Breaking News

Tag Archives: mpsc

MPSC प्रश्नी शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांना थेट फोन अन चंद्रकांत पाटलांवर निशाणा विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांसोबत होणार बैठक

महाराष्ट्र केसरी विजेता शिवराज राक्षे याचा सत्कार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हस्ते पुण्यातील मोदी बागेतील घरी झाला. त्यानंतर शरद पवार यांनी स्पर्धा परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवरून संवाद साधला. त्याचबरोबर चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यावरून शरद पवार चंद्रकांत पाटील यांच्यावर खोचक …

Read More »

MPSC विद्यार्थ्यांचे परीक्षेतील बदलाच्या विरोधात पुणेसह अनेक शहरात आंदोलन एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा

लोकसेवा आयोगाने नुकतीच राजपत्रित अधिकारी वर्ग एक आणि वर्ग दोन साठीच्या मुख्य परीक्षा पद्धतीमध्ये बदल केला. आयोगामार्फत घेतली जाणारी ही परीक्षा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेच्या धर्तीवर वर्णनात्मक अर्थात लेखी परीक्षा करण्याचा असून याची अंमलबजावणी याच वर्षापासून म्हणजे २०२३ ला होणाऱ्या मुख्य परीक्षेपासून करण्याचे ठरवले आहे. नवीन पद्धत आत्मसात करण्यास …

Read More »

काँग्रेस म्हणते, एमपीएससीने विद्यार्थी हितासाठी अहंकार बाजूला ठेवावा एमपीएससीच्या लढ्यात काँग्रेस पक्ष विद्यार्थ्यांसोबत

एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून होणाऱ्या परीक्षा देऊन प्रशासनात अधिकारी होण्याचे स्वप्न अनेक विद्यार्थी पहात असतात. दरवर्षी लाखो विद्यार्थी आयोगाच्या परिक्षेसाठी अहोरात्र मेहनत घेतात. आयोगाने परिक्षा पद्धतीत केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर बदल करुन तो २०२३ पासून लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या बदलाचे आकलन करण्यास विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ मिळावा …

Read More »

अनुसूचित जमाती प्रवर्गातील ३ हजारहून अधिक जागांसाठी ३१ जुलै पर्यंत भरती प्रक्रिया मंत्री दीपक केसरकर यांची विधान परिषदेत माहिती

अनुसूचित जमातीच्या आरक्षणाच्या आधारे शासकीय सेवेत दाखल झालेल्या आणि त्यानंतर जातीचे प्रमाणपत्र अवैध ठरलेल्या उमेदवारांना अधिसंख्य पदावर कायम ठेवले आहे. यामध्ये आदिवासी उमेदवारावर कोणताही अन्याय होणार नाही याची खबरदारी घेऊन त्यांना त्वरित न्याय मिळावा म्हणून रिक्तपदे भरतीसाठी कालबद्ध पद्धतीने भरतीप्रक्रिया तातडीने राबवणार असल्याची माहिती मंत्री दीपक केसरकर यांनी विधानपरिषदेत दिली. …

Read More »

पोलिस दलातील पदांसाठी तुम्ही शाररिक चाचणी परिक्षा दिलीय का? मग ही बातमी वाचाच

पोलीस शिपाई, पोलीस नाईक, पोलीस हवालदार आणि सहायक पोलीस उपनिरीक्षक संवर्गातील कर्मचाऱ्यांना पोलीस उपनिरीक्षक पदांसाठीच्या शारीरिक चाचणी नंतर चार तासातच जलदगतीने आणि उमेवारांना प्रतिक्षा करण्याची संधी न देता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने निवड यादी व सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर केली आहे. पोलीस उपनिरीक्षक पदांसाठीच्या २५० पदांवर पदोन्नती देण्याकरीता विभागीय स्पर्धा परीक्षेतील …

Read More »

‘युपीएसी’ परिक्षा प्रशिक्षणासाठी अर्ज करण्याचे आवाहन

केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात युपीएसीच्या नागरी सेवा परीक्षेच्या विनामूल्य प्रशिक्षणाची प्रवेश प्रक्रिया ४ नोव्हेंबर पासून सुरू होणार आहे. ऑनलाईन पद्धतीने प्रवेश अर्ज ४ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबर या कालावधीत भरता येणार असल्याची माहिती राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्थेचे संचालक डॉ.के.एस.जैन यांनी दिली आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत राज्य प्रशासकीय …

Read More »

शासनातील क्लार्कची पदे लोकसेवा आयोगामार्फत तर पोलिस भरतीही लवकरच राज्यातील लिपिकांची सर्व रिक्त पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरणार

राज्यातील शासन वर्गातील ३ मधील लिपिकांची सर्व रिक्त पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. सध्या राज्यातील अ आणि ब गटातील अधिकाऱ्यांची रिक्त पदे भरण्याची कार्यवाही आयोगामार्फत केली जाते. आयोगाच्या कार्यक्षमतेचा विचार करून मुंबई प्रमाणेच राज्यभरातील लिपिकांची देखील रिक्त …

Read More »

एमपीएससीच्या कक्षेतील १०० टक्के व कक्षेबाहेरील ५० टक्के पदभरती होणार राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांची माहिती

राज्य लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील १०० टक्के पदभरती करणार तर महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससीच्या कक्षेतील पदे वगळता ५० टक्के पदे भरण्यात येणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी विधानपरिषदेत लक्षवेधीला उत्तर देताना दिली. शासनाच्या २९ प्रमुख विभागांमध्ये दोन लाख १९३ जागा रिक्त असल्याबाबतची लक्षवेधी विधानपरिषदेत सादर करण्यात आली. या …

Read More »

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध स्पर्धा परीक्षांच्या पध्दतीमध्ये केल्या ‘या’ सुधारणा गुणवत्ता राखण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाचा वापर करणार

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत शासन सेवेतील विविध संवर्गाकरीता राबविण्यात येणाऱ्या विद्यमान ‘भरतीप्रक्रियेमुळे परीक्षांची वाढलेली संख्या, उमेदवार व प्रशासकीय यंत्रणेवर येणारा ताण, भरतीप्रक्रियेस होणारा विलंब, गुणवत्ता राखण्यासाठी सतत करावे लागणारे प्रयत्न, प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करुन करावयाच्या विविध उपाययोजना, भविष्यामधील भरतीप्रक्रियेचे नियोजन या व इतर अनुषंगिक बाबींचा साकल्याने विचार करुन आयोगामार्फत आयोजित विविध …

Read More »

एमपीएससी परिक्षार्थींसाठी खुषखबर: परिक्षा आणि निकालाचे वेळापत्रक जाहीर ३० एप्रिल २०२३ पर्यतचे वेळापत्रक जाहीर केले

मराठी ई-बातम्या टीम पुणे येथे एमपीएससीचा परिक्षार्थी स्वप्निल लोणकर यांने आत्महत्या केल्यानंतर एमपीएससीच्या सुस्त कारभारावर टीकेचा भडीमार झाला. त्या टीकेतून बोध घेत अखेर एमपीएससी आणि राज्य सरकारने एमपीएसकडून घेण्यात येणाऱ्या रिक्त जागांसंदर्भातील परिक्षांचे वेळापत्रक जाहीर केले असून या परिक्षा जानेवारी २०२२ पासून ते एप्रिल २०२३ पर्यतचे वेळापत्रक जाहीर केले आहे. …

Read More »