Breaking News

अजित पवारांच्या तक्रारीवर फडणवीस म्हणाले, सभागृह तुम्ही चालवू देताय हे माहितच नव्हते… मुख्यमंत्री किमान प्रश्नोत्तराच्या दरम्यान सभागृहात आले पाहिजे-अजित पवार

विधानसभेचे नियमित कामकाज सुरु झाल्यानंतर प्रश्नोत्तराचा तास पुकारण्यात आला. त्यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उशीराने कामकाजात सहभागी झाल्यानतर.अजित पवार म्हणाले, मुख्यमंत्री महोदयांकडे १४-१५ खाती आहेत. किमान प्रश्नोत्तराच्या तासा दरम्यान त्यांच्याकडील विभागाची उत्तरे त्यांनी स्वतः दिली असती तर अधिकची माहिती मिळाली असती. मात्र मुख्यमंत्री प्रश्नोत्तराच्या तासाला हजरच नसतात असा आरोप केला.

त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना खोपरकळी लगावत म्हणाले, तुम्ही सभागृह चालवू देताय हे आम्हाला माहितच नव्हते.

मी ही सभागृहाचे कामकाज नीट चालववू देताय हे मी पाह्यल्यानंतर लगेच आलो. तुम्ही जर सांगितले असते तर मी आधीच आलो असतो. पण ठिक आहे. मी मुख्यमंत्र्यांना निरोप पाठवतो, ते यापुढे हजर राहतील असे आश्वासित त्यांनी यावेळी केले.

अजित पवार बोलताना म्हणाले, उपमुख्यमंत्र्यांकडेही ७-८ खाती आहेत. पाच-सहा जिल्ह्याचे पालक मंत्री पदाची जबाबदारी आहे. तुम्ही सक्षम आहात. त्यामुळे तुम्ही तुमच्याकडील विभागांची उत्तरे तुम्ही स्वतः देता. परंतु मुख्यमंत्र्यांकडे असलेल्या खात्यांची उत्तरे कोणी द्यावी ही त्यांचा प्रश्न आहे. मात्र ते स्वतः जर सभागृहात हजर असले तर गुलाबराव पाटील, उदय सामंत यांच्या उत्तरात जास्तीची भर घालून अधिकची माहिती सभागृहाला मिळाली असती.

पण आतापर्यंत किमान प्रश्नोत्तराच्या तासा दरम्यान मुख्यमंत्री उपस्थित राहतात. एखाद्या दिवशी दिल्लीला महत्वाचे काम असेल तर चालून जाईल. मात्र मुख्यमंत्र्यांनी सभागृहात हजर असावे अशी अपेक्षा उपस्थित केली.

Check Also

अमित शाह यांचे अरविंद केजरीवाल यांना प्रत्युत्तर, ७५ री झाली तरी मोदीच

नरेंद्र मोदी पुन्हा देशाचे पंतप्रधान होतील आणि तिसरा कार्यकाळ पूर्ण करतील, असे केंद्रीय गृहमंत्री अमित …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *