Breaking News

Tag Archives: mumbai

अरूण गवळी यांचा पॅरोल आणखी चार आठवड्याने वाढविला सर्वोच्च न्यायालयाने याचिवेवरील सुनावणीवेळी दिली मुदतवाढ

मुंबईतील एकेकाळचे अंडरवर्ल्ड डॉन तथा माजी आमदार अरूण गवळी यांच्यावर माजी आमदार कमलाकर जामसांदेकर यांच्यासह ११ जणांच्या हत्येप्रकरणी सध्या तुरुंगाची हवा खात आहे. मात्र अरून गवळी यांना नियमानुसार तुरुंगातून काही काळ सुट्टी अर्थात पॅरोल मंजूर करण्यात आला होता. या पॅरोलची मुदत १८ नोव्हेंबर रोजी संपणार होती. परंतु अरूण गवळी यांनी …

Read More »

उद्धव ठाकरे यांची टीका, खोकं रिकामं झालं असेल म्हणून डबड आणून ठेवलं

ठाणे शहरालगत असलेल्या मुंब्रा येथील शिवसेना शाखेची इमारत शिंदे गटाने पाडल्यानंतर त्या जागेवर शिंदे गटाने त्या जागेवर दावा करत तेथे कंटेनर ठेवत शिंदे गटाची शाखा सुरु केली. मुंब्र्यातील जागा परत मिळविण्यासाठी ठाकरे गटाचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज दौरा केला. मात्र निर्माण झालेल्या तणावानंतर पोलिसांच्या विनंतीवरून उद्धव ठाकरे यांनी …

Read More »

मुंब्र्यातील शाखेच्या मालकीवरून उद्धव ठाकरे यांना शिंदे गटाने दाखविले काळे झेंडे शिंदे गटाने अखेर मुंब्र्यातील शिवसेना शाखेची जागा बळकाविली

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या मुंब्रा येथील शिवसेना शाखेच्या इमारतीवर ठाणे महापालिकेने बुलढोझर फिरवित ठाकरे गटाच्या ताब्यातील जागा हिसकावून घेतल्याचे चित्र आज निर्माण झाले. ठाणे महापालिकेच्या कारवाईनंतर ठाकरे गटाचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे संबधित शाखेच्या जागेची पाहणी करण्यासाठी मुंब्रा येथे गेले. पण शिंदे समर्थक शिवसैनिकांही उद्धव ठाकरे …

Read More »

आदित्य ठाकरे यांचा सवाल, प्रदूषणावर नियंत्रण मिळवणार की नाही? आयुक्तांनी फक्त मुख्यमंत्र्यांना घोटाळ्यांमध्ये मदत करणं हे योग्य नाही

शिवसेना नेते, युवसेना अध्यक्ष,आमदार आदित्य ठाकरे यांनी मिधे सरकार आणि पालिका आयुक्ताना घेरलं. आदित्य ठाकरे यांनी आयुक्तांनी फक्त मुख्यमंत्र्यांना घोटाळ्यांमध्ये मदत करणं हे योग्य नाही असा खोचक सल्ला देत. रस्ते घोटाळ्यावर हल्लाबोल केला. कालपासून दिवाळीचा डबल धमाका ट्वीटवरून झालाय, मी प्रशासकांना प्रश्न विचारला बेस्ट बीएमसी च्या बोनस बद्दल.. काही दिवस …

Read More »

राज्यातील प्रदुषण नियंत्रणासाठी मुंबईतील रस्ते १००० टँकर्सच्या पाण्याने धुणार

राज्यातील प्रदुषण नियंत्रणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरसावले असून हवेचा गुणवत्ता निर्देशांक सुधारण्यासाठी करण्यात उपाय योजना ॲक्शन मोडवर राबवाव्यात असे निर्देश देतानाच सर्व प्रशासकीय यंत्रणांनी एकत्रितपणे प्रदुषणमुक्त महाराष्ट्राच्या दिशेने मोहिम स्वरुपात काम करावे, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. मुंबईतील रस्त्यांवरील धुळीला आळा घालण्यासाठी पाण्याची फवारणी करण्याकरीता १००० टॅंकर्स लावावेत त्यासाठी विशेथ …

Read More »

जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत भारतातील ३ शहरे, यादी पाहा भारतातील या दिल्ली, मुंबईनंतर या तिसऱ्या शहराचा समावेश

जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांची यादी स्विस समूह आईक्यूएअरने जाहीर केली आहे. या यादीत भारतातील तीन शहरांचा समावेश आहे. यादीत अति प्रदुषित शहरांचा समावेश असून या शहरांमधील हवेची स्थिती अत्यंत वाईट पातळीवर आहे. हे प्रदुषण नागरिकांसाठी घातक आहे. आईक्यूएअरच्या या यादीनुसार, जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत दिल्ली पहिल्या क्रमांकावर आहे. दिल्लीतील …

Read More »

मुंबईच्या सीएसएमटी World Heritage Building चा आज वाढदिवसः ४२५ विशेष ट्रेन

राज्याची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील प्रसिध्द अशा सीएसएमटीच्या इमारतीला पाहिल्यानंतर अनेकांना या इमारतीचे आश्चर्य वाटते. या इमारतीची भव्य अशी कलाकुसर, प्रत्येक ठिकाणी इमारतीची वैशिष्टेपूर्ण दगडी बांधकांमामुळे या इमारतीला भारतासह जगभरातील अनेक पर्यटक आवर्जून पहायला येतात. या इमारतीला आज ७२ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त मध्य रेल्वेने इमारतीला विद्युत रोषणाई केली. या विद्युत …

Read More »

राज्यात वर्षभरानंतर कॅन्सरग्रस्तांची संख्या १.२५ वर पोहोचणार

मुंबई येथे तिसऱ्या इंडियन कॅन्सर काँग्रेसचे आयोजन करण्यात आले, राज्याचे ग्राविकास व पर्यटन मंत्री गिरीष महाजन हे या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते. तर देशतील कॅन्सर विशेषज्ञ, नामवंत चिकीत्सक यामध्ये सहभागी झाले होते. डॉ. रमन देशपांडे, डॉ. संजय शर्मा, डॉ. देवेंद्र चौकर, डॉ. संदिप गुप्ता, डॉ. धर्मेश शहा, अमेरिकेतील …

Read More »

सोडतीतील गिरणी कामगारांना लवकर घरांचा ताबा घरे उपलब्ध करून देण्यास शासनाचे प्राधान्य- मुख्याधिकारी मिलिंद बोरीकर

म्हाडाकडे अर्ज प्राप्त झालेल्या सर्व पात्र गिरणी कामगारांना घरे उपलब्ध करून देण्यास शासनामार्फत प्राधान्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. आतापर्यंत १५ हजार ८७० गिरणी कामगारांच्या घरांची सोडत काढण्यात आली असून लवकरच गिरणी कामगारांना प्रत्यक्ष ताबा देण्यास सुरूवात करण्यात येणार असल्याचे मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी सांगितले …

Read More »

काँग्रेसचा आरोप, सेव्हन हिल्स हॉस्पिटल मुकेश अंबानींच्या घशात घालण्याचा डाव मुंबई महानगरपालिका सेव्हन हिल्स हॉस्पिटल ताब्यात का घेत नाही?

मुंबईतील अंधेरी भागात असलेले सेव्हन हिल्स हे प्रशस्त व १५०० बेड्सचे रुग्णालय मुंबईकरांना वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी अत्यंत महत्वाचे ठरू शकते. आंध्र प्रदेशातील एक खाजगी कंपनी हे रुग्णालय चालवत होती, पण ही कंपनी दिवाळखोरीत निघाल्याने हे रुग्णालय आता इतर खाजगी कंपनीस चालवण्यास देण्याचा प्रयत्न सुरु आहे. सेव्हन हिल्स रुग्णालय खाजगी कंपनीला …

Read More »