Breaking News

Tag Archives: sachin waze

फडणवीस म्हणाले, फक्त परमबीर सिंग यांची चौकशी करणार कि गृहमंत्र्याचीही? पवारांना दोष देणार नाही ते निर्माते असल्याने त्यांना सरकारचा बचाव करावा लागणार

नागपूर: प्रतिनिधी ज्युलिओ रिबेरो हे अनुभवी आणि अतिशय चांगली व्यक्ती आहेत. परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपाची केवळ ते चौकशी करणार का? कि गृहमंत्र्यांचीही चौकशी करणार असा खोचक सवाल देवेंद्र फडणवीस शरद पवार यांना करत १५-२० वर्षांपूर्वी निवृत्त झालेल्या पोलिस अधिकार्‍यांनी करावी, असे शरद पवार यांना सूचवायचे आहे का? असा उपरोधिक …

Read More »

पवार म्हणाले, परमबीर सिंग भेटले मला पण बदलीनंतर, उद्या देशमुखांचा निर्णय मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याशी बोलणार

मुंबई: प्रतिनिधी आयपीएस अधिकारी परमबीर सिंग यांनी पत्राद्वारे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपाच्या पार्श्वभूमीवर मला परमबीर सिंग हे येवून भेटल्याचे स्पष्ट करत ते भेटले बदली झाल्यानंतर, परंतु त्यात तपासात हस्तक्षेप होत असल्याबाबत बोलले. त्यात कोठेही पैशांचा उल्लेख नव्हता. त्याचे पत्र मलाही मिळाले त्यात माझा उल्लेख करण्यात आला. मात्र त्या …

Read More »

राज ठाकरेंकडून अॅन्टालिया स्फोटकप्रकरणी “गुजरात कनेक्शन”चे संकेत केंद्र सरकारने तपासात हस्तक्षेप करावा

मुंबई : प्रतिनिधी प्रसिध्द उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अॅन्टालिया बंगल्याजवळ स्फोटकाने भरलेली गाडी आढळून आली. त्या गाडीत एक पत्र मिळाले असून त्या पत्रात मुकेश भैय्या, भाभी असे शब्दप्रयोग करत त्यांना उडविण्याची धमकी दिली. धमकी देणारा असा शब्दप्रयोग करू शकतो का? असा प्रश्न उपस्थित करत त्या पत्रातील भाषेचा टोन हा गुजराती …

Read More »

गृहमंत्री देशमुखांनी १०० कोटींचे टार्गेट दिले, हवे तर वाझेचा फोन तपासा आयपीएस अधिकारी परमबीर सिंग यांचे पत्र व्हायरल सत्येतेबाबत शंका

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील महाविकास आघाडी सरकार आधीच पोलिस अधिकारी सचिन वाझे आणि मनसुख हिरे मृत्युप्रकरणावरून आधीच अडचणीत आले असतानाच आयपीएस अधिकारी तथा तत्कालीन मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांचे एक पत्र व्हायरल झाले असून या पत्रात त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी महिन्याला बीअरबार आणि हुक्का पार्लरवाल्यांकडून १०० कोटी रूपयांच्या खंडणी …

Read More »

मुनगुंटीवारांचा चिमटा तर गृहमंत्री देशमुखांकडून गजल गाऊन दुःखावर फुंकर विधानसभेतील चिमट्यांनी एकच हास्यकल्लोळ

मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सुरु असून मागील दोन दिवसांपासून सतत मनसुख हिरेन प्रकरणावरून विधानसभेत भाजपाने आक्रमक पवित्रा स्विकारला. त्यावरून मंत्रिमंडळात गृहमंत्री पद आपल्यालाच का मिळाले? दुसरे खाते का मिळाले नाही? असा प्रश्न कदाचित गृहमंत्री अनिल देशमुख यांना पडला असेल. तसेच मागील दोन दिवस सुरु असलेल्या गदारोळावरून तुमचे दुःख …

Read More »

भाजपाच्या भूमिकेत बदलः हिरेनप्रकरणी वाझेंचा राजीनामा नव्हे तर बदली विधान परिषदेत गृहमंत्री देशमुख तर विधानसभेत अनिल परब यांची माहिती

मुंबई : विशेष प्रतिनिधी मनसुख हिरेन हत्याप्रकरणी वरिष्ठ पोलिस अधिकारी सचिन वाझे यांची भूमिका संशयास्पद असल्याच्या मागणीवरून त्यांच्यावर 201 अन्वये खाली गुन्हा दाखल करून अटक करावी आणि पदावरून तात्काळ निलंबित करावे या मागणीवरून विधानसभेत देवेंद्र फडणवीस तर विधान परिषदेत प्रविण दरेकर यांनी काल मंगळवारी मागणी लावून धरली. तसेच विधानसभेचे कामकाज …

Read More »

अखेर भाजपाने निर्माण केली नवी सशक्त विरोधी पक्षाची प्रतिमा आव्हान महाविकास आघाडीसमोरील कि फक्त शिवसेनेसमोरील

मुंबई : विशेष प्रतिनिधी मागील पाच वर्षात राज्यात भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकार असताना राज्यात आणि केंद्रात प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस सह राष्ट्रवादी काँग्रेसचा आवाज क्षीण राहीला. त्यामुळे अनेकवेळा विरोधक कुठे आहेत? प्रश्न जनतेकडून उपस्थित केला जात स्व. ग.प्र. प्रधान, स्व.एस.एम.जोशी यांच्यासह स्व.गोपीनाथ मुंडे, छगन भुजबळ सारख्या विरोधी पक्षनेत्यांची आठवण काढली …

Read More »

माझी चौकशी करा ! फडणवीसांचे सरकारला खुले आव्हान दोनवेळा पुन्हा सभागृहाचे कामकाज तहकूब

मुंबईः प्रतिनिधी मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी हिरेन यांच्या पत्नीने दिलेल्या जबाबावरून वरिष्ठ पोलिस अधिकारी सचिन वाझे यांना निलंबित करण्याच्या मुद्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाच्या सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. तसेच चौकशी करण्याचे सरकारला आव्हान दिले. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारची चांगलीच पंचाईत झाल्याने अखेर गोंधळातच पुढील कामकाज घेण्याची पाळी महाविकास …

Read More »

हिरेन आणि डेलकर आत्महत्येवरून सेना-भाजपामध्ये रंगला सामना विधानसभेचे कामकाज तहकूब

मुंबई : विशेष प्रतिनिधी ॲटालिया इमारतीच्या जवळ आढळून आलेल्या स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ गाडीच्या मालक मनसुख हिरेन आणि दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येच्या प्रश्नावरून शिवसेना आणि भाजपाचे सदस्य पहिल्यांदाच आमने-सामने आले. त्यामुळे सभागृहात गोंधळाचे वातावरण निर्माण झाल्याने विधानसभेचे कामकाज दोन वेळा तहकूब करावे लागले. प्रश्नोत्तराच्या तासानंतर विरोधी पक्षनेते …

Read More »

विधानसभेत पटोलेंंच्या सूचनेने फडणवीसांना झाली मदत महाविकास आघाडीलाच आणले अडचणीत

मुंबईः विशेष प्रतिनिधी काही दिवसांपूर्वी अनिल अंबानी यांच्या घराजवळ जीलेटीनच्या कांड्यानी भरलेली स्कॉरपीओ गाडी आढळली. त्या गाडीच्या मालकाचा आज मृतदेह मुंब्रा रेती बंदर येथे सकाळी आढळून आल्याने या प्रकरणातील गुढ वाढल्याचा मुद्दा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित करत याप्रकरणाचा तपास एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपविण्याची मागणी विधानसभेत केली. …

Read More »