडे शरद पवार राजीनामा मागे घेणार का? यावर चर्चा होत असताना दुसरीकडे त्यांनी राजीनामा मागे घेतला नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेसचा पुढचा अध्यक्ष कोण होणार? यावर जोरदार चर्चा घडताना पाहायला मिळत आहे. यामध्ये सुप्रिया सुळे, जयंत …

Read More »

भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांची घोषणा, या नेत्यांना मिळाले स्थान नवीन कार्यकारिणीमध्ये १६ उपाध्यक्ष, ६ सरचिटणीस, १६ चिटणीसांचा समावेश

भारतीय जनता पार्टीच्या नूतन प्रदेश पदाधिकाऱ्यांची घोषणा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली. नवीन प्रदेश कार्यकारिणीत १६ उपाध्यक्ष , ६ सरचिटणीस , १६ चिटणीस , ६४ कार्यकारिणी सदस्य, २६४ विशेष निमंत्रित सदस्य आणि ५१२ निमंत्रित सदस्यांचा समावेश आहे. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेला प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी, …

Read More »

संजय राऊत यांची स्पष्टोक्ती, त्यांच्या पक्षांतर्गत बाब पण, शरद पवारांसारखे नेते… महाविकास आघाडीवर परिणाम होणार नाही

शरद पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्ष पदावरून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला असला तरी त्यांनी राजकारणातून संन्यास घेतला नसून पवारांसारखे नेते राजकारण, समाजकारणातून कधीही निवृत्त होत नाहीत, अशी प्रतिक्रिया शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली. पवारांनी घेतलेला निर्णय ही राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातील अंतर्गत बाब …

Read More »

अखेर नेते, कार्यकर्त्यांच्या अश्रुंसमोर शरद पवार यांचे मन द्रवलेः २-३ दिवसात निर्णयाचा फेरविचार अजित पवार यांच्या मार्फतच कळविला निर्णय

मंगळवारी सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाध्यक्षपदावरून पायउतार होण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे भावनिक झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आणि नेते तसेच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी भावनिक होत आणि आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून देत आपला निर्णय बदलावा म्हणून शरद पवार यांना साद घातली. तसेच कार्यकर्त्यांनी शरद पवार यांनी आपला निर्णय बदलल्याशिवाय आपण …

Read More »

काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, राष्ट्रवादीला फार गांभीर्याने घ्यायची गरज नाही भाजपाशी आतून बोलणी सुरु, किती दिवस सोबत राहतील माहिती नाही

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी बोलत असताना पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर गंभीर आरोप केले आहेत. राष्ट्रवादीची भाजपासोबत बोलणी सुरू आहे. त्यामुळे राष्ट्रवादी आमच्यासोबत किती दिवस राहील हे माहिती नाही. तसेच राष्ट्रवादीला तुम्ही फार गांभीर्याने …

Read More »

शरद पवार यांच्या त्या घोषणेनंतर कार्यकर्त्यांचे ठिय्या आंदोलन, नेत्यांना तर अश्रूच आवरेना पवार साहेब तुम्हीच आम्हाला पक्षाचे अध्यक्ष म्हणून हवे आहात म्हणून दिली भावनिक हाक

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होत असल्याचं आज २ मे जाहीर केलं. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा पुढील निर्णय घेण्यासाठी शरद पवार यांनी समिती सूचवली आहे. यशवंतराव चव्हाण सभागृहात झालेल्या ‘लोक माझे सांगाती’ पुस्तकाच्या विस्तारित आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यावेळी शरद पवारांनी हा निर्णय जाहीर केला. शरद पवार म्हणाले, …

Read More »

शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्ष पदावरून निवृत्ती घेण्याचे का जाहिर केले? वाचा त्यांचे संपूर्ण भाषण, भाषणातच सांगितली कारणे

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्या राजकीय जीवनाबाबत मोठी घोषणा आज दुपारी केली. विशेष म्हणजे शरद पवार यांच्या “लोक माझे सांगाती” या सुधारीत राजकिय आत्मचरित्राचा प्रकाशन प्रसंगीच “प्रदीर्घ कालावधीनंतर आता कोठे तरी थांबण्याचा विचार करणे आवश्यक आहे. त्यामुळे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे, असं …

Read More »

तुरूंगातून बाहेर पडताच सत्यजीत चव्हाण यशवंतराव प्रतिष्ठानवर, शरद पवार म्हणाले…. माती परिक्षण थांबविल्याशिवाय आणि फौजफाटा हटविल्याशिवाय बारसूप्रकरणी चर्चा नाही

बारसू रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधातील कोकणवासीयांच्या आंदोलनाचं नेतृत्व करणारे सत्यजीत चव्हाण यांनी तुरुंगातून सुटका झाल्यानंतर थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीबाबत स्वतः शरद पवार यांनी रविवारी (३० एप्रिल) ट्वीट करत माहिती दिली. या भेटीवेळी सत्यजीत चव्हाण यांच्या शिष्टमंडळाबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाडही होते. शरद पवार …

Read More »

राज ठाकरेंच्या त्या सल्ल्यावर अजित पवार यांचे प्रत्युत्तर, काकाकडे जसं लक्ष… शरद पवारांच्या त्या वक्तव्याचा अर्थ नव्या चेहऱ्यांना संधी

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ अमोल कोल्हे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची नुकतीच मुलाखत घेतली. यावेळी अमृता फडणवीस यांनी राज ठाकरे विरोधी पक्षनेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांना काय सल्ला द्याल असा सवाल केला. यावर राज ठाकरेंनी अजित पवारांना …

Read More »

शरद पवार यांचा मुंबई मनपा आयुक्तांना तात्काळ कॉल आणि ५० हजार विद्यावेतन मंजूर २४ तास सेवा, विद्यावेतन मात्र १५ हजार; इंटर्नशिप करणारे निवासी डॉक्टर शरद पवारांच्या दारी...

मुंबई महानगरपालिकेच्या दवाखान्यात गेली कित्येक वर्षे इंटर्नशिप करणार्‍या निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात ५० हजार रुपये वाढ व्हावी यासाठी आज बीएमसी मुंबई सीपीएस स्टुडंट असोसिएशनच्या निवासी डॉक्टरांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेत निवेदन दिले. दरम्यान शरद पवार यांनी मुंबई आयुक्त इक्बालसिंग चहल यांना कॉल करत या निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतन …

Read More »