Breaking News

Tag Archives: opposition leader

अजित पवारांनी सुनावले, ठरावात त्या पाच शहरांचा उल्लेख नाही, व्याकरणात चुका… बेळगाव, कारवार, निपाणीसह असा उल्लेख ठरावात करावा ;ठरावातील चूक अजित पवारांनी आणली निदर्शनास...

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वादावरील ठरावामध्ये ८६५ गावांचा उल्लेख केला. मात्र त्या ठरावामध्ये बेळगांव, कारवार, बिदर, भालकी, निपाणी या शहरांसह सर्व गावांचा उल्लेख का केला नाही असा सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी करत बेळगांव, कारवार, बिदर, भालकी, निपाणी या पाच शहरांसह सर्व गावांचा उल्लेख ठरावात करावा असे सांगत ठरावात असलेली चूक …

Read More »

अजित पवारांच्या तक्रारीवर फडणवीस म्हणाले, सभागृह तुम्ही चालवू देताय हे माहितच नव्हते… मुख्यमंत्री किमान प्रश्नोत्तराच्या दरम्यान सभागृहात आले पाहिजे-अजित पवार

विधानसभेचे नियमित कामकाज सुरु झाल्यानंतर प्रश्नोत्तराचा तास पुकारण्यात आला. त्यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उशीराने कामकाजात सहभागी झाल्यानतर.अजित पवार म्हणाले, मुख्यमंत्री महोदयांकडे १४-१५ खाती आहेत. किमान प्रश्नोत्तराच्या तासा दरम्यान त्यांच्याकडील विभागाची उत्तरे त्यांनी स्वतः दिली असती तर अधिकची माहिती मिळाली असती. मात्र मुख्यमंत्री प्रश्नोत्तराच्या तासाला …

Read More »

अजित पवार म्हणाले,.. ती अध्यक्षांची जबाबदारी, तर अध्यक्ष म्हणतात विशेषाधिकार समितीत जा अध्यक्ष राज्य सरकारला पाठीशी घालत असल्याचा आरोप करत विरोधकांचा सभात्याग

विधानसभा सदस्यांचे फोन टॅपिंग केल्याप्रकरणी राज्य सरकारने सादर केलेल्या क्लोज रिपोर्टवर न्यायालयाने प्रश्न उपस्थित केले. त्यामुळे या प्रश्नी नियम ५७ अन्वये चर्चेची मागणी विधानसभेत विरोधकांकडून करण्यात आली. मात्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विरोधकांची मागणी फेटाळून लावली. यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले, विधानसभा सदस्यांच्या हिताचे रक्षण करणे ही विधानसभा …

Read More »

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला दिला हा सल्ला लॉकडाऊन लावला होता विसरू नका

राज्यात कोरोना संख्या नियंत्रणात आल्यानंतर उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारला उलथवून टाकत शिंदे-फडणवीस सरकार स्थानापन्न झाले. मात्र मागील काही दिवसांपासून चीन, अमेरिका कोरियासह अन्य देशांमध्ये कोरोनाच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्राच्या आरोग्य विभागाने राज्य सरकारला पत्र पाठविले असल्याची माहिती पुढे आली. या पत्राचा अनुषंगाने विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी …

Read More »

अजित पवार म्हणाले फडणवीसांना, आम्ही अनेकांची सरकारे पाह्यली पण…. निधी वाटपावरून विधानसभेत सत्ताधारी-विरोधक आमने सामने

आज विधानसभेचे कामकाज सुरु झाल्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारकडून महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंजूर केलेल्या कामांना स्थगिती देण्याचा मुद्दा उपस्थित केला. तसेच सरकारने स्थगिती दिलेली कामे पुन्हा सुरू करा, याप्रश्नी चर्चा करा अशी मागणही त्यांनी यावेळी केली. विधानसभेत प्रश्नोत्तराचा तास सुरु होण्यापूर्वी औचित्याचा मुद्दाद्वारे अजित पवार म्हणाले, …

Read More »

अजित पवार म्हणाले, केंद्रीय गृहमंत्र्यांसमोर ठरलेले कोण मोडतोय… कर्नाटक सरकारच्या आगळीकीनंतर अजित पवारांचा सवाल

कर्नाटक विधानसभेचं बेळगावात आजपासून अधिवेशन सुरु होणार आहे. त्याला उत्तर म्हणून महाराष्ट्र एकीकरण समितीकडून व्हॅक्सीन मैदानावर आयोजित केलेल्या मेळाव्याला कर्नाटक पोलिसांनी परवानगी नाकारली. तसेच, कर्नाटकात कलम १४४ लागू करण्यात आलं असून, जमावबंदीचे आदेश देण्यात आलं आहेत. मराठी नेत्यांची धरपकडही करण्यात आली आहे. यावरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी संतप्त प्रतिक्रिया …

Read More »

अजित पवार यांचा आरोप, आताचे सरकार साहित्य, संस्कृती क्षेत्राला नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करतेय प्रज्ञा दया पवार, निरजा यांनी निवड समितीचे राजीनामे दिले हे सरकारसाठी लांच्छनास्पद नाहीय का?...

अनुवादित साहित्यासाठी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी वाड्मय पुरस्कार अनघा लेले यांना कोबाद गांधी यांच्या ‘फ्रॅक्चर्ड फ्रिडम’ या पुस्तकाच्या अनुवादासाठी जाहीर झाला. हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर मागील सहा दिवसात पडद्यामागे काही बर्‍याच घडामोडी झालेल्या दिसत असून १२ डिसेंबरला अचानक राज्य सरकारने आदेश काढत पुरस्कार निवड समिती बरखास्त केली आणि कोबाद गांधी यांच्या …

Read More »

शिंदे-फडणवीस यांनी नियुक्ती पत्र दिलेल्या ‘त्या’ उमेदवारांनी अजित पवारांचे मानले आभार

राज्य शासनाच्या विविध निवड प्राधिकरणांनी निवड आणि शिफारस केलेल्या मराठा समाजासह अन्य प्रवर्गातील सुमारे १ हजार ६४ उमेदवारांच्या शिष्टमंडळाने आज विरोधी पक्षनेते अजित पवार यांची भेट घेऊन महाविकास आघाडी सरकारच्या काळात घेतलेल्या पुढाकारासाठी आणि मदतीसाठी आभार मानले. विशेष म्हणजे या सर्व उमेदवारांना नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस …

Read More »

पालकमंत्री नियुक्तीवरून अजित पवार म्हणाले, माझ्या नाकीनऊ आलं होतं ते कसं… कसे सांभळणार सहा सहा जिल्हे

महाराष्ट्रात एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून राज्यातील जिल्ह्यांना पालकमंत्री कधी मिळणार? हा प्रश्न विरोधकांकडून सातत्याने विचारला जात होता. अखेर शनिवारी पालकमंत्र्यांची घोषणा झाली आहे. शिदे-फडणवीस सरकारमधील विविध नेत्यांकडे पालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. पण देवेद्र फडणवीस यांच्याकडे पालकमंत्री म्हणून सहा जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. यावरून विधानसभा विरोधी पक्षनेते …

Read More »

अजित पवार यांचे आव्हान, ‘दूध का दूध, पानी का पानी’ होऊन जाऊ द्या देशात चित्ते आले ठिक आहे परंतु यातून लोकांच्या रोजीरोटीचा प्रश्न सुटणार आहे का?

तुमच्या – माझ्या देशात व महाराष्ट्रात जे महागाईचे, बेरोजगारीचे व कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न आहेत त्यांना व्यवस्थितपणे बाजूला ठेवून तिसरेच प्रश्न पुढे आणले जातात. आता देशात चित्ते आले ठिक आहे. ते वाढावेत, पशूधन वाढावे हे ही ठीक आहे. परंतु यातून लोकांच्या रोजी-रोटीचा प्रश्न सुटणार आहे का? वेदांताचे काय होणार आहे …

Read More »